©माहिती व संकलन :-अनिल दुधाणे.
शिलालेख क्रमांक १
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील पाबळ शिक्रापुर रोड वरील मौजे मुखई गावातील मुख्य रस्त्यालगत गाव वेशीच्या आत असलेल्या मारुती मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या वर कोरलेला आहे शिलालेख गणेश पट्टीच्या वर असून दोन शिळेत दोन्ही बाजूला विभागला आहे पहिला लेख ६ ओळींचा शुद्ध मराठी भाषेत आहे तर दुसरा लेख ५ ओळीचा आहे .दोन्ही लेख खोदीव स्वरूपाचा असून रंग रंगोटी मुळे अस्पष्ट झाला आहे सध्या रंग काढल्यामुळे अक्षरे नीट दिसत नाहीत.ती पुसट झाली आहेत दगड तुटल्या मुळे काही अक्षरे खंडीत झाली आहेत.
.
गावाचे नाव :मुखई ता.शिरूर , जि. पुणे.
शिलालेखाचे वाचन :
उजवीकडील
१ श्री नाथ प्रसन्न
२ श्री मारुतीरायाचे देवाले
३ चरणी तत्पर राजे श्री येसा
४ जी पा.पलांडे मो .बाळो
५ जीपा वलद लखमोजी
६ पलांडे पा मौजे मुखई
डावीकडील वाचन -:
१ सु मा ई सन ११७६
२ सके १६८९ सर्वजित ना
३ म सवतछरे माहे वै
४ शाख वद्यपंचमी
५ सुरुवांतस्य.
जी.पी.एस. :१८ ७४ ”४७ ’९६ ,७४ ०९. ’’७९’ ७७
शिलालेखाचे स्थान : मंदिराच्या गाभाऱ्याच्या गणेश पट्टीच्या वर दोन भागात वरती कोरलेला आहे.
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : मंदिराचे बांधकाम चालू /पूर्ण केल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : -सुहूर मास ई सन ११७६ शके १६८९ सर्वजित नाम संवत्सरे
काळ वर्ष : सतरावे शतक = १८ मे १७६७ (सु मा ई-सुहूर मास सन ११७६)
कारकीर्द :- श्रीमंत माधवराव पेशवे
व्यक्तिनाम:- येसाजीपाटील ,बाळोजी पाटील ,लखमोजी पाटील पलांडे
ग्रामनाम :-मौजे मुखई ,
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे . श्री .अनिकेत राजपूत
प्रकाशक :विदर्भ संशोधन मंडळ नागपूर –अंक २०२१ पान ७३-७६
संक्षेप :- पा-पाटील. मो - मोकदम / मुक्काम, तरफ –तर्फ ,संवछरे-संवत्सरे ,सुमाई –सुहूर मास इसवी ,देवाले –देवालय
संदर्भ-(IE VI-३३६)
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १६८९ व्या वर्षी सर्वजित नाम संवत्सरातील माहे वैशाख वद्य पंचमी ला म्हणजेच १८ मे १७६७ च्या दिवशी भैरवनाथ चरणी तत्पर असलेले चाकण परगण्यातील मौजे मुखई येथील गावाचे मोकदम लखमोजी पाटील पलांडे यांचे पुत्र येसाजी व बाळोजी पाटील - यांनी श्री मारुतीरायाचे मंदिर बांधले किवा त्याचा जिर्णोधार केला .
शिलालेख क्रमांक २
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील पाबळ शिक्रापुर रोड वरील मौजे मुखई गावातील मुख्य वेलू नदी लगत गाव हद्दीत असलेल्या विठ्ठल रुखमाई मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या वर कोरलेला आहे शिलालेख गणेश पट्टीच्या वर असून दोन शिळेत दोन्ही बाजूला विभागला आहे पहिला लेख ७ ओळींचा शुद्ध मराठी भाषेत आहे तर दुसरा लेख ८ ओळीचा आहे .दोन्ही लेख खोदीव स्वरूपाचा असून रंग रंगोटी मुळे अस्पष्ट झाला आहे सध्या रंग लावल्यामुळे अक्षरे नीट दिसत नाहीत.ती पुसट झाली आहेत
.गावाचे नाव :मुखई ता.शिरूर , जि. पुणे.
शिलालेखाचे वाचन :
डावीकडील वाचन :-
१ श्री .....र म प्रा
२ श्री पांडुरंग
३ चरणी तत्प
४ र राजेश्री धर्मो
५ मोजी वलद
६ लखमोजी पा
७ टील पलांडे
८ मौजे मुखई.
उजवी कडील वाचन :-
१ श्री गणेश प्रा
२ सूर सनती
३ राजे सन ११९९
४ सके १७११ सौ
५ म्या नाम सवत
६ छरे माहे आ
७ श्वीन सुध ६
जी.पी.एस. :१८ ७४ ”२७ ’५९ ,७४ ०९. ’’८८’ ९३
शिलालेखाचे स्थान : मंदिराच्या गाभाऱ्याच्या गणेश पट्टीच्या वर दोन भागात वरती कोरलेला आहे.
