विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 February 2024

७ फेब्रुवारी १६९३ “सरसेनापती संताजींचा” कासिमखानवर विजय

 


७ फेब्रुवारी १६९३ “सरसेनापती संताजींचा” कासिमखानवर विजय....🚩
जिंजीपुढे मोगली लष्कराची दाणादाण उडल्याची बातमी बादशाही छावणीत जाऊन पोहचली तेव्हा आपल्या या लष्करास वाचविण्यासाठी मुबलक साधनसामग्री देऊन बादशहाने आपल्या कासिमखान नावाच्या नामांकित सरदारास जिंजीकडे धाडले होते अलीमर्दाखानाप्रमाणे या कासिमखानास धडा शिकविण्याचे संताजीनी ठरविले...
कांचीपुरमपासून पूर्वेस २० मैलांवर असणाऱ्या कावरीपाक या ठिकाणी कासिमखानावर संताजींनी अचानक हल्ला चढविला अल्पावकाशात खानच्या फौजेचा धुव्वा उडाला रणमैदानातून पलायन करून खानने आपला जीव व थोडीबहूत साधन सामग्री वाचविली आणि आपल्या सहकाऱ्यांनिशी कांचीपुरम गाठले तेथे त्याने काही देवळांचा आश्रय घेतला आणि वाचला...
याविषयी भीमसेन सक्सेना लिहितो...,
“कासिमखान कावेरीपाकला पोहोचताच संताजी हा त्याच्यावर तुटून पडला कांचीच्या जवळ युद्ध झाले कासिमखानवर मोठा बिकट प्रसंग ओढवला कासिमखानने कांचीच्या देवळात आश्रय घेतला म्हणून बरे झाले नाहीतर तो कैद झाल्याशिवाय राहिला नसता जुल्फीकारखानने शहजादा कामबक्ष यास वांदीवॉशच्या किल्ल्यात सुरक्षित ठेवले. नंतर तो कासिमखानच्या मदतीस पोहचला आणि त्याने बंजाऱ्यांना रसदीबरोबर सुरक्षितपणे वांदीवॉशला आणले...”
हे प्रकरण घडले ७ फेब्रुवारी १६९३ रोजी....
🎨 राम देशमुख ♥️🔥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...