विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 February 2024

छत्रपती!!

 


छत्रपती!!
हि सातारकर अन कोल्हापूरकर भोसले घराण्याची अधिकृत बिरुदावली. छत्रपती म्हणजे आज हि पांढरीचा बापच.
अनेकदा आपल्या सोयीनुसार छत्रपती ह्या बिरुदावली नंतर बहुजनप्रतिपालक कुळवाडीभूषण अशा अनऐतिहासिक असणाऱ्या अनेक खोट्या व मनाच्या बिरुदावल्या लावल्या जातात.
खरतर छत्रपती घराणे हें हिंदूधर्माभिमानी. याच कारण छत्रपती स्वतःला हिंदुपदपातशहा म्हणवतात. नुसत म्हणत नाही तर त्यांच्या प्रत्येक शुभ प्रसंगी ललकारी दिल्या जातात त्याचा शेवट महाराज हिंदूपदपातशहा असच केला जातो.
कोल्हापूरच्या राजचिन्ह मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांचा उल्लेख "श्री सूर्यकुलवंशी धर्मरक्षक श्री शिवाजी महाराज मराठा राज्य संस्थापक" अशा बिरुदावल्यांनी केलेला आहे.
छत्रपती घराण्यातील काही ऐतिहासिक ललकाऱ्या.
रथातून उतरून चालतात छत्रपती चालतात त्यावेळी.
“आस्ते कदम, पेश निगाह, ल्याहज बर कदम, जहां आ रहा है, मुमलेकत पराईये, ल्याहाजबर कदम, बरताहत, अरपत महाराज छत्रपती हिंदुपदपातशहा "
२] महाराज देवदर्शन घेतात त्या वेळी
''समर्थ सदानंद तुळजाभवानी, छत्रपती कुलस्वामिनी, रक्ष रक्ष देवी परमेश्वरी, महाराज छत्रपती हिंदूपदपातशहा"
प्रसाद घेताना
“भगवान उम्र दौलतको बढती देवे, प्रभू करवीरकी दौलत जशवंत रहे, महाराज छत्रपती हिंदूपदपातशहा. "
३) महाराज छत्रपतींच्या परंपरागत तख्ताला मुजरा करतात त्या वेळी-
"छत्रपती महाराजोंका ताज तख्त दायमा सर सब्जता, बाण द्रक्षान रही जियो, महाराज छत्रपती हिंदूपदपातशहा "
तख्तावर बसताना-
" जयभवानी हे बोलके छत्रपती महाराज बैठे है तख्तपर, दलभार खड़े है निहाल तो परवाला, जरीपटका चमकते हैं हत्ती उप्पर, सो जनी लोड तक्या, बालिश्ता सदर सदरका गुल्, जमीनका फूल, चार बाजूको चार जलते हैं अगर, साब रखते हैं मगरीबकी खबर, हिरे कंकर, पाच और लाल जडे हैं तख्त पर, खडे है हुजरे, उड़ाते हैं चौरियाँ और मोर्चेल छत्रपती हिंदूपदपातशहा के उप्पर, हातमें माला,गले में हार, चमकते हैं पिशजीका चाँद, हमारे छत्रपती हिंदूपदपातशहा बडे धर्मावतार, तेग तीर फताली पातशहा नित्य माँगे सरस्वती ग्यान, ध्यान, सदा रहे महाराज सरपेच भगवान, महाराज छत्रपती हिंदूपदपातशहा. "
महाराजांना कोणी हार घालतात तेव्हा-
"आस्ते, आदबसे, तपावतसे "
महाराजांना अत्तर देतात त्यावेळी
" इत्र मुदत गुलाब, मुस्सा देखत दररूमाल सीधा कतमू अत्तर, अबजाबाद.
महाराजांना पान देताना-
'पान सीधाकत् निशियान्, सुपियारी कत्ता मूशक आव
बशान, एक रंग है पान. पान से मान देते है, महाराज छत्रपती हिंदूपदपातशहा.
महाराज तख्तावरून उठतात त्या वेळी-
"बिस्मिल्ला इलाही, दौलत दिलावरी, जादा हरमैदान बोलबाला रहे.'
महाराज समारंभानंतर निघून जाताना-
"दोतर्फ निगाह फर्माके, बर्मी ना बर्मेशू बर्मे कदम बराखे, बर बुलंदी बर बौला महाराज छत्रपती हिंदूपदपातशहा. '
जिथं स्वतःला छत्रपती धर्मरक्षक व हिंदुपदपातशहा म्हणवतात. तिथं इतर कोण काय म्हणत ह्याला काही किंमत नाही. आमच हिंदूत्व ह्या छत्रपतींच्या हिंदूपदपातशाही चे आहे.
संदर्भ
कोल्हापूर दर्शन
उमेश दत्तात्रय वैद्य।

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...