मराठ्यांनी सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आक्रमण केले, सोलापूरचा भुईकोट किल्ला हे विजापूरकर आणी मुघल याच्यातील १६६८च्या
तहानुसार मुघलांना मिळाला होता या कालावधीत मोगलनी आपले तोफखाना व दारूगोळा व टाकसांळ सोलापूरच्या भुईकोट किल्ला सुरु केले १६८० मध्य खानजहान बहादूरच्या आज्ञेनुसार सोलापूरच्या भुईकोट किल्लातील २५तोफा दुसरीकडे नेण्याची जबाबदारी अली आगामी जगतसिंग हाडा आणि राजा जसवंतसिगं बुंदेला यांच्यावर सोपविण्यात आले होते.
ज्या वेळेस मुहम्मद आज्जमशहा औरंगाबाद च्या सुभ्यात पोचणार होता त्या वेळी खानजहान बहादूर मराठ्यांना तंबी देण्यासाठी कूच करणार होता..
यावेळी मराठ्यांचा फौज सोलापूर किल्लाजवळ गेली.
प्रचंड संघर्ष झाले 

किल्लावरुन मराठ्यांचा मुकाबला करण्यासाठी निघाला, खानजहान बहादुदुरने रजबखानाला मनोहरदास गौडच्या मदतीसाठी पाठविले.
मराठे व मुघल यांच्यात लढाई होऊन मराठ्यांचे बरेच लोक कामास आले... 

तेव्हा औरंगजेब यांना शिरवळच्या अबु मह्हमुद ठाणेदारना रवाना करून लवकर जाऊन मराठ्यांचा सोलापूर येथे पराभव करण्यासाठी सांगितले..
ठाणेदार दि. २२/४/१६८५रोजी तेथे पोचला. मराठे व मोगली सैन्यात लढाई होऊन दोन्ही बाजूंनी अनेक जण मेले व जखमी झाले. यावेळेस मराठ्यांनी माघार घेतली मराठ्यांनी लुटलेल्या सामानपैकी ३१ घोडे आणि भाले मुघलांच्या हातात सापडले.
चिकित्सा --सोलापूर भुईकोट किल्ला येथून मूघलचे तोफांखाना होते तसेच टाकसाळं पण याचा किल्लावर होते शिवाय महाराष्ट्र व कर्नाटक व आंध्र प्रदेश च्या सरहद वरील प्रमुख लष्कर ठाणे सोलापूर आहे येथून चौफार घोडदौड करण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे म्हणून छत्रपती संभाजी महाराज व मराठ्यांचा वावर सतत या परिसरात दिसुन येते
तसेच याचा प्रदेशातून मोगली सैन्यासाठी रसद व कामुक (धन्य साम्रगी) येत असल्याचे नोंदी उपलब्ध आहेत त्या मोगलांना भेट नयेत म्हणून याभागात मराठे सतत वावरातुन दिसतात
सुचना -- सदर लेख बदल आणखी माहिती आपणाकडे असेल तर निश्चितच फोन करावेत व मार्गदर्शन करावेत
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:
Post a Comment