गजेंद्रगड हा बदामीच्या पश्चिमेस २८ मैलावंर एक खेडे आहे. हे पूर्वी श्रीमंत मुधोळकर घोरपडे सरकार यांच्याकडे होते. येथे राजा भोजनी बांधलेला एक किल्ला आहे. येथील उंचगिरी नावाचा दुसरा किल्ला १६८८ ला श्रीमंत दौलतराव गजेंद्रगडकर घोरपडे सरकार यांनी बांधला..
येथील घोरपडे सरकारांना हिंदुराव ही पदवी आहे. श्रीमंत बर्हिजी घोरपडे सरकार यांनी राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत गजेंद्रगड व गुत्ती मिळविली. सरसेनापती संताजी हे श्रीमंत बर्हिजी गजेंद्रगडकर घोरपडे सरकार यांचे भाऊ होय. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वंशजांना पुढे कापशी (सेनापती कापशी) गाव इनाम मिळाल्याने त्याच्या वंशजास कापशीकर घोरपडे सरकार नाव पडले व श्रीमंत बर्हिजी घोरपडे हे गजेंद्रगडला राहिल्याने त्याच्या वंशास गजेंद्रगडकर घोरपडे सरकार म्हणूं लागले. श्रीमंत बर्हिजी गजेंद्रगडकर घोरपडे यांचा वडील मुलगा हा बावीस वर्षांचा असतानाच एका लढाईंत ठार झाले. त्याचे धाकटे भाऊ शिदोजी यांना हिंदुराव ममलकतमदार जफ्तनमुल्क फत्तेजंग समशेर बहादूर सेनापती अशी पदवी होती. कोल्हापुरची महालक्ष्मी देवीची मुर्ती यवनी आक्रमनाच्या भयामुळे मध्यंतरीं दुसरीकडे लपउन ठेविली होती, तीची (महालक्ष्मी) पुन्ह प्रतीष्ठापना कोल्हापुरच्या राज्याची स्थिरस्थावर होताच श्रीमंत शिदोजीराव गजेंद्रगडकर घोरपडे सरकार यांनी (२६ सप्टेंबर) ला केली. त्याबद्दल गजेंद्रगडकर घोरपडे सरकारांना देवीच्या प्रधानकीचीं वस्त्रे व पाच गावची सरदेशमुखी इनाम मिळाली..
श्रीमंत शिदोजी गजेंद्रगडकर घोरपडे सरकार हे पेशव्यांना अनुसरून वागे. याचे श्रीमंत मुरारीराव, श्रीमंत दौलतराव व श्रीमंत भुजंगराव असे तीन पुत्र होते. पैकी श्रीमंत भुजंगराव गजेंद्रगडकर घोरपडे हे वयाच्या २० व्या वर्षी एका लढाईंत मरण पावले. श्रीमंत मुरारीराव गजेंद्रगडकर घोरपडे सरकार हे पराक्रमी होते. ते जवळ जवळ स्वतंत्र वागायचे त्यांच्या पदरी कवायती पलटणी असल्याने त्यांचा दरारा निजाम, सुलतानी व इंग्रज यांस त्या प्रांती चांगलाच असे,
श्रीमंत मुरारीराव घोरपडे गजेंद्रगडकर घोरपडे सरकार हे छत्रपती तर्फे तिकडे बंदोबस्त ठेवी. श्रीमंत मुरारराव गजेंद्रगडकर घोरपडे सरकार हे बहुदा गुत्तीस राहायचे वीस पंचवीस लाखांचा प्रांत त्यांनी काबीज केला होता. अनेक कारकिर्दी त्यांनी पाहिल्या होत्या. इंग्रजांसही यांनी अडचणीत मदत केली होती. श्रीमंत मुरारराव घोरपडे यांच्याकडे गुत्ती व श्रीमंत दौलतराव घोरपडे यांच्याकडे गजेंद्रग अशी वाटणी छत्रपतींनी स्वताहा करून दिली होती,
संदर्भ - डफ:कैफियत बिजापूर ग्याझे राजवाडे खंड, ७.११
@sarsenapati_santaji_ghorpade
No comments:
Post a Comment