बाजीप्रभू देशपांडे, मुरार बाजी, प्रबोधनकार ठाकरे हेही यातीलच होत.
हे चंद्रवंशी राजा हैहय/कलचुरी वंशाचे क्षत्रिय आहेत.
यांचे 3 भेद= कायस्थ प्रभु,पाठारे प्रभु व चित्रगुप्त प्रभु.
मराठा कुळ प्रमाणेच यामधे पण एका कुळातील आडनावे वेगळी असतात.
हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू शिवशाहीपुर्वीपासूनच शिलाहार व यादव राजांच्या पदरी शिलेदारी करायचे हे अगदी स्पष्ट दिसते. मुळात प्रभू नावच या कायस्थ शब्दाच्या मागे चिकटले कारण त्यांचे प्रस्थ त्यावेळी मोठे होते, प्रभू म्हणजे मोठे जहागीरदार, जमीनदार किंवा वतनदार.
बहमनी काळात देखील कायस्थ प्रभू प्रशासन, व्यवस्थापन व शिलेदारीत अगदी ब्राह्मण व मराठ्यांच्या अगदी तोडीस तोड होते. यामुळेच कुळकर्णी, पाटील, देशपांडे, देशमुख, सरनाईक/किल्लेदार, सबनीस, पोतनीस, जामनिस, चिटणीस, कोटणीस, टिपणीस, खासनिस, फडणीस, कारखानीस अश्या अनेक पदांवर हे लोकं विराजमान होते.
शिवशाहित चिटणीस हे पद तर चित्रे घराण्याला पिढीजात देण्यात आले होते. तसेच प्रत्येक गडावर कारखानीस हा कायस्थ प्रभू असायचा (काही अपवाद वगळून).
शिवशाहित काही प्रमुख कायस्थ प्रभू असे--
गंगाधर मंगेशप्रभु/गंगाजी मंगाजी (स्वराज्याचे पागनीस आणि नंतर वाकनीस)
बल्लाळ उपाख्य बाळाजी आवजी चित्रे (चिटणीस) आणि बंधू चिमणाजी आवजी चित्रे (स्वराज्याचा पोतनीस), श्यामजी आवजी चित्रे (स्वराज्याचा कारखानीस).
नरहर बल्लाळप्रभू (स्वराज्याचा सबनीस).
नीळकंठ यशवंत/नीळो येसाजीप्रभु महाडकर (स्वराज्याचा फारसनीस).
मल्हार नारायणप्रभु चौबल (कोकणचा अधिकारी).
विश्वास नानाजीप्रभु दिघे/देशपांडे (अफजलखान प्रकरणी गुप्तहेर).
प्रयागजी अनंतप्रभू फणसे/पनवेलकर (अजिंक्यताऱ्याचा सुभेदार).
दादाजी नरसप्रभु गुप्ते/देशपांडे (रोहिडखोऱ्याचे देशपांडे).
बहिर्जी कावजीप्रभु देशपांडे (राजमाचीचा किल्लेदार).
आबाजी विश्वनाथप्रभू (जावळी मोहिमेत महत्वाचे योगदान दिले तसेच मुरार बाजी तथा बाजीप्रभूच्या परिवारास स्वराज्याशी जोडले) आणि बंधू गोविंद विश्वनाथप्रभू (सिंधुदुर्गचा किल्लेदार).
मुरार बाजीप्रभू महाडकर देशपांडे आणि त्यांचे भाऊ बाबाजी, यशवंतराव (पुरंदर, रुद्रामाळ/वज्रगडाचे किल्लेदार).
त्र्यम्बक भास्करप्रभु आणि चिरंजीव विठ्ठल त्र्यम्बकप्रभु महाडकर (पन्हाळ्याचे किल्लेदार).
पिलाजीप्रभु, त्यांचे चिरंजीव कृष्णाजीप्रभू, बाजीप्रभू, फुलाजीप्रभु प्रधान/हिरडसकर देशपांडे.
दादाजीप्रभु आणि त्यांचे चिरंजीव कृष्णाजी, रघुनाथ महाडकर देशपांडे.
चिमणाजी आणि बंधू बाबाजी बापूजीप्रभु खेडकर देशपांडे (शाहिस्तेखान स्वारीत सहभाग)
तिमाजी रुद्राजी वैद्य, मल्हार साबाजीप्रभु, मालजी काळूप्रभु देशपांडे, गोजाजी सोनप्रभु देशपांडे, जानोजी वैजाप्रभु देशपांडे, भानजीप्रभु देशपांडे, सोनाजी बापूजीप्रभु देशपांडे, महादजी दमाजीप्रभु दिघे, एकोजीप्रभु देशपांडे, आत्माजी रुपाजीप्रभु देशपांडे, मालप्रभु देशपांडे, महादजी रघुनाथप्रभू देशपांडे.
त्यांचे 40 कुळे पुढिलप्रमाणे=
1] गुप्ते 2]गरुडे 3]बेँद्रे 4]दळवी 5]नाडकर 6]दिक्षित 7]दिघे 8]गडकरी 9]राजे 10]श्रंगारपुरे 11]कर्णिक 12]प्रधान 13]रणदिवे 14]सुळे 15]पाटणे 16]ताम्हणे 17]फणसे 18]खाटिक 19]वैद्य 20]कोरडे 21]विवादे 22]दवणे/देसाई 23]चित्रे 24]उलुकंदे 25]चोबळ 26]ठाकरे 27]खळे 28]कामठे 29]नाचणे 30]शेटे 31]जयवंत 32]जावळे 33]सातपुते 34]पंगु 35]लिखते 36]वाघुळ 37]मोहिले 38]वखारे 39]मुके 40]देवपात्रे.
माहिती साभार राजे नरेश जाधवराव., विशाल बर्गे.
No comments:
Post a Comment