विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 February 2024

!! सरदार रामजीराव नाईक गलांडे!!

 


!! सरदार रामजीराव नाईक गलांडे!!
पेशव्यांच्या वतीने हैदराबाद परगणे येथील कामवीसदार गोविंदराव यास लष्करीतील सरदार असणाऱ्या सरदार रामजीराव नाईक गलांडे यांनी लिहिलेले पत्र असुन असून त्यांच्या स्वतःचा लष्करी असावं असे सदर पत्रावरून दिसून येते तसेच आपल्या अखातिरत्यातील शिपायांची पगार या ठिकाणी न झाल्याने सदर पत्र हे त्यांनी आपले कामवीसदार हैदराबाद परागणे यास लिहिले असून जर सैनिकांची पगार न झाल्यास येणाऱ्या अडचणी व पाठीमागील थकीत पगार यांची ताबडतोब फडावरून घेऊन पाठवून देणे बद्दल सदर पत्र रामजीराव नाईक यांनी कामवीसदार गोविंदराव यांना दिले आहे जर सैनिकांचा पगार थकल्यानंतर काय अडचणी येतात हे या पत्राद्वारे आपणास निदर्शनास येते तत्कालीन काळातील लष्करी प्रशासनाच्या हिशोबाने हे पत्र अत्यंत महत्त्वाचे आहे
श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं.
विनंति. उपरि प्यादे दि॥ रामजी नाईक गलांडे नि।। सरकार यास पेशजी माहागाईमुळें पटणचे स्वारींत व हैदराबादीं आगाव ज्याजती रोजमरे च्यार, खर्चास नाहीं सा, दिले; तो यैवज उगवून घेतला पाहिजे. येविषयीं तुह्मास जातेसययीं सांगितलें होतें. परंतु अद्याप यैवजाचा फडच्या करून घेतला नाहीं. तर येविषीं राजश्री नानास विनंति करून यैवज उगवावा. न उगविल्यास हे गरीब बुडतात; व आपला यैवज फसतो. याची काळजी आपणास असावी. याजकरितां लिं असे. तर हें काम आधीं करून घ्यावें. येविषीं बगाजी प्यादाही तुह्मा समागमें स्मरण द्यावयास दिल्हा आहे. तर यैवज उगवून घ्यावा. रोजमरे तैनात इजारा करून घेण्याची याद तुमचे रूबरू केली होती. ती रोजमुरे याचा यैवज उगऊन घ्याल त्याने समागमें करून घ्यावी. पेशजी रोजमरे आगाव पावले च्यार व यासिवाय तुह्मी गेलियावर आणखी येक रोजमरा ईजाफा, खर्चास नाहीं, ह्मणोन दिल्हा. येकूण रोजमरे पांच. याचा यैवज ष्याद्याकडून उगविला पाहिजे. याजकरितां हे पेचांत; व आपला यैवज उगविला पाहिजे. तर सरकारांत बोलून यैवज उगवावा ह्मणजे हे पेचांतून निघतील; व आपलाही यैवज उगवेल. तर पत्र पावतांच कामाचा फडच्या करून घ्यावा. र॥ छ. १५ जिल्हेज हे विनंति.
१८
राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०८८८
_____________

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...