विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 February 2024

वाठार निंबाळकर फलटण चे ऐतिहासिक घरानं म्हणजे नाईक निंबाळकर.

 












वाठार निंबाळकर
फलटण चे ऐतिहासिक घरानं म्हणजे नाईक निंबाळकर...
फलटण पासुन जवळजवळ ८ किमी अंतरावर असलेला हां नाईक निंबाळकरांचा वाडा... फलटण - पुसेगाव रस्त्यावरून जाणारा हां मार्ग...
वाड्याबद्दल चा खरा इतिहास अंधारात च आहे... ऐतिहासिक साधनं कमी पडतात की आणखी काही...
__________________________
वाड्याबद्दल अनेक कथा संगितल्या जातात ते आपन नंतर पाहू...
_________________________
वाडा हा दक्षिण बाजूस असून
उत्तर बाजूस अभिमानाने उभा असलेला महादरवाजा हां वाड्याचा मुख्य प्रवेश द्वार...वाड्याचा महादरवाजा अजुन ही पुरातन काळातला असून काही प्रमाणात मोडक्या व दुराअवस्थेत आहे...महादरवाजा सुमारे १९ फुट उंच तर १२ फुट रुंद आहे..दरवाज्यावर संरक्षणासाठी असलेले खिळे हे काही प्रमाणात पहावयास मिळतात... दरवाज्याच्या अर्ध्या फळावर ( उजव्या बाजुचा फळा ) १३ लोखंडी ठोकळे तर दुसऱ्या बाजूच्या अर्ध्या फळ्यावर ( डाव्या बाजुचा फळा ) १९ लोखंडी ठोकळे असुन लांब खिळ्यांची संख्या ही डाव्या बाजुला ४७ तर उजव्या बाजुला ४३ इतकी आहेत...( काही चोरीला गेले ? )
महादरवाज्याची कमानी ही जवळ जवळ २७ फुट उंच आहे...
महादरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर पश्चिम बाजूस श्रीराम मंदिर आहे...मंदिरात प्रवेश करताना चौकटीच्या दोन्ही बाजुला ४ फुट उंच व ५×४ लांबीचा कट्टा आहे. मंदिराचा प्रवेश द्वाराची रुंदी ५ फुट असुन मंदिराच्या बाहेरील बाजुने कवलांच्या उतरत्या भागात ३ चित्रे आहेत...
मंदिराच्या मागच्या बाजूस पुरातन विहीर आहे..विहीरी मध्ये उतरण्यास एकूण तीस एक पायऱ्या आहेत... ( काही पायऱ्या पाण्यात आहे. )
विहिरी च्या पायऱ्या लगत असलेल्या भिंतीवर एक छोटेखानी (अंदाजे ६ फुट उंच व ६ फुट रुंद खोली असुन खोली च्या आतील बाजूस दोन चौकोनी खड्डे आहेत..
मंदिराच्या डाव्या बाजुला असलेल्या भिंतीवर ( अंदाजे ४ फुट रुंद (चोर वाट च म्हणता येईल ) वाट आहे..ती भिंतीमधुन बाहेरील बाजूस गेल्यानंतर मुख्य वाड्याच्या बाजूस बाहेर येते.. ( सध्या ती वाट अर्धवट बंद आहे.) आणखी एक गोष्ट निरीक्षण केल्यास समजते की तटबंदीच्या भिंती मध्ये लपण्यासाठी जागा ही आहे. चोर वाटेच्या भिंती च्या थोड पुढच्या बाजूला लपण्यासाठी जागा आहे. ( अंदाजे ६० ते ७० सेमी रुंद , ८ ते १० फुट लांब आणि ६ फुट उंच अशी ही जागा आहे..)
अत्यंत शांतमय वातावरण अनुभवावं तर इथेच...
नऊ बुरुजाचा वाडा हे नाव का असावं ? तर वाड्याला नऊ बुरुज असतील हे साधं सरळ उत्तर आहे...
महादरवाजाच्या समोरील असलेल्या भिंतीच्या उजव्या बाजुने वाड्यात जाण्यास मार्ग आहे.. ( खरं तर डाव्या बाजुने वाड्याचा मुख्य दरवाजा आहे पन तो पडीक असल्याने आपल्याला भिंतीच्या उजव्या बाजुने च आत प्रवेश करता येतो.. )
प्रवेश करण्याचा मुख्य दरवाजाच्या वरील दोन्ही बाजूस चक्र ( शिल्प ) आहेत..
त्या प्रकारचे एक चक्र (शिल्प) व एक विरगळ मुख्य वाड्याचा वायव्य भागात असलेल्या दुसऱ्या वाड्याच्या बुरुजावर पाहण्यास मिळते..
वाड्याचा मुख्य दरवाजा हां ७.२१ फुट लांब व १३ फुट ( अंदाजे ) उंच आहे.
आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस ( वाड्याच्या मुख्य दरवाजाच्या वरील बाजूस ) जाता येते.( २० पायऱ्या )
मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजुने २४ पायऱ्या चढून आपल्याला वाड्याचा तटबंदीच्या भिंतीवर जाता येते. तसेच उजव्या बाजुने ही तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. ( उदा. शनिवार वाडा ) डाव्या बाजुला वरील बाजूस ( तटबंदीवर ) एक पीर ची समाधी आहे..असं म्हणतात की नाईक निंबाळकरांच्या कोणत्याही कार्य समारंभा अगोदर त्या पिरास नारळ अर्पण करावा लागतो अन्यथा काही अशुभ घटना घडते. ( असं म्हणतात हे मी ऐकलेल आहे. तथ्य माहीत नाही.
)
तटबंदीवर जाण्यासाठी एकच मार्ग आहे ( पायऱ्या ) बाकी २ मार्ग गुपीत आहे.. ( आत झाडे झुडपे,काटे असल्याने जाता येत नाही. )
पायऱ्या लगत च एक विहीर आहे..त्या विहिरी च पाणी पूर्वी पिण्यासाठी होत असे.विहिरी मध्ये उतरण्यासाठी एक सव्वा फुट लांब अंतराच्या पायऱ्या आहे..आत जाण्यासाठी १७ व ४ आडव्या पायऱ्या आहेत..
________________________
आणखी बर्याच गोष्टी वाड्यात आहेत पन झाडाझुडपांमुळे पाहता येत नाही.
_________________________
आता प्रश्न काही कथांचा..
एका शेतकऱ्याचा छळ केल्यामुळे त्या शेतकऱ्याचा हत्ती हां वाड्यावर धावुन आला. त्यावेळेस वाड्याचा महादरवाजा बंद करण्यात आला..तो हत्ती दरवाज्यावर आपलं डोक आपटुन आपटुन गंभीर जखमी झाला आणि त्या हत्तीचा मृत्यु झाला.. महादरवजाच्या उजव्या बाजूस एक सपाट दगड जमिनिमधुन वर च्या बाजूस आलेला आपल्याला दिसतो..त्याच दगडाखाली हत्ती पुरल्याच गावातील वयस्कर लोकं सांगतात..
काही छायाचित्र देत आहे.
१. महादरवाजा
२. श्री राम मंदिरातले चित्र
३. विहिरी मध्ये उतरण्यासाठी पायऱ्या ( श्री राम मंदिरातील विहीर )
४. मंदिरतील विहीर
५. महादरवज्यातून समोर दिसणारी भिंत
६. मुख्य प्रवेश द्वार
७. प्रवेश द्वारावरील व बुरुजवरील शिल्प
८. मुख्य प्रवेश द्वार ( पडीक )
९. सदर चे चित्र प्रवेश द्वाराचे असुन आतील बाजुने काढलेले आहे..फोटो मध्ये डाव्या बाजुने आपल्याला प्रवेश द्वाराच्या वरच्या बाजूस जाता येते. उजव्या बाजुने मार्ग नाही.
१०. वाड्यामधील चौरस विहीर
११. तटबंदिवर जाण्यासाठी पायऱ्या (२४)
१२. पीर समाधी
१३. लपण्यासाठी जागा ( कदाचित ) श्री राम मंदिर ची बाहेरील भिंत
१४. चोर मार्ग (श्री राम मंदिर ची बाहेरील भिंत )
१५. मंदिराच्या उजव्या बाजूस असलेली खोली ( ? )
सदर माहीती फक्त एकाच वाड्याबद्दल आहे..तरी
आपल्यास काही माहीती असल्यास कळावे..
धन्यवाद..
( वरील माहीती समजून घेण्यासाठी एकदा वाड्याला नक्की भेट द्या... )
चूक भुल घेणे देने...
बहुत काय लिहिने ?
आमचें अगत्य असू द्यावे..
माहिती संकलन अज्ञात आहे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...