विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 19 January 2024

पाटेगाव येथील मौनी बाबा यास छत्रपती संभाजी महाराजांनी दिले वर्षासन

 

🔥

पाटेगाव येथील मौनी बाबा यास छत्रपती संभाजी महाराजांनी दिले वर्षासन🔥
🔥राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०९८८८
पाटगाव येथील मौनी बाबा यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची गुरु म्हणून सापडतो कारण यांच्या मठात शिवाजी महाराज स्वतः जात असेल याबद्दल कागदपत्रे सापडतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज ही या ठिकाणी जाऊन आले आहे यावेळी सदर पत्र हे 1680 सालचा असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा काळ आहे यावेळी मौनी बाबा यांना पालखी असून त्यास वाजंत्री व भोई नाही देवाची व सिद्धी पुरुषाची पालखीतून येताना जाताना उचलून नेण्यासाठी व वाहण्यासाठी भोई लागतात तसेच त्यांच्या आगमनाची सूचना परिसरातील लोकांना व्हावी म्हणून वाजंत्री लागतात ही बाब छत्रपती संभाजी महाराजांच्या लक्षात आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी सव्वाशे रुपये खर्च देऊन सदर भोई आणि वाजंत्री यांची सोय केली आहे असे सदर पत्रातून दिसून येते आणि तो दर साल देण्याविषयी आपल्या देशाधिकारी या सूचना दिल्या आहेत
🌞🌞🌞🌞🌞
लेखांक २८१ श्री १६०२ आश्विन शुध्द १
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ७ रौद्र नाम सवत्सरे आश्विन शु॥ प्रतीपदा इदुवासर क्षत्रियकुलावतस श्री राजा शभु छत्रपति याणी राजश्री गणोराम देशाधिकारी व देशलेखक प्रात कुडाळ यासी आज्ञा केली असी जे तुह्मी हुजूर येऊन स्वामीस विनति केली की राजश्री मौनी गोसावी पाटगावी रहातात बहुत थोर ईश्वर पुरुष आहे त्यास पालखी आहे परतु नेहमी भोई नाहीत तरी नेहमी भोई व वाजत्री नेहम करून देविले पाहिजे यावरून वरशास भोयास व वाजत्रियास मोईन होन निशाणी १२५ सवासे करून दिले आहेती यात भोई व वाजत्री ठेऊन देणे ते सेवा करितील तुह्मी सदरर्हू पैके तुरुतगिरी शिष्य गोसावियाचा आहे, त्याजवळ पावीत जाणे ते भोयास व वाजत्रियास हक पावितील सदर्हू मोईन ई॥ सालमजकुरापासोन केली असे यासी वाजत्री तुह्मी ठेविली आहे भोई ठेऊन देणे आहे यैसीयासि वाजत्री ज्या दिवसापासून सालमा। ठेविले असाल ते दिवसापासून वाजत्रियास वरशास पचवीस होनप्रमाणे पाववणे उरले शभर होन यासी भोई ज्या दिवसापासून ठेवाल ते दिवसापासून सालमाचे हक पाववणे पुढे सदर्हू शभर होन भोयास व पचवीस वाजत्रियास याप्रमाणे साल दर साल पावीत जाणे आणि धर्मार्थ ह्मणून गोसावीयाचे नावे खर्च लिहीत जाणे ताजा सनदेचा उजूर करीत न च जाणे गोसावी कुशल असतील तो ठेवीत जाणे असल गोसावीयाच्या शिष्यापासी देऊन तालीक सुभा विले लावणे सदरहू सवासे होन निवल देविले आहे, तियासी वजावाटाव माफ असे
लेखनालंकार
रुजु सुरुनिवीस रा। छ १६ माहे रमजान
छ २९ शाबान माहे शाबान सुरू सूद बार बार
श्रीशंकर पौ। छ २९ रमजान
🌞🌞🌞🌞🌞
लेख व माहिती संकलित संतोष झिपरे
राजमाता जिजाऊंनी घडविलेले, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दीन...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वास शोभेल असा मराठ्यांचा राजपुत्र आजच्याच दिनी या महाराष्ट्र देशाचा छत्रपती झाला....
श्री शंभुराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
संकटांच्या भयाण शांततेत कर्तृत्वाचे गगनभेदी नगारे वाजविणार्या शिवपुत्राचा राज्याभिषेक...
द्या बत्ती तोफांना.. कळु द्या जगाला.. आपलं राजं छत्रपती झालयं.🚩
श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा...🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...