विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 February 2024

जावळी खोरे

 


जावळी खोरे
जावळी खोरे प्रतापगडच्या पूर्वेस दोन मैलावर आहे. डोंगर, टेकड्या, दर्या खोरी व निबीड अरण्य यांनी हा भाग व्याप्त आहे. मुसलमानी अंमलाच्या पूर्वीपासून मराठ्यांची वस्ती या खोर्यात होती. गुजर, मोरे, महाडिक, मोहिते, शिर्के ह्या खोर्यात रहात असत. शिर्के खुद्द जावलीस असत. यांच्यात एकमेकात नेहमी लढाया चालू असत.
विजापूरचा पहिला बादशहा युसुफ आदिलशहा (1489-1510) याने बारा हजार सैन्य देऊन चंद्रराव मार्याला जावलीच्या शिर्क्याना जिंकण्यास पाठवले. चंद्रराव मोर्याने शिर्क्याना जिंकून जावली खोर्यात बादशहाची सत्ता स्थापन केली. म्हणून बादशहाने मोर्याना चंद्रराव हा किताब बहाल केला. आणि नाममात्र खंडणी घेऊन तो प्रांत त्याला परत दिला. जावली खोर्यत मोर्यांची सत्ता सात पिढे चालू होती. 1647 मधे दौलतराव मोरे मरण पावला.
त्याला मूल नव्हते. हा स्वत:ला विजापूरच्या बादशहाचा नम्रसेवक समजत असे. दौलतरावच्या पत्नीने शिवाज ीमहाराजांच्या मदतीने व संमतीने यशवंतराव यास दत्तक घेऊन जावलीच्या गादीवर बसवले. त्या वेळी तो 35 ते 40 वर्षांचा होता. त्याला दोन मुले होती. तेव्हा ती दत्तक न घेती तर चावलीचे राज्य विापूरच्या राज्याने गिळंकृत केले असते. पण या मोर्याने शिवाजी महाराजांशी वैर आरंभले. महाराजांनी त्याला समजावण्याच खूप प्रयत्न केला.
पण समजावणीचे प्रयत्न व्यर्थ गेले. महाराजांचे वय त्या वेळी सव्वीस वर्षे होते. (शककर्ता शिवाजी) अखेरीस 27 जानेवारी 1656 रोजी शिवाजी माहाराजांनी संभाजी कावजीस मोर्यांवर हल्ला करण्यास पाठविले. पण मार्याने त्यांचा पराभव केला. म्हणून रघुनाथ बल्लाळ कारेरडे यास आणखी सैन्य देऊन पाठविले. हणमंतराव मोरे मारला गेला. आणि प्रतापराव मोरे विजापूरला पळून गेला. आणि जावली शिवाजी महाराजांच्या हाती आली. शिवाजी महाराज येथे दोन महिने राहिले. मुलुख समृद्ध होता. सर्व लोक शूर व काटक होते. महाराजांनी त्याची सैन्यात भरती केली. त्यामुळे महाराजांच्या सैन्याची संख्या दुप्पट झाली.
सगळ्या मावळ प्रांतावर महाराजांची राजवट सुरू झाली. सर्व लहान मोठे सरदार महाराजाना वश झाले रायगड किल्ला मोर्यांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी जावली घेतल्यावर वशवंतराव मोरे पळून जाऊन रायगडावर जाऊन राहिला. म्हणून महाराजांनी रायगडावर हल्ला केला. व तो घेतल्यावर वशवंतराव मोर्यास विजापूरची बाजू घेऊन आपल्याशी लढा केल्यपद्दल ठार मारले. त्याच्या दोन मुलाना कैद केले.
कैदेत असतानाही मुलांनी विजापूरकरांशी संधान बांधून महाराजांशी फितुरी आरंभिली. तेव्हा महाराजांनी त्या दोघांनाही ठार केले. अशा रितीन जावली निष्कटंक होऊन महाराजांची सत्ता रूढ झाली. पण प्रतापराव मोरे विजापूरास पळून गेलाच होता.तने मात्र शेवटपर्यंत महाराजांशी वैर केले. हा प्रतापराव चंद्रराव मोर्यांचा नातलग होता. जावलीच्या लढाईत मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम महाराांच्या नजरेस पडला. त्यांच्या पराक्रमावर खुष होऊन महाराजांनी त्याना आपल्या सैन्यत घेतले.
जावली अजिंक्य असल्याने खजिना ठेवण्यास हीच जागा निवडली. कृष्णाजी बाबाजी यास येथील सुभेदार व विरो राम यास मुजुमदार नेमण्यात आले. जावलीच्य जवळ पार घाटाच्या तोंडावर भोरप्या नावाचा डोंगर होता. राज्याच्या रक्षणास तो अतिशय उपयोगी आहे हे जाणून महाराजांनी या डोंगरावर मोरापंत पिंगळ्यांकडून या किल्ल्यावर तटबंदी उभारली. हे काम त्यानी उत्कृष्ट केले असे पाहून महाराजांनी पिंगळ्याना प्रतापगडावर तटबंदी उभारण्याची आज्ञा केली.
साभार संजय कोल्हटकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...