विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 19 January 2024

लोककल्याणकारी अजातशत्रू शाहू छत्रपती महाराज

 


लोककल्याणकारी अजातशत्रू शाहू छत्रपती महाराज
⚔️ मौजे मा।र अग्रहार करून दिल्हे आहे ऐसीयास आपले ईनाम थोरले आबासाहेब पासूनचे कारकीर्दीस चालत होते ते राजश्री कैलासवासी छत्रपती स्वामीस हा देश, अर्जानी जाहला त्यानी अमानत केले आहेत ते देविले पाहिजेत ह्मणोन विदित केले त्यावरून मनास आणूनी मौजे मा।रच्या वृत्तिवतास ईनाम होते त्या पौ। देविले पाच चावर बिघे जमीन देविली असे तर तुह्मी मनास आणून याच्या ईनामत्ती प+++++++ चे कारकिर्दीस चालत होते ते मनास आणोन त्या पौ सदरहू जमीन अवल दूम प्रतीची जमीन नेमून देऊन याचे दुमाले करून यास व याचे पुत्रपौत्रादिवशपरपरेने चालवित जाणे नवीन पत्राचा आक्षेप प्रतीवर्षी करीत न जाणे म्हणून मोर्तब सूद
शाहू छत्रपती
अनेक मराठा घराण्यातील पराक्रमी, निष्ठावंत लोकांना इनाम, जहागिरी, वतने, मोकासा, वर्षासन देऊन सकल क्षत्रिय मराठे कुळाचे उत्क्रांती करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्र थोरले शाहू महाराज होय मराठ्यांच्या इतिहासात ज्या छत्रपतीची नोंद अजातशत्रू म्हणून झाली दिल्लीचा बादशाह असो किंवा हैदराबादचा निजाम किंवा गुजरातचा नवाब असो किंवा आकृत्याचा नबाब ज्याच्या मुद्रेवर उभ्या हिंदुस्थानात इस्लाम सत्ता विनम्र होऊन नितमस्तक व्हायची अशी ही थोरल्या छत्रपती शाहू महाराजांची राजमुद्रा होय छत्रपती
शिवाजी महाराज व त्यांचे सरदार व मुत्सद्दी यांनीं हिंदवी स्वराज्यासाठी केलेलं मराठा राजकारण हे अद्वितीय होतं त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पसारा केवढा! त्यांचा पराक्रम कसला अकटोविकट आणि त्यांचें धोरण किती लांबवर दूरदृष्टी असणारे,,,, शिवरायांचे धोरण म्हणजे मराठी जरीपटका दिल्लीच्या तक्तावर फडकला पाहिजे आणि ते स्वप्न घेऊन आयुष्यात दिल्लीच तक्त व दिल्लीचे पातशहा कोण झाले पाहिजे व त्यास मान्यता सातारा येथून दिले जाते असे ते थोरले शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराजांची पुत्र होईल शिवछत्रपतींची धोरण पुढे राबवणारा हा राजा मराठ्यांच्या इतिहासात स्वतःच्या पदरात हुजुर ४० सरदारांच्या फौजा बाळगून हिंदुस्थानाच्या एक तृतीयांश भागावर राज्य करणारा अभिषेक सम्राट म्हणून अनेक इतिहासकार उल्लेख करतात १२जानेवारी १७०८ रोजी किल्ले अजिंक्यतारा येथे आपला राज्याभिषेक करून अखंड हिंदुस्थानावर मराठा राज्य द्रोही फिरवली तू राजा म्हणजे थोरले छत्रपती शाहू महाराज होय. .....
छत्रपती थोरले शाहू महाराजांचे स्त्री विषयक धोरण*
छत्रपती थोरले शाहू रोजीनिशी
पत्र. क्र. १८९
इ. स १७३५-३६
सित सलीसाम माय व अलफ मोहरम
अजम अबुदूल्ला खान याची कन्या सुरतेहून औरंगाबादेस येत होती त्यासी मागीऀ येतां नवापूरानजीक राजश्री बाबूराव दाभाडे सेनाखासखेल यांची अटकावून ठेविली म्हणून
हुजूर विदेत झाले. तरी नवाबाचा स्वामीचा स्नेह, अबदुल्लाखाल त्याचे दिवाण, त्याची कन्या अटकवावी हे गोष्टी कायाऀची नव्हे. प्रस्तुत नवाबानी व राजश्री पंत सुमंत यांणी व खान मरशारनिल्हे नी कित्येक विषय लिहीले त्यावरून आज्ञपत्र सादट केले असे. तरी तुझी बाबूरायास ताकीद करुन कन्यासमेत भार बारदारी वस्तभाव देखील निरोप देऊन शहरास सुखरुप पोहोचवणे. स्वामीच्या स्नेहास अंतर होई गोष्ट न करणे ,याउपरी धडीचा विलंब न लावताच निरोप देवणे :त्याची वस्तभाव पावालियाची रसीद घेऊन हुजूर पाठविणे या कामास कमाजी भाकरे व जिवनराव कदम दिमंत पाठविले आहे
⚔️⚔️ पत्रातील आशय :-⚔️⚔️
सदर पत्र हे छत्रपती थोरले शाहू महाराजांनी सेनापती उमाबाई दाभाडे यांनी लिहिले आहे
सुरतचा नवाब व मराठ्यांच वैर सर्वश्रुत आहे पण सदर नवाब हा छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र व मराठा साम्राज्याचे विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून होता.
🌞🌞परंतु नवाबाचा दिवाण अबुदल्लाखान हा सुरतहुन औरंगाबादकडे जात असताना सेनाखासखेल सवाई राजश्री बाबूराव दाभाडे यांनी नाबाबाचे दिवाण व त्यांची कन्येस शत्रू म्हणून अटक केली ही घटना नबाबस समजताच त्याने छत्रपती शाहू महाराजांनी कडे दिवाणच्या कन्येला अटक केले म्हणून कांगावा केला यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी सेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यास पत्र लिहून नवाब व आपल्या मैत्रीचा उजाळा दिला .. मराठ्यांनी शत्रूच्या कुटुंब कबिल्यास अटकव करू नये आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवण नुसार सोडून देण्यासाठी सागितले... 🌞🌞
