विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 February 2024

३ फेब्रुवारी १७६० रोजी, सदाशिवराव (भाऊ) पेशवे व पाचवा निजाम सलाबतजंग यांच्यामध्ये झालेल्या लढाई जिंकल्याची ऐतिहासिक घटना

 


३ फेब्रुवारी १७६० रोजी, सदाशिवराव (भाऊ) पेशवे व पाचवा निजाम सलाबतजंग यांच्यामध्ये झालेल्या लढाई जिंकल्याची ऐतिहासिक घटना प्रसिद्ध आहे...🚩
उदगीरचे प्राचीन नाव उदयगिरी असे होते काही ठिकाणी त्याचा उल्लेख ‘उदकगिरी’ नावाने करण्यात आला आहे उदगीर नगरीचे पुराण काळापासून उल्लेख सापडतात त्यामुळे उदगीरला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी महत्त्व आहे..
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे. अगदी पुराण काळापासून या नगरीचे उल्लेख सापडतात त्यामुळे या शहराला ऎतिहासिक व आध्यात्मिक महत्व आहे. सर्वांत अलिकडचा उल्लेख येतो पानिपताचा. उदगिर किल्ल्याचा संदर्भ इ.स. ३ फेब्रुवारी १७६० रोजी सदाशिवराव (भाऊ) पेशवे व पाचवा निजाम सलाबतजंग यांच्यामध्ये झालेल्या लढाईच्या संदर्भात येतो. हि लढाई मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वाची ठरतेच, पण परिणामी ती भारताच्या इतिहासातही महत्त्वाची ठरते. मराठ्यांनी हि लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे. यानंतर मराठे व निजाम यांच्यात भालकीचा तहदेखील झाला. या लढाईत मराठ्यांकडून राघोबादादा, सदाशिवराव भाऊ, मेहंदळे, गोपाळराव पटवर्धन, विठ्ठल शिवदेव, अंताजी माणकेश्वर, दामाजी गायकवाड असल्याचे उल्लेख येतात. यापैकी काही लढाईनंतर लगेचच पानिपतच्या लढाईवर गेले होते. या लढाईत वापरला गेलेला तोफखाना मराठ्यांच्या जलद हालचालीला मारक ठरला. मराठ्यांची भिस्त घोडदळावर व पायदळावर असे; पण तोफखाना आल्यामुळे सैन्यात दोन तट पडले. फौज आतापर्यंत चपळ होती, आता बोजड आणि शिथिल झाली होती. या लढाईमुळेच पानिपताचे नेतृत्व सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांकडे आले. या लढाईत त्यांनी केलेल्या निजामाच्या सपशेल पराभव केला. मराठ्यांच्या पानिपतच्या युध्दात झालेल्या परभवा नंतर निजामाने हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता..

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...