न्यायनिष्ठुर शिवराय
# प्रकाश लोणकर पोस्ट्स
गेल्या पिढीतील प्रख्यात इतिहास संशोधक आणि इतिहासकार सेतूमाधवराव पगडी यांनी लिहिलेल्या `श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ `ह्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत उद्भवलेला आणि महाराजांनी न्यायनिवाडा केलेल्या एका वादावरील लेख वाचायला मिळाला. वादाचे स्वरूप खेडेबारे येथील देशपांडे/कुलकर्ण पणाच्या अधिकाराविषयी भावकीतील भांडणे होते. ह्या वादात सखो भिकाजी देशपांडे हे वादी तर नारो बापुजी मुद्गल उर्फ देशपांडे हे प्रतिवादी होते.
सन १६३६ मध्ये मोगल व आदिलशाह यांच्यात तह होऊन शहाजीराजे विजापूर इथे आदिलशाही दरबारात रुजू झाले.त्यावेळी त्यांच्या आग्रहास्तव आदिलशहाने त्यांना पुणे आणि सुपे प्रांतांची जहागिरी दिली. आदिलशहाने शहाजीराजांना ताबडतोब कर्नाटक मोहिमेवर पाठविल्यामुळे आदिलशाही, मोगली संघर्ष तसेच भयानक दुष्काळामुळे शहाजीराजांना मिळालेल्या जहागीरीची अत्यंत दुर्दशा झाली होती. आपल्या जहागिरीचे पुनर्निर्माण करण्यासाठी शहाजीराजांनी जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या समवेत आपल्या विश्वासातील दादोजी कोंडदेव जे पुणे प्रांतातील पाटस परगण्यातील मल्ठनचे कुलकर्णी होते,यांना पाठविले होते. पुण्यात जहागिरीचे कामकाज पाहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कचेऱ्या, जिजाऊ, बालशिवाजी यांच्यासाठी तसेच अन्य कारभारी, सेवक, सैन्य यांसाठी सुयोग्य निवासस्थाने बांधण्यासाठी बराच अवधी लागणार असल्याने दादोजीनी प्रथम जिजाऊ आणि बालशिवाजी यांना खेडेबारे इथे नेले. तिथे काही दिवस बापुजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे यांच्या वाड्यात वास्तव्य झाले.नंतर जिजाऊ आणि महाराजांसाठी एक स्वतंत्र वाडा बांधून एक पेठ वसवून तिला शिवापूर नाव दिले. अशा प्रकारे नऱ्हेकर देशपांड्यांचा जिजाऊ आणि छ.शिवाजी महाराज यांच्याशी संबंध आला. पुढे बापुजींनी स्वराज्याकरिता भरपूर योगदान दिले. सन १६४७ मध्ये महाराजांनी बापूजींच्या मदतीने सिंहगड घेतला. शिवापुरकर देशपांडे शकावलीत याविषयीची नोंद अशी आहे...’ शके १५६९ राजश्री बापुजी पंतानी किल्ले सिंहगड घेऊन दिले.’ बापुजींचा एक मुलगा नारो बापू महाराजांच्या चाकरीत असून अफजलखान वध प्रसंगी त्याच्याकडे पायदळाची एक तुकडी होती.

बापुजी मुद्गल
चिमणाजी
बाळाजी(बाबाजी)
नारायण (नारो)
केशव
(सन १६७० मध्ये पुरंदर स्वारीत मारला गेला.)
चिमणाजी
आणि बाबाजी हि अन्य दोन मुले शाहिस्तेखानवरील छाप्यात शेवटपर्यंत
महाराजांबरोबर होती. वाद समजण्यासाठी वादी आणि प्रतिवादींच्या जरुरी
पुरत्या वंशावळी दिल्या आहेत.
बाळाजी
यांस सोनोपंत डबीर यांची मुलगी दिली होती. देशपांडे भावकीतील वादात
बाळाजीची सासू म्हणजे सोनोपंतांची पत्नी आबई हिने जावयासाठी आपल्या
प्रभावाचा गैरवापर केल्याचा वादी सखो भिकाजीचा आरोप होता.
वादी सखो भिकाजीची संक्षिप्त वंशावळ :
भिकाजी रुद्र *
सखो भिकाजी
नारो भिकाजी
रुद्रोबा
* हे नारो बापुजी बरोबर खेड कसबा आणि शिवापुरचे देशपांडे वतन चालवीत असत.
वादाचे नेमके स्वरूप: वादी सखोचे वडील भिकाजी व प्रतिवादी नारो बापू दोघे मिळून खेड शिवापुरचे देशपांडेपण चालवीत होते. जिजाऊ खेड कसब्यात राहत असताना नारो बापुजी शेजारील वाड्यात रहात होते. सखो बापूचे असे म्हणणे होते कि महाराजांबरोबर असलेल्या घरोब्याचा फायदा घेऊन नारो बापुजीने आपल्या वडिलांकडील खेडचे देशपांडेपण काढून आपल्याकडे घेतले.एवढ्यावरच नारो बापू थांबला नाही. सखो भिकाजीचा भाऊ नारो भिकाजी शिवापूर येथील कुलकर्णी होता.शिवापूर पेठेचा वार्षिक महसूल दरवर्षी कमी होण्यामागे तेथील कारकून कुलकर्णी जबाबदार असल्याचे नारो बापुजीने महाराजांना सांगून नारो भिकाजीचे कुलकर्णपण सुद्धा काढून घेतले.