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : मंदिराचे बांधकाम चालू /पूर्ण बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - सन ११९९ शके १७११ सौम्य नाम संवत्सरे अश्विन शुद्ध ६
काळ वर्ष : सतरावे शतक = =२४ सप्टेंबर १७८९
कारकीर्द :- श्रीमंत सवाई माधवराव पेशवे
व्यक्तिनाम:- धर्मोजी पाटील पलांडे ,लखमोजी पाटील पलांडे
ग्रामनाम :-मौजे मुखई
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे . श्री .अनिकेत राजपूत
प्रकाशक :विदर्भ संशोधन मंडळ नागपूर –अंक २०२१ पान ७३-७६
संक्षेप :- पा-पाटील,वलद –वडील,सके –शके,सौम्या –सौम्य,सवतछरे –संवत्सरे , आश्विन –अश्विन , सुध-शुद्ध
संदर्भ-(IE VI-३८१)
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १७११ व्या वर्षी सौम्य नाम संवत्सरातील अश्विन शुद्ध ६ ला म्हणजेच २४ सप्टेंबर १७८९ च्या दिवशी पाडुरंग चरणी तत्पर असलेले चाकण परगण्यातील मौजे मुखई येथील गावाचे मोकदम धर्मोजी पाटील पलांडे यांचे पुत्र लखमोजी पाटील पलांडे - यांनी श्री पांडुरंगाचे मंदिर बांधले किवा त्याचा जिर्णोधार केला .
शिलालेख क्रमांक ३.
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील पाबळ शिक्रापुर रोड वरील मौजे मुखई गावातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या वर कोरलेला आहे शिलालेख गणेश पट्टीच्या वर असून दोन शिळेत दोन्ही बाजूला विभागला आहे पहिला लेख ६ ओळींचा शुद्ध मराठी भाषेत आहे तर दुसरा लेख ६ ओळीचा आहे .दोन्ही लेख खोदीव स्वरूपाचा असून रंग रंगोटी मुळे अस्पष्ट झाला आहे सध्या रंग लावल्यामुळे अक्षरे नीट दिसत नाहीत.ती पुसट झाली आहेत.
.गावाचे नाव : मु.पो. मुखई ता.शिरूर , जि. पुणे
शिलालेखाचे वाचन :
डावीकडील वाचन :-
१ श्री
२ श्री मार्तंड चेरणी चे तत्प
३ र राजेश्री बाळोजी
४ पाटील पलांडे वलद ल
५ खमोजी पाटील पलांडे
६ मोकदम मौजे मुखई
.
उजवी कडील वाचन :-
१ श्री
२ सू मा वा सन ११८१ आकरा
३ से एक्यासी शके १६९३ खर
४ नाम संवतसरे माहे आसवि
५ न वदे पंचमी मंगळवा
६ र xx सु प्रसन्न शुभवतु
जी.पी.एस. :१८ ७४ ”४७ ’५४ ,७४ ०९. ’’८८’ ९९
शिलालेखाचे स्थान : खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्याच्या गणेश पट्टीच्या वर दोन भागात वरती कोरलेला आहे.
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : मंदिराचे बांधकाम चालू /पूर्ण बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - सन ११८१ शके १६९३ खरनाम संवत्सरे. अश्विन वद्य ५
काळ वर्ष : सतरावे शतक =९ऑक्टोंबर १७७०{मंगळवार}
कारकीर्द :- श्रीमंत माधवराव पेशवे
व्यक्तिनाम:- बाळोजी पाटील पलांडे ,लखमोजी पाटील पलांडे .
ग्रामनाम :-मौजे मुखई
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे .
प्रकाशक :विदर्भ संशोधन मंडळ नागपूर –अंक २०२१ पान ७३-७६
संक्षेप :- पा-पाटील. वलद –वडील , सूमा वा-सुहूर मास सन आसविन-अश्विन, वदे-वद्य
संदर्भ-(IE VI-३४३)
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १६९३ व्या वर्षी खर नाम संवत्सरातील अश्विन शुद्ध ५
ला म्हणजेच ९ऑक्टोंबर १७७०मंगळवार च्या दिवशी मार्तंड तत्पर असलेले चाकण परगण्यातील मौजे मुखई येथील गावाचे मोकदम लखमोजी पाटील पलांडे यांचे पुत्र बाळोजी पाटील पलांडे - यांनी श्री मार्तंड खंडोबाचे मंदिर बांधले किवा त्याचा जिर्णोधार केला .
शिलालेख क्रमांक ४
हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील पाबळ शिक्रापुर रोड वरील मौजे मुखई गावातील मुख्य रस्त्यालगत गाव हद्दीत असलेल्या काळभैरव नाथ मंदिराच्या सभामंडपाच्या आडव्या तुळई खांबावर कोरलेला आहे. शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून ४ ओळींचा आहे लेखाचा दगड फारच ओबड धोबड आहे लेख खोदीव स्वरूपाचा असून रंग रंगोटी मुळे अस्पष्ट झाला आहे सध्या रंग काढल्यामुळे अक्षरे नीट दिसत नाहीत.ती पुसट झाली आहेत दगड तुटल्या मुळे काही अक्षरे खंडीत झाली आहेत.
