इसवी सन 1753 मध्ये बाळाजी बाजीराव पेशवे यांनी कर्नाटक मध्ये मोहीम काढली यावेळी त्यांच्यासोबत मराठ्यांचा दिग्गज फौज फाटा होता. कर्नाटकातील होळी होनूर या किल्ल्यास यावेळी मराठ्यांचा वेढा टाकला . पण तिथल्या स्थानिक पुळगोरांनी हा किल्ला प्रचंड ताकतीने लढवला व मराठ्यांनी किल्ला जिंकणं अवघड झालं. यावेळी मराठा सरदार कृष्णाजी पालांडे, सरदार रामजी पवार सरदार वडपतराव, सरदार बाबाजी पडवळे सरदार बाजीप्रभू , कोन्हेर त्रिंबक एकबोटे आधी ११ मराठा सरदारांनी मिळून सदर होळी हुन्नर किल्ल्याच्या तटाला शिड्या लावल्या व किल्ल्यावर जाऊन किल्ल्याचा जिंकली व किल्ला फत्ते केला.
यावेळी झालेल्या प्रचंड लढाईत सरदार कृष्णाजी राव पलांडे यांना गोळी लागून ते धारातीर्थी पडले. तसेच या पैकी चार सरदार मंडळी प्रचंड जखमा झाल्या याबद्दल बाळाजी बाजीराव पेशवा यांनी सरदारकृष्णाजी पलांडे यांच्या पुत्रास या शिरूर तालुक्यातील मुखई येथील पाटीलकी दिली व स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या पलांडे घराण्याचे गौरव केला सरदार कृष्णाजीराव पलांडे यांनी जे बलिदान दिलं ते इतिहासाच्या खूप कमी पानावर दिले गेले हे मराठीशाहीचं दुर्दैव होय!!
साभार संतोष झिपरे
No comments:
Post a Comment