विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 January 2024

#शिवछत्रपती_गागाभट्ट_संबंध

 


#शिवछत्रपती_गागाभट्ट_संबंध
_____________________________________________
#श्रीशिवछत्रपतींच्या_राज्यारोहणाच्या_महोत्सवात, ज्या पंडिताने पुढाकार घेऊन #कलियुगात_क्षत्रियांचे_अस्तित्व_आहे एवढेच नव्हे तर #वैदिक_पद्धतीने_राज्याभिषेक करून घेण्याचा त्याना अधिकार आहे हे छातीठोक सांगून शिवाजी महाराजांच्या ४४ वे वर्षी होणाऱ्या व्रतबंधापासून राज्याभिषेकापर्यंत सर्व संस्कार स्वतः पुढाकार घेऊन केले ते क्रांतिकारी पुरुष म्हणजे #मीमांसक_धर्मशास्त्रज्ञ_गागाभट्ट .
गागाभट्टांचे मूळ नाव विश्वेश्वर. 'गागा' हे लाडके नाव त्यांचे वडील दिनकरभट्ट यानी ठेवले. गागाभट्टांचे पणजोबा नारायणभट्ट यांचे वडील रामेश्वरभट्ट हे शके १४४३ त काशीस गेले आणि तेथेच स्थायिक झाले. व तेथे गागाभट्टांचे आजोबा रामकृष्णभट्ट यांचा जन्म झाला. रामकृष्णमट्टांची कीर्ती फार मोठे मीमांसक म्हणून होती ( आहे). त्यानी पार्थसारथिमिश्रांच्या 'शास्त्रदीपिके' वर सर्वप्रथम टीका लिहिली. तिचे नाव 'सिद्धान्त चन्द्रिका'.
न शास्त्रदीपिका' टीका कृता केनापि सूरिणा ।
तदपूर्वाध्वसञ्चारी नोपहास्यः स्खलन्नपि ।।
असे त्यानी नम्रतेने त्या टीकेच्या प्रास्ताविकात म्हटले असले तरी टीका सखोल, माहितीपूर्ण व सुबोध आहे. ती निर्णयसागरने प्रसिद्ध केली आहे. ही उत्कृष्ट टीका तर्कपादाअखेर आहे. ही टीका रामकृष्णभट्टानी इ. स. १५४३ मध्ये वाराणसीला लिहिली.
रामकृष्ण भट्टांना मुलगे दोन : दिनकरभट्ट व कमलाकरभट्ट. दिनकरभट्ट हे गागाभट्टांचे तीर्थरूप. ते मोठे मीमांसक व धर्मशास्त्रज्ञ होते. पार्थसारथि मिश्रांच्या 'शास्त्रदीपिके ' वर त्यांची 'भट्ट - दिनकरी' ही टीका त्यांचा मीमांसाशास्त्रावरील अधिकार दाखविते. धर्मशास्त्रावरील त्यांच्या प्रभुत्वाचा लौकिक महाराष्ट्रापर्यंत पोचला होता.
शिवाजीमहाराजांचे प्रेरणेने त्यानी धर्मशास्त्रावर '#शिव_द्युमणिदीपिका' नामक ग्रंथ लिहिला. तो त्यांचे हातून पूर्ण झाला नाही, तो पुढे त्यांचे चिरंजीव गागाभट्ट यानी पूर्ण केला. पण याचा अर्थ असा की शिवाजी महाराजांचा गागाभट्टांचे वडिलापासून चांगला परिचय होता व गागाभट्टांचे तीर्थरूप वाराणसीत राहात असल्यामुळे शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष आश्रित म्हणता आले नाहीत तरी #शिवाजीमहाराजांचे_कार्याबद्दल_दिनकरभट्टानाआदर_होता_म्हणूनच_त्यांनी #धर्मशास्त्रावरील_एका_ग्रंथास_शिवाजी_महाराजांचे_बद्दलच्या_भावनांना_चिरस्थायित्व #देण्यासाठी_शिव_द्युमणि_दीपिका हे नाव दिले.