.गावाचे नाव :मुखई ता.शिरूर , जि. पुणे.
शिलालेखाचे वाचन :
१. श्री सके १५
२. ३४ परिधावी स
३. वत्सरे जेष्ठ सुध पाडिवा सोनजी
४. पाटील बीन मठा पाटील मुकादम पाबळ
जी.पी.एस. :१८ ७४ ”४७ ’९६ ,७४ ०९. ’’७९’ ७७
शिलालेखाचे स्थान : मंदिराच्या सभामंडपात आडव्या तूळई वर वरती कोरलेला आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : मंदिराचे बांधकाम चालू /पूर्ण बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : - शके १५३४ =परिधावी नाम संवत्सरे
काळ वर्ष : सतरावे शतक = २३ मार्च १६१२ ते-११ मार्च १६१३
कारकीर्द :- निजामशाही ,जहागीर शाहजी राजे भोसले .
व्यक्तिनाम:- सोनजी पाटील ,मठा पाटील
ग्रामनाम :-मौजे पाबळ
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे . श्री .अनिकेत राजपूत
प्रकाशक :विदर्भ संशोधन मंडळ नागपूर –अंक २०२१ पान ७३-७६
संक्षेप :- पा-पाटील. मो - मोकदम / मुक्काम, तरफ –तर्फ ,संवछरे-संवत्सरे ,
संदर्भ-(IE VI-२६-२८ )
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १५३४ व्या वर्षी परिधावी नाम संवत्सरातील म्हणजेच २३ मार्च १६१२ ते-११ मार्च १६१३ च्या दिवशी चाकण परगण्यातील मौजे मुखई येथील गावाचे मोकदम मंठा पाटील सुत सोनजी पाटील - यांनी श्री काळभैरवनाथाचे मंदिर बांधले किवा त्याचा जिर्णोधार केला .
शिलालेखाचा महत्व :- पुणे जहागीर ही शहाजी राजे भोसले यांना वडिलोपार्जित होती .त्या त्या वेळेस पुणे परगणा निजामशाही च्या अंकित होता .प्रचंड धामधुमीचा काळ असताना देखील मुखई गावाचे सोनजी पाटील यांनी आपले कुळदैवत भैरवनाथाचे मंदिर बांधले .हेच या शिलालेखाचे विशेष महत्व आहे .
मुखई चे पलांडे इनामदार पाटील घराणे माहिती.
१. मुखई चे पलांडे पाटील हे मुळचे कोकणातील खेड तालुक्यातील घराणे आहे .
२.मुखई च्या पलांडे इनामदार येथील काळभैरवनाथ हे त्याचे कुळदैवत असून काळभैरव आहे
३. सरदार बाळोजी पलांडे यांनी मुखई आणि आजूबाजूच्या गावे इनाम दिली होती म्हणून इनामदार हे नाव पडले.आजही मुखई येथील जमीनी इनामी आहेत .
४.बाळकोजी पलांडे हे रायगडचे ही काही काळ किल्लेदार होते बापू गोखले यांनी त्यांच्या कडून किल्ला घेतला (संदर्भ :-रायगड जीवन गाथा )
५.मराठ्यांनी दिल्ली काबीज केली तेव्हा बाळोजी पलांडे हे दिल्लीच्या किल्ल्याचे किल्लेदार होते त्यावेळेस मुघल बादशाह यांच्याकडून १४ रुपये तनखा दिली असा एक उल्लेख आहे.
६.मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ६ –श्री शके १६८२ शुद्ध ४ चे पत्रात बाळोजी पलांडे इनामदार पाटील हे पानिपतावर नारो शंकर यांच्या सोबत होते पानिपता नंतर ते फौज घेवून सुखरूप माघारी परत आले (पत्रातील वृतांत असा --नारो शंकर व बाळोजी पलांडे दिल्लींत होते. दोन चार हजार फौज होती. ते पुढील पुढें निघाली. मागोन राजश्री मल्हारजी होळकर आले. हे लडाईंतून अगोधरीच निघाले होते. यांजवळी प्रस्तुत आठ दहा हजार फौज आहे. आमचीं घोडी अवघीं दिल्लीच्या वरले सुमारे राहिलीं. तेव्हां कठीण प्रसंग येऊन पडला ! मग डोल्या करून, रातबिरात करून, श्रीपांडुरंगाच्या प्रतापें व वडिलांच्या पुण्येंकरून कुंभेर भरतपुरास आलों या वरून शिलालेखात असलेले बाळोजी पाटील पलांडे इनामदार यांचा पानिपत युद्धात प्रत्येक्ष सहभाग होता.
७.पानिपत लढाई च्या जमा खर्चाच्या यादीत हरजी पलांडे व चांगोजी कदम यांच्या कडे ५०००० रूपये दिल्याची नोंद आहे .
©माहिती व संकलन :-अनिल दुधाणे.
No comments:
Post a Comment