विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 March 2024

पन्हाळगडावरील प्राचीन गुहा

 



पन्हाळगडावरील प्राचीन गुहा
पन्हाळगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. प्राचीन काळापासून हा किल्ला महाराष्ट्रातील इतिहासाचा साक्षीदार आहे. शिवकाळातील अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घटना या किल्ल्यावर घडल्या आहेत. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दातही औरंगजेब विरुद्धचा रणसंग्राम या किल्ल्याने अनुभवला, ब्रिटिशांच्या विरुद्ध हा किल्ला लढला. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या आयुष्यातील अनेक ऐतिहासिक घटना या किल्ल्यावर नोंदवल्या गेल्या.
पन्हाळगडावरील पराशर गुहा सर्वज्ञात आहेच पण पन्हाळगड आणि पावनगड या जोड किल्ल्याच्या आंगा खांद्यावर आणि पायथ्याशी अनेक प्राचीन गुहांची शृंखलाचं आपल्याला पहायला मिळते. काही ठराविक जाणकार अभ्यासकांना आणि स्थानिक जनतेला माहीत असणाऱ्या काही गुहा तशा पडद्या आड असलेल्याच बऱ्या. पण यातील काही गुहा पर्यटकांना मात्र डोळ्यासमोर असूनही लक्षात येत नाहीत. अशीच एक प्राचीन गूहांची शृंखलाचं पन्हाळगडावर एका ठिकाणी आहे. जांभ्या दगडात कोरलेल्या या गुहा आज मात्र आधुनिक विकास कामामुळे आणि बांधकामांमुळे झाकळून गेल्या आहेत. या प्राचीन गुहा मानव निर्मित आहेत यात शंकाच नाही. काही गुहांमध्ये असणाऱ्या देवळ्या आणि आतील रचना हि असेच ऐतिहासिक संदर्भ देतात.
पन्हाळगड वरील या गुहा म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या श्री शिवाजी महाराज मंदिर, साठामारी आणि महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या राजवाड्याच्या सभोवती असणाऱ्या गुहा होय. या गुहांचा घेर खूप मोठा आहे. महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या राजवाड्याच्या सभोवती या गुहा पसरलेल्या आहेत. राजवाड्याच्या डाव्या बाजूस असणाऱ्या राजर्षी शाहूकालीन साठमारीमध्ये या गुहांच्या वापर हत्तीच्या तावडीतून साठामार(हत्तीशी खेळ खेळणारे माणूस) सुटकेसाठी लपण्याची जागा म्हणूनही केला गेला.
आज मात्र या गुहेचा बराचसा भाग आधुनिक विकास कामामुळे झाकोळला गेला आहे. खरं तर अनेक प्राचीन गुहांच्या रचना जाणून घेण्यासाठी हा ऐतिहासिक ठेवा स्वच्छ आणि सुंदर ठेवला गेला पाहिजे. यासाठी हा लेख प्रपंच.......
राम यादव
कोल्हापूर
18.03.2024

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...