गागाभट्टांचा चुलता ( दिनकरभट्टांचा धाकटा बंधू ) कमलाकर तथा दादूभट्ट. त्यांचा निर्णयसंधू हा ग्रंथ अद्याप प्रमाण मानला जातो. त्यानी एकूण २२ ग्रंथ लिहिले. तो मीमांसेच्या दोन्ही शाखात ( भाट्ट आणि प्राभाकर ) तज्ञ मानला जाई. त्याने 'तंत्रवार्तिकावर ' 'भावार्थ' ही टीका व 'शास्त्रदीपिके'वर 'आलोक' नामक टीका लिहिली. जैमिनीच्या पूर्वमीमांसा-सूत्रावर त्याची 'शास्त्रमाला' टीका प्रसिद्ध आहे. धर्मशास्त्रावरील त्याचा सर्वमान्य ग्रंथ 'निर्णयसंधू' इ. स. १६१२ मध्ये पूर्ण झाला.
सारांश ज्या घराण्यात गागाभट्ट जन्माला आले ते घराणे #मीमांसा#धर्मशास्त्र यामध्ये मान्यवर अधिकारी असणाऱ्या व काशीक्षेत्रात ज्यानी आपला लौकिक प्रस्थापित केला अशा पंडितांचे होते. " या घराण्याचा व शिवाजीमहाराजांचा गागाभट्टांचे तीर्थरूपांसून परिचय होता व त्यांना शिवाजी महाराजांबद्दल वाटणारा आदर धर्मशास्त्रावरील एका ग्रंथास 'शिव-द्युमणि-दीपिका' हे ग्रंथशीर्षक देऊन व्यक्त केला होता."
गागाभट्टांचे कार्य : ग्रंथसंपत्ती
गागाभट्टानी मीमांसासूत्रावर भाट्टचिन्तामणी म्हणून स्वतंत्र रचना केली असून तिचा ' तर्कपाद' प्रसिद्ध झाला आहे ( चौखंबा - वाराणसी ) मीमांसा- शास्त्रावरील हा एक चांगला ग्रंथ असून त्याने कुमारिलभट्टांची मतप्रणाली स्वीकारली आहे व न्याय आणि व्याकरण या शास्त्रावरही चर्चा यात केली आहे. हा ग्रंथ नवीन अभ्यासकासाठी ( शिशुप्रतिविबोधनार्थ ) रचला असून यात पुढील विषयावर चर्चा आहे :
ज्ञानप्रामाण्य, ईश्वरवाद, शक्तिवाद, सृष्टिप्रलय, अनुमान, अर्थापत्ति, अभाव, शब्द, धात्वर्थ, आख्यात, लकारार्थ, कारक, समास इ. या ग्रंथावरून गागाभट्टांचा न्याय, व्याकरण व मीमांसा या शास्त्रावर मोठा अधिकार होता असे दिसते. या ग्रंथात त्यानी आपल्या तीर्थरूपांची मते दिली आहेतच पण त्याबरोबर मुरारिमित्र, उदयनाचार्य, गंगेश, शिरोमणी ( रघुनाथ ), पक्षधर मिश्र इ. पूर्वसूरींची मते उल्लेखली आहेत.
यातील त्यांची काही मते त्या काळाचे दृष्टीने पुढारलेली दिसतात. उदाहरणार्थ-
(१) न्याय-वैशेषिकांनी जगाची उत्पत्ती व लय याविषयी जो अनुक्रम सांगितला आहे तो सर्वसाधारणणे गागाभट्टाना मान्य असला तरी ईश्वरी- इच्छेने हे घडते हे त्याना अमान्य आहे. मीमांसाशास्त्र नीरीश्वरवादी आहे. परमाणूंच्या या जगदुत्पत्ती व लय या क्रिया 'धर्म व ' अधर्म' यांच्या आधारे उलगडता येतात.