फिर्यादी सखो भिकाजीने प्रशासनातील काही प्रभावशाली व्यक्तीं आणि प्रतिवादी नारो बापुजी यांचे सोयरेसंबंध असल्याची काही उदाहरणे फिर्यादीत देऊन त्या संबंधांचा न्यायनिवाड्यावर त्याच्या विरुद्ध परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. हि बाब लक्षात घेऊन फिर्यादीने महाराजांना त्याच्या फिर्यादीची सुनावणी दुसऱ्या गावात तटस्थ (प्रतिवादीच्या नात्यात नसलेली) व्यक्ती नेमून करावी अशी विनंती केली. हि विनंती मान्य करून महाराजांनी मुकुंद धोंडदेव अत्रे हवालदार, जनार्दन मुजुमदार व देशमुख बापुजी नाईक कोंडे यांना सखो भिकाजी आणि चिमणाजी बापू (नारो बापुजीचा भाऊ) यांच्यातील वादाचा निवाडा त्रयस्थ स्थळी करावा असे हुकुम दिले.परंतु चिमणाजीचे वकिल महाराजांस भिडेस घालून त्रयस्थ व्यक्तींकडून परस्थळी सुनावणी करण्याचा आदेश रद्द करवून घेण्यात यशस्वी झाले. यांत चिमणाजीच्या बाळाजी ह्या भावाची सासू व सोनोपंत डबीर यांची पत्नी असलेल्या आबईबाई हिचा मोठा सहभाग होता.साक्षीदारांना दमदाटी करणे, धमक्या देणे, सखो भिकाजी विरुद्ध खोटे महजर तयार करणे, असे सगळे प्रकार चवडोपंत आणि चिमणाजी बापूने केले. महाराजांच्या जवळच्या वर्तुळातील प्रभाव्शाली व्यक्तींच्या अशा पक्षपाती व्यवहारामुळे हताश झालेल्या वादी सखो भिकाजीने महाराजांना रायगडावर भेटून विचारले...आमचे वतन बळेच घेऊन दिल्हे.त्यावरी परस्थळ दिले.तेही मोडून चौडोजी बल्लाळ निवाडीयास पाठविले कि गावीच निवाडा करणे हि कोण गोष्ट केली? त्यावर महाराजांनी वादी सखो भिकाजीस भरोसा दिला कि सत्यस्थिती पडताळून त्याच्या वादाचा न्यायपूर्ण फैसला केला जाईल. महाराजांनी सोनोपंत डबीरांची पत्नी आबई आणि तिच्या बरोबर असलेल्या मंडळीना रायगडावर बोलावून त्यांची कानउघाडणी केली.सखो भिकाजीची महाराजांनी समजूत घातली.आपण महत्वाच्या राजकारणात गुंतले असल्याने आपणास लगेच कारभाऱ्याना व चिमणाजी/बाबाजीस दुखविता येणार नसल्याने काही दिवस प्रतीक्षा करण्यास सांगितले.
यानंतर महाराजांना बारदेशच्या(पोर्तुगीज) स्वारीवर जावे लागले.मराठ्यांच्या फौजा गोव्यात १६६८ सालातील जानेवारी ते मार्च ह्या तीन महिन्यात होत्या. हि मोहीम आटोपल्यावर महाराज रायगडावर परतले.त्यांनी सखो भिकाजीला आश्वस्त केल्या प्रमाणे त्याच्या प्रकरणात जातीने लक्ष घातले.महाराजांची खात्री झाली कि सखो भिकाजीची बाजू सत्याला धरून आहे आणि त्याच्यावर अन्याय झाला आहे.त्यांनी चिमणाजी बापूस कडक हुकुम देऊन खेड आणि शिवापुरचे कुलकर्णपण सखो भिकाजीस देण्याची आज्ञा केली.दोन्ही पक्षांनी मागील कटुता विसरून एकमेकांचा आदर सत्कार करून, यथोचित नजराणे, भेटी देऊन परस्पर संबंध माधुर्यपूर्ण केले.
महाराजांच्या निष्पक्ष भूमिकेमुळे सखोजी भिकाजीवर झालेला अन्याय दूर झाल्याचे बघून आनंद होतो. पण त्याचवेळी महाराजांच्या प्रभावशाली कारभाऱ्यानी चुकीची बाजू असलेल्या प्रतीवादीची पाठराखण केली याचे आश्चर्य वाटते. मोरोपंत पिंगळे, रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर ह्या माणसांनी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व दिले होते. बापुजी, चिमणाजी बापुजी, बाळाजी बापुजी, नारायण बापुजी, केशव नारायण यांचे पराक्रमही सामान्य नव्हते. नारायण आणि त्यांचा मुलगा केशव तर स्वामी कार्यात मारले गेले होते. तरी हि मंडळी ह्या वादात सामान्य व्यक्तीच्या स्वभावा प्रमाणे वागली...

No comments:
Post a Comment