१)१७ नोव्हेंबर १७१३ रोजी खंडेराव दाभाडे याना सेनाखासखेल ही उपाधी छत्रपती शाहु महाराजानी दिली.
३) २ एप्रील १७१६ रोजी खंडेराव दाभाडे यानी मैगलातर्फेच्या पुण्याचा ठाणेदार रंभाजी निंबाळकर याच्यावर हल्ला करुन पुण्यावरचा मोगलाचा अम़ल दुर केला.
४) २ एप्रिल १७१५ मध्ये खंडेराव दाभाडे व कान्होजी भोसले यानी ३० हजार सैन्यानिशी नर्मदा ओलांडुन माळव्यात प्रवेश केला.यात मराठ्यांचा पराभव झाला.
५) खंडेराव दाभाडे यानी खानदेश आणी गुजराथ प्रांतावर स्वार्या करुन त्या दोन प्रांतामधील दळणवळणाचा मार्ग आपल्या ताब्यात घेतला.तेव्हा हुसेन अलिने झुल्फिकार बेग यास खंडेराव दाभ्याड्यावर पाठवले,खंडेरावाने मोठ्या युक्तिने मोगलांचाच पाठलाग करुन डोंगरी प्रदेशात या झुल्फीकार बेग सह त्याची फौजच कापुन काढली.
६) २९ डिसेंबर १७१७ मध्ये खंडेराव स सेनापती पद शाहु महाराजानी बहाल केले.
७) सेनापती खंडेराव दाभाडे व सरलष्कर सुलतानजी निंबाळकर यानी सय्यद हुसेन अली याचा समाचार घेतल्यानंतर सय्यद हुसेनने परिस्थिती ओळखुन तडजोडीचे धोरण स्विकारले. हे दडपशाही करण्यासाठीचे धोरण शाहु महाराजांचेच होते,त्यावर अमंल मराठा सरदार करत होते.तेव्हा सय्यद हुसेन अलीने मराठ्यांच्या सहाय्याने बादशहाला शह देण्याचे ठरविले आणी शाहु महाराज व सय्यद हुसेन यांच्यात चौथाई संबंधी तह झाला.
त्यातील कलमे= * छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तमाम स्वराज्य,गडकोट सुद्धा शाहु महाराजांच्या हवाली करावे.
* सय्यद अलीकडुन मराठा सरदारानी जिंकलेला खानदे,गोंडवण,हैद्राबाद, कर्नाटक या भागातील यादीत नमुद केल्याप्रमाणे मोगलानी सोडुन देऊन स्वराज्यात सामील करावे.
*मोगलाच्या दक्षिणेतील मुलुखावर चौथाई व सरदेशमुखी हक्क मराठ्यानी वसूल करावा.या मोबदल्यात आपली १५००० फौज मराठ्यानी बादशहाच्या मदतीस ठेवावी आणी सरदेशमुखीच्या मैबदल्यात मैगलांच्या मुलुखात चोर्या आदींचा बंदोबस्त करावा.
*कोल्हापूरसंभाजीस शाहुनी उपद्रव देऊ नये. त्याबाबतीतचे बादशहाने लेखी फर्माण पुढे यायचेच होते,शाहु महाराज मात्र हा तह लागलीच अमंलात आणण्यास सुरुवात केली,त्या संबंधीचे शाहु महाराजांचे हुकुम १ ऑगस्ट १७१८ चे उपलब्ध आहेत ......
८) वरील तहाने मराठ्याच्या पराक्रमास नविन क्षेत्र व नवीन दिशा प्राप्त झाली.बादशहाच्या तैनातीस आपली फौज देणे म्हणजे त्याच्या संरक्षणाची हमीच आपल्याकडे घेण्यासारखे आहे. तसेच शाहु महाराजानी हा तह करुन बादशहाची चाकरी पत्करली असा संभ्रम काही इतिहासकार करतात,परंतु शाहु महाराजानी हा तह घडवुन आपल्या सैन्यास चौथ ,सरदेशमुखी व संरक्षणाच्या नावाखाली मोगलाच्या प्रांतात यथेच्छ वावरासाठीचा अधिकार मिळवुन खर्या अर्थाने मराठा स्वराज्याच्या विस्ताराचा पाया घातला. हा तह बादशहाकडुन लेखी फर्मानाची मान्यता प्राप्त करुन घेणे राहिला होता,ते काम सय्यद हुसेनच्या सहाय्याने मराठा सरदार ख़डेराव दाभाडे,राघोजी शिंदे,संताजी भोसले,उदाजी चव्हाण,तुकोजी पवार आदी प्रमुख सरदाराना प्रत्यक्ष दिल्लीण पाठवुन सरदारांमार्फत शाहु महाराजानी करवुन घेतला.