यावेळेस सेनापती उमाबाई या तळेगाव दाभाडे येथे होत्या सदर बाब लक्षात येताच *" स्त्री हे मराठ्यांच्या देवाघरातील दैवत आहे मग तो कोणत्याही जाती धर्माचा व पंथाचा अथवा शत्रूच्या घरातील असो "*
हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणानुसार दिवाण व त्याची कन्या यांची सुटका सेनापती उमाबाईसाहेब यांनी केली.
राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्त्री विषयक धोरण पुढे छत्रपती थोरले शाहू महाराजांनी सुरु ठेवले व सेनापती उमाबाईसाहेब या तत्कालीन कालखंडात गुजरात परिसरात नव्हत्या म्हणून सदर अबदुल्लाखानाच्या कन्याशी आपल्या वडिलांच्या सोबत अटक करण्यात आले ⚔️
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले|
महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले|
खरा वीर वैरी पराधीनतेचा |
महाराष्ट्र आधार हा भारताचा ||
अखंड हिंदुस्थानचा खड्गहस्त असणाऱ्या मराठे साम्राज्याचा विस्तार सगळ्या हिंदुस्थानात कंरून
"महाराष्ट्रा शिवाय राष्ट्रगाडा नेन चाले '
हे वाक्य आज महाराष्ट्रासाठी ज्या छत्रपती मुळे बोलले गेले तो हीच छत्रपती संभाजी महाराज पुत्र थोरले शाहू छत्रपती होय यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याचे मराठे साम्राज्यात रूपांतर झाले स्वराज्य विस्तरक, ज्या छत्रपती च्या नेतृत्वाखाली मराठे साम्राज्य गुजरात पासुन बंगाल पर्यंत तंजावर पासुन दिल्ली पर्यंत मराठे साम्राज्य चे विस्तार झाले, ज्याच्या मुळे दिल्लीवर नामधारी पातशाही आले व महाराष्ट्रातील , शिंदे, पवार, होळकर, गायकवाड, भोसले, जाधव, भोईट,बर्गे, निकम, राजे पांढरे, ढमढेरे, मोरे पेशवा पायगुडे, पाटणकर, निबांळकर देवकाते , अनेक मराठे घराणे ज्याच्या नेतृत्व खाली उदयशी आले वरील घराणे सह इतर सर्व मराठा ने हिंदुस्थानाचा राष्ट्रगाडा चालविला ते थोरले शाहू महाराजांचे नेतृत्वाखाली त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्र🌞🌞 छत्रपती थोरले शाहू महाराज 🌞🌞यांच्या ३१६व्या राज्याभिषेक दिन निमित्त विन्रम अभिनंदन व तमाम भारतीयांना शिवमय शुभेच्छा💪💪🤺🤺⚔⚔
🌙🌙जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय जय शंभुराजे जय थोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) 🌙🌙
🙏🙏छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्र व मराठे साम्राज्य चा संस्थापक छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या राज्याभिषेक दिना निमित्त विन्रम अभिवादन 🙏🙏
🚩🚩अखंड हिदुस्थानावर राज्य करणार छत्रपती संभाजी महाराज यांचा पुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा पोवाडा🚩🚩
⚔⚔।।मराठयाचा जरीपटका।।
।।तुम्ही अटकेपार नेला।।
।।दरियावरच्या शिवाजीस
तुम्ही आपुला केला।।⚔⚔
⚔⚔।।अहद पेशावर तहद तंजावर।।
।।साम्राज्य स्वप्न पुर्ण केले।।
मराठा रियासतीचे आपण छत्रपती स्वामी झाले।।⚔⚔
⚔⚔दख्खनेच्या घेडीस पाजले यमुनेचे पाणी।.
।।शत्रूला ही भुरळ पाडी ऐसी मधाळ वाणी।।⚔⚔
⚔⚔।।अटकेपार रोविले झेडे ते मानाजी पायगुडे।।
।। आजही उत्तरेत घुमती त्याचा पराक्रमी चौघडे।।⚔⚔
⚔⚔।।शिदेशाही होळकरशाही।।
।।स्वामी आपण घडविली।।⚔⚔
⚔⚔।।हिदुस्थानचे देशमुख ।।
असा तुमचा दरारा।।
।।मराठयाच्या टापाखाली आणाला हिदुस्थान सारा।।⚔⚔
⚔⚔।।दिल्लीचेही तख्त राखिले।।
।।परख्याची मिजास लागली उतरू।।⚔⚔
⚔⚔।।शिवछत्रपतीचे स्वप्न पुर्ण केले।।
ते थोरले शाहू अजातशत्रू.. अजातशत्रू... अजातशत्रू।।⚔⚔
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडून संयमित व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडून आक्रमकता घेऊन 50 वर्षे हिदुस्थानचे राज्य कारभारी करणार एकमेव छत्रपती थोरले छत्रपती शाहू याना त्याच्या राज्याभिषेक दिन मानचा मुजरा मानचा मुजरा........।।🚩🚩
⛳⛳राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संतोष झिपरे9049760888⛳⛳

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...