विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 February 2024

पानिपतवीर मर्द सरंजामी इनामदार भोईटे सरकार घराणे !!

 


पानिपतवीर मर्द सरंजामी इनामदार भोईटे सरकार घराणे !!
१.पानिपतयुद्धात मराठेशाहीचे बाजूने लढलेल्या तमाम सर्व झुंजार मराठे सरदारा पैकी सरदार भोईटे यांचे नाव येते. पानिपतवीर भोईटे सरकार घराण्याशी पानिपत शब्दाचे व युद्धाचे घनिष्ठ संबंध असून तो संपूर्ण महाराष्ट्री मनाचा सांस्कृतिक जडणघडणीचा भाग आहे.
२.पानिपत युद्धाच्या अगोदर इतिहासात पानिपतपूर्व दि.२४/१२/१७५९ च्या ठाणेश्वर-तरावडी युद्धाचे मराठा सैन्याचे नेतृत्व श्रीमंत जिवाजीराव भोईटे सरनोबत व त्यांचे कर्ते सुपुत्र नाईकजीराव भोईटे यांनी अब्दालीच्या आघाडीच्या सैन्याचा पराभव केला व यमुनाकाठच्या अडचणीच्या जागेतही सडे तलवारीनिशी झुंजून अब्दालीच्या छुप्या तोफगोळ्यांना सामोरे जावून स्वराज्यकार्यासाठी शहीद झालेले रणमर्द श्रीमंत जिवाजी भोईटे सरनोबत व त्यांचे सुपुत्र सरदार नाईकजीराव भोईटे हे भोईटे घराण्यातील वीर पुरुष होत.
३..बुराडी घाटावर १०/०१/१७६० रोजी जी बुराडी घाटाची लढाई झाली त्या लढाई पूर्वी भोईटे सरकार घराण्याचे रणमर्द सरदार शिवाजीराव भोईटे यांनीही २०/१२/१७५९ रोजी अफगाण सैन्याशी झुंज दिली होती.
४. बुराडी घाट(१४/०१/१७६०) युद्धात लढणारे तमाम भोईटे मंडळी विशेषतः सरदार येसाजीराव भोईटे यांची ससैन्य झुंज व जनकोजी शिंदेचा बचाव करणारी कामगिरी, यासर्व पानिपतपूर्व कामगिरीसह मुख्य पानिपत लढाईत लढलेले भोईटे शिलेदार मंडळी जे मराठ्यांचे सरंजामी सरदार होते.
५. शिंदेशाहीचे सोबती तसेच छत्रपती तथा पेशव्यांच्या हुजुरात पागेचे ५२ पागांपैकी एका लढाऊ पागेचे वीरयोद्धे बाळाजीराव भोईटे, कृष्णाजीराव भोईटे, तुळाजीराव भोईटे, इ. पानिपत रणांगनावर शहीद झाले
६.पानिपत युद्ध घटनेनंतर ग्वाल्हेरकडे मराठेशाही फौजा सुखरुप आणणारे कर्त्या मराठा मंडळीतील जानोजीराव भोईटे यांचाही प्रचंड मोठा वाटा होता. पानिपत युद्धानंतरही सुखरूप परत येवून माळव्यात मराठेशाही मामलती सांभाळणारे जयाजीराव भोईटे यांचाही प्रत्यक्ष सहभाग होता .
७.हिंगणगाव हे भोईटे घराण्याचे ऐतिहासिक वतन असून येथील पाटील घराण्याचा बळगोजी मोकदम असा उल्लेख इ. स. १६२८ साली आहे.
८. काळोजी भोईटे यांनी तळीये गावी जमीन विकत घेतलेचा संदर्भ १६८७ चा आहे. याच गावचे पाटील वंशज जानोजी भोईटे हे खोपडे देशमुख यांच्या वतन तंट्यात त्यांना जामीन होते.
९.सातारा संस्थानचे मातब्बर व छत्रपती निष्ठावंत श्रीमंत आबासाहेब भोईटे सरकार यांचा भुईकोट वाडा मोठा होता. तसेच, फलटण जहागीरदार नाईक निंबाळकर यांच्या वारस दत्तक प्रकरणी त्यांचा व भाऊ फौजदार यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. याच भोईटे सरकार यांचा आप्तसंबंध वाठारकर निंबाळकर अनुषंगाने असल्याचे नोंद आहे. हे भोईटे सरकार घराणे भोईटे इनामदार नावाने मशहूर आहे.
१०. सरनोबत राणोजी भोईटे हे ढेकाळ्याचे गढी जिंकताना कामी आले त्यांच्या मागे जिवाजी व नाईकजी बुराडी घाटावर कामी आले
संदर्भ : १.भाऊसाहेबांची बखर,
२.होळकरांची थैली,
३.द डिकेड आँफ पानिपत,
४.महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २
५..भोईटे घराणे माहिती: -श्री. राहुल भोईटे- तडवळेकर.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...