स्वराज्याच्या आरमाराचा उदय होण्याआधी सागरावर पोर्तूगीज आरमाराचा अंमल चालत असे..‘सागरावर आमचीच मालकी आहे त्यामुळे आमच्या परवान्याशिवाय कुणीही समुद्रात संचार करू नये’ अशी गर्जना पोर्तूगीज करीत, त्यांच्या परवान्याशिवाय आदिलशाहच काय पण, दिल्लीचा मोगल बादशाहही मक्केच्या यात्रेला जायचे असेल तर, पोर्तुगीज परवाना काढूनच गलबतात बसे..! पण १६७८ नंतर स्वराज्याचे आरमार पोर्तुगीजांची तमा न बाळगता बिनदिक्कत समुद्र संचार करू लागले, पुढे महाराजांचे व पोर्तुगीजांचे चौथाईवरून वितूष्ट आले तेव्हा महाराजांनी त्यांची जहाजेच जप्त करून टाकली..
पोर्तुगीजांप्रमाणेच इंग्रजांनाही महाराजांच्या आरमाराची चुणूक खांदेरी-उंदेरीच्या लढाईत १६८९ साली पाहायला मिळाली होती.. इंग्रजांनी एका पत्रात अशी बढाई मारली होती की..., ‘शिवाजी महाराजांची गलबते अगदीच लहान असून आपले एक गलबत देखिल त्यांच्या १०० गलबतांचा धुव्वा उडवू शकेल...! पण लवकरच त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला... खांदेरीच्या युद्धात मराठा आरमाराने एवढा पराक्रम गाजवला आणि इंग्रजांच्या Revenge व Hunter या लढाऊ जहाजांना एवढे झोडपून की, इंग्रजांच्या तोंडचे पाणी पार पळाले..
अखेर We Shall Not Be Able Long To Oppose Him (दीर्घकाळापर्यंत आम्ही महाराजांशी टक्कर देऊ शकत नाही किंवा These Little Boates Deceive us to Admiration (म्हणजे महाराजांच्या सरपट्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवितात) असे हताश उद्गार काढणे त्यांच्या भाळी आले...
जय जिजाऊ जय शिवराय..
――――――――――――
सचिन इंगवले
No comments:
Post a Comment