(२) 'महाप्रलय' कल्पनेवर त्यांचा विश्वास नाही.
(३) नैयायिकांच्या योगजधर्मप्रत्यासत्ती' वर गागाभट्टांचा विश्वास नाही. विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण कुमारिलभट्ट या मीमांसकांच्या श्रेष्ठ आचार्याचा 'लोकवार्तिक' ग्रंथ अपूर्ण होता तो पूर्ण करण्याची आज्ञा शिवाजीमहाराजानी गागाभट्टास दिली व ती गागाभट्टानी 'शिवार्कोदय' (शिवाजीरूपी सूर्याचा उदय ) हा ग्रंथ लिहून पार पाडली असे गागा-भट्टानी स्वतःच म्हटले आहे :
प्रारम्भि यत्न इह यः खलु कारिकाभि रद्धा प्रति प्रतिभधाम विदूषणाय ।
दुःखं सतां तदसमाप्तिकृतं शिवेन छत्राधिपेन सुविचिन्त्य समापितः सः ॥
यत्तपादे बहुताग्रहेणश्लोकः कृतं वार्तिकमार्यवयः । * (* आर्यवर्य - कुमारिलभट्ट)
गागाभिधेनायमपूरि शेष स्तदाज्ञया छत्रपतेः शिवस्य ||
त्या काळात शिवाजी महाराजांचा वैदिकपद्धतीने राज्याभिषेक ही राजकीय, सामाजिक व धार्मिकदृष्ट्या क्रांतिकारक पण अत्यावश्यक घटना होती. तिचे योग्य महत्त्व ओळखून संसारातून निवृत्त झाल्यावर गागाभट्टानी हा खटाटोप केला. व शिवाजीमहाराजानी गागाभट्टानीच अभिषेक करावा हा केलेला आग्रह त्यानी मानला ( तस्य [ शिवाजी महाराज ] अनुरोधादिह वादि- वर्णाधिक्ये चतुर्थाश्रममंगदोषः । - अलवार संग्रह - सं. पोथ्या क्रम ११७ )
इतिहासातील पुरुष या नात्याने शिवछत्रपती व गागाभट्ट यांचे संबंध, राज्याभिषेकासाठी गागाभट्टांची निवड करण्याची शिवाजी महाराजांची संभाव्य कारणे वरील उताऱ्यावरून स्पष्ट होतील. या राज्याभिषेकाचे निमित्ताने गागाभट्टाविषयी लिहिणारानी वरील ऐतिहासिक तथ्यांची ( facts ) दखल घ्यावी एवढीच अपेक्षा.
संदर्भ :
1. Purva Mimansa - In its sources -Ganganath Jha 1964
2. History of Dharmaśāstra - P. V. Kane Catalogues of Sanskrit Manuscripts
श्री. ग. वा. तगारे.
गागाभट्टांचे पणजोबा नारायणभट्टांनीच उध्वस्त काशीविश्वनाथाची शके १५०२ मध्ये पुनर्प्रतिष्ठापना केली होती. हेच मंदिर पुढे गागांच्या डोळ्यासमोर शिवराज्याभिषेकापूर्वी शके १५९०-९१ त औरंगजेबाने विध्वंसिले. मूळ पैठण निवासी या भट्टकुलाची परंपरा अशी आहे :- नागपाश- चांगदेव-गोविन्द-रामेश्वर-नारायण- रामकृष्ण-दिनकर-गागा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैदिकपद्धतीने राज्याभिषेक करणारे व मुंगीपैठण येथील राजे भोसले घराण्याचे परंपरागत पुरोहीत श्री गागाभट्ट यांचे वंशज श्री लक्ष्मीकांत मथुरानाथ दिक्षित वय ८६ हे अयोध्या येथील श्री रामचंद्र मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...