महाराज श्रीमंत यशवंतराव पवार यांचा जन्म देवास येथे दि. 2 मार्च 1905 रोजी झाला होता. त्यांचे प्रारंभिक शिक्षण हे देवास आणि ग्वाल्हेर येथे झाले .त्यांनी लंडन येथे मॅट्रिक परीक्षा पास केली आणि नंतर बॅरिस्टर ची परीक्षा ही ते उत्तीर्ण झाले.
श्रीमंत यशवंतराव पवार यांचा राज्याभिषेक दि. 6 मार्च 1944 रोजी झाला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मध्य भारताच्या निर्माण कार्यात भाऊसाहेब यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. श्रीमंत यशवंतराव पवार हे त्यांचा राज्याभिषेक होण्याआधीच वडिलांना (श्रीमंत सदाशिव पवार महाराजांना) प्रशासन कार्यात मदत करत असत. ते 1936 मध्ये हुजूर कॅबिनेटचे अध्यक्ष झाले होते ,त्या काळात त्यांनी हिंदी भाषेचा प्रामुख्याने वापर करण्यावर भर दिला होता. राज्यात ग्राम सुधार दिवस व मार्ग सुधार दिवस हे दोन दिवस चालू करून त्यात ते स्वतः श्रमदान करत असत. श्रीमंत यशवंतराव पवार हे आपल्या वडिलांच्या काळात हरिजन सभांमध्ये भाग घेत असत, त्यांनी त्याकाळी एक अफवा कमिटी बनवली होती, ह्या कमिटीमार्फत राज्यात पसरल्या अफवांची पडताळणी केली जात असे. श्रीमंत यशवंतराव पवारांनी देवास मध्ये वीज, पाणीपुरवठा योजना, प्रसुतीगृह, मुलींसाठी शाळा ,साखर कारखाना व टायर कारखाना इत्यादींची सुरुवात केली.
श्रीमंत यशवंतराव पवार हे शिकारीचे शौकीन होते, एक वेळा चित्त्याचे शिकार करताना ते जखमीही झाले होते.
श्रीमंत यशवंतराव पवारांनी त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना केली. तसेच पॉलिटिकल विभाग,मुनिसिपालिटी , पोलीस ,मिलट्री विभाग असे उपविभाग निर्माण केले.
श्रीमंत यशवंतराव पवारांनी आपल्या राज्यात आईस, बेकरी ,बिस्किट ,स्टार्च, पेपर आणि ऑइल कारखाने आणण्यासाठी महत्वपुर्ण भुमिका पार पाडली होती.
श्रीमंत यशवंतराव पवारांनी आपल्या राज्यात हरिजनांसाठी शाळा, ग्रामोध्दार कार्य , मतिमंदांसाठी शाळा, अनाथ आश्रम ,फायर ब्रिगेडची स्थापना असे अनेक लोक उपयोगी उपक्रम राबवले. बँक ऑफ देवासची स्थापना त्यांच्याच काळात झाली या बँकेची स्थापना साठी एकूण 15 लाख रुपये त्याकाळी त्यांनी एकत्रित केले होते.
आपल्या राज्यात अनेक लोकउपयोगी उपक्रम राबणार्या श्रीमंत यशवंतरा पवार महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
महेश पवार
7350288953
No comments:
Post a Comment