९) सेनापती खंडेराव दाभाडे सय्यद हुसेन सोबत दिल्लीत= तेथे सय्यद अब्दुलाच्या विरुद्ध बादशहाने त्याचा काटा काढण्यासाठी कारस्थाने रचली.त्यास शह देण्यासाठी हा सय्यद हुसेन खंडेराव दाभाडे,राघोजी शिंदे,बाळाजी,संताजी भोसले,उदाजी चव्हाण ,तुकोजी पवार सैबत दिल्लीत दाखल झाला.हे मराठा सरदार निवडक १६००० सैन्यासह होते.परंतु फरुकसियरने सय्यद बंधुशी तहाची बोलणी लावली.त्यामुळे मराठा सेनापती खंडेराव दाभाडे व सरदारानी बादशहासच कैद केले व रफीउदजित नावाच्या राजपुत्रास गादीवर बसवले.त्या संघर्षात संताजी भोसले ठार झाले.अशा पद्धतीने शाहु महाराजानी आखुन दिलेल्या रणनितीतुन मराठा सेनापती व सरदारानी बादशहास कैद करुन तख्त बदल करुध सय्यदबंधुचा मोकळा केला.रफीउदजीतला दुर सारुन रफीउदौला यास बादशहा बनवले.तो अचनक मेला त्यामुळे १७१९ औरंगजेबाचा पणतु रोशन अख्तर यास तख्तावर बसवले. या कैदेत असलेल्या फरुकशियर यास २८ एप्रिल १७१९ ला ठार मारले.
१०) दिल्लीत मराठ्यांच्या सहाय्याने क्रांती घडुन येत असताना मराठा सेनापतीनी सय्यद बंधुमार्फत १३ मार्च १७१९ रोजी शाहु महाराज व सय्यद अली यांच्यात झालेला चौथाईचा तह मंजुर करवुन घेतला. त्यानंतर २४ मार्च १७१९ रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या स्वराज्य चौथाई आणी सरदेशमुखीच्या तीन वेगवेगळ्या सनदा सय्यद बंधुनी बादशहाकडुन शिक्कामोर्तब करवुन घेतल्या .त्यात दक्षिणेतील सहा सुभ्याव्यतिरिक्त तंजावर,चित्रणापल्ली, व मैसुर या मांडलीक राजाकडुनही चौथाई वसुल करण्यासाठीचा अधिकार मराठ्याना बहाल करण्यात आला.
११) १० मे १७१९ रोजी महाराणी येसुबाईसाहेब व इतर राजघराणँयाचे कैदी व मराठा सरदार महाराष्ट्रात दाखल झाले...... हे सर्व घडले ते छत्रपती शाहु महाराज यांच्या रणनितीनुसार सेनापती खंडेराव दाभाडे,सरदार राघोजी शिंदे,संताजी भोसले,उदाजी चव्हाण ,बाळाजी पेशवा,नारो शकंर,केरोजी पवार,तुकोजी पवार आदींचा दिल्लीमधील मोगलांच्या प्रत्यक्ष राजधानीत सय्यद बंधुना हाताशी धरुन तख्तपालट करवुन शाहु महाराजानी स्वतःच्या सरदाराना यथेच्छ विस्तारासाठी मोकळे मैदान करुन दिले आणी यास देखिल मराठा सरदारानी शाहु महाराजांच्या रणनितीस कुठेच तडा जाऊ दिला नाही.
छत्रपती थोरले शाहु महाराज यांनी इ सन १७२० अगोदरपुर्वीच मराठा साम्राज्याच्या विस्तारास सुरुवात केलेली दिसुन येते.. तसेच महत्वाचा मुद्दा, छत्रपती थोरले शाहु महाराज यांनी आपल्या माता येसुबाईराणाईसाहेब यांची मोगल कैदेतुन सुटका देखील स्वतः च्याच राजनिती कौशल्यावर आपल्या सरदारांमार्फत करवुन घेतलेली दिसुन येते...
* राजेनरेश जाधवराव...
No comments:
Post a Comment