राजेलखुजीराव जाधवराव यांची कौटुंबीक माहिती आणी मालोजीराजे भोसले यांच्याशी नातेसंबध= १) राजेलखुजीराव यांची समाधी सिंदखेडराजा येथे असुन तिला घुमट असे म्हणतात.त्या घुमटाच्या पुर्व व उत्तर दरवाज्यावर २ शिलालेख कोरलेले आहेत.त्यातील मजकुरावरुन :-
* वडिल-विठोजीराजे,
* आई- ठाकराईराणी,
* पत्नी- गिरिजाराणी/ म्हाळसाईराणी त्यांच्यापासुन दत्ताजीराजे ,अचलोजीराजे आणी राघोजीराजे असे तीन पुत्र