19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वा जयंती उत्सव आहे . महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवरायांच्या समाधी चा शोध घेऊन शिवजयंतीला सुरवात केली असे आपण ऐकत आलो आहे.
परंतू पाच पिढ्या पासून अविरतपणे पुढाकार घेऊन शिवजयंती साजरी करणार्या या मराठा घराने बाबत आपल्याला माहिती नाही.
ऐतिहासिक जुन्नर प्रांतातील मराठा सरदार बुट्टे घराण्यातील अनेक पुरुष मंडळी शहाजीराजे यांच्या लढाऊ फौजेत दाखल होते. शिवाजी महाराज यांच्या बद्दलचे प्रेम आणि पूर्वजांच्या बलिदानाचे याच भान ठेवून 99 वर्षांपूर्वी या जुन्नर तालुक्यातील जुन्नर चे पोलीस पाटील असलेले रामचंद्र आणाजी बुट्टे पाटील याना शांत बसू देत नव्हते. रामचंद्र जी यांनी पुढाकार घेऊन दि. 24 मार्च 1925 चे पुणॆ येथुन प्रसिद्ध होणाऱ्या विजयी मराठा वृत्तपत्रा द्वारे शिवनेरी किल्ल्यावर (त्यावेळी तिथीनुसार) तारीख 25 एप्रिल 1925 रोजी शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे असे निवेदनाद्वारे शिवनेरी कमिटीचे उपाध्यक्ष म्हणुन प्रसिद्धी दिली व शिवनेरी वर शिवजयंती उत्सव प्रथम साजरा करण्यात आला.
त्यानंतर त्यांनी दर वर्षी शिवजयंती साजरी केली. त्या वेळी केलेले 1928 सालातील खर्चाचे पावती अजून जतन करून ठेवली आहे.
30 एप्रिल 1930 रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला होता वृत्तांत दी. 26 मे 1930 चे विजयी मराठा मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या निमित्त पुणॆ येथुन गंगाधर काळभोर पुणॆ जिल्हा लोकल बोर्ड सदस्य, बाबूराव जगताप शिवाजी मराठा चे हेडमास्तर, असे मान्यवर उपस्थित होते. जन्म स्थानात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आजूबाजूच्या परिसरातील मावळे मंडळीच्या झुंडी गडावर लोटत होत्या. या वेळी प्रसाद, खिरापत वाटुन संध्याकाळी जुन्नर शहरात थाटात मिरवणूक काढण्यात आली होती. सर्व जाती धर्माच्या लोकांनी मनापासुन भाग घेतला होता.
या कार्यक्रमात रघुनाथ कृष्णा जोशी, गणेश लक्ष्मण जोशी हे वकील, बळवंत ध्याहाडी नगरपालिका मेंबर, बन्याबापु जोशी, रामचंद्र मार्तंड खत्री, अर्जुन शिंदे, शंकरराव शिवराम मोरे, बाबुराव देशमुख, महाडिक यांच्या सह मंडळींनी छबीन्यास मदत केली. मोरे यांनी शिवनेरी जीर्णोद्धार कमिटी चे कार्या ची माहिती दिली व टीका करणार्या सरदार आंग्रे यांच्या आक्षेपांना समर्पक उत्तर दिले.
शिवनेरी जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य रामचंद्र आनाजी बुट्टे पाटील ऑनररी म्याजीस्ट्रेट व जुन्नर तालुका लोकल बोर्ड अध्यक्ष, व जुन्नर म्युनिसिपल अध्यक्ष यांनी आभार मानले.
पुढे रामचंद्र यांचे सुपुत्र शंकरराव बुट्टे पाटील, पुतणे लक्ष्मण हरीभाऊ बुट्टे पाटील यांनी शिवजयंती साजरी करणे चा उपक्रम अविरत चालु ठेवला. 25 एप्रिल 1960 ते 1 मे 1960 म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली होती त्या वेळी शिवजयंती सप्ताह साजरा करण्यात आला. श्री. शिवाजी स्मारक समिती सदस्य लक्ष्मण बुट्टे पाटील हे सदस्य होते तर मंत्री बाळासाहेब देसाई, आमदार शिवाजीराव काळे, चंद्रकांत देसाई, विश्वनाथ वाबळे, मानमल कोठारी, घमाजी मेहेर हे सर्व होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य चेपहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सर्व मंत्रिमंडळा सह शिवनेरी वर जाऊन मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली.
जुन्नर नगरपालिका इमारती समोर रामचंद्र पाटील यांचे भाऊ हरिभाऊ यांनी शिवाजी महाराज यांचा अर्ध पुतळा उभारला त्याच आवरण यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. पुढे ही हे कार्य रामचंद्र पाटील यांचे भावाचे नातू म्हणजे लक्ष्मण यांचे पुत्र अँड. शिवाजी बुट्टे पाटील,तसेच शंकरराव रामचंद्र बुट्टे पाटील यांचा मुलगा गोविंद ऊर्फ आप्पासाहेब व शरद शंकरराव बुट्टे पाटील व आत्ता नवीन पिढी मध्ये रामचंद्र बुट्टे पाटील यांचे पणतू अँड. राजेंद्र शरद बुट्टे पाटील यांनी स्वतः सन 1996 पासुन 19 फेब्रुवारी 1630 ही शिवाजी महाराज यांच्या जन्म तारखेची शासन दरबारी मान्यता मिळावी म्हणून पाठपुरावा केला. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवा संघाचे माध्यमातून गेले 28 वर्ष शिवजयंती साजरी करीत आहेत.
शिवनेरी येथील शिवजन्म स्थळावर शिवाजी महाराज यांची प्रतिमा कायम स्वरूपी असावी हे रामचंद्र पाटील यांचे स्वप्न अँड. राजेंद्र बुट्टे पाटील यांनी मराठा सेवा संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष असताना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची कायम स्वरूपी स्थापना केली आहे ती आजतागायत पूजनीय आहे.
आत्ताचे रामचंद्र बुट्टे पाटील यांच्या 5 व्या पिढीतील वंशज मंदार किरण बुट्टे पाटील हे मराठा सेवा संघाचे पदाधिकारी म्हणुन 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून साजरा करण्यात पुढाकार घेऊन साजरी करत आहे.
माहीती, फोटो साभार अँड राजेंद्रजी बुट्टे पाटील, जुन्नर.
शब्दांकन अँड विशाल बर्गे *बारामती 9923150025
No comments:
Post a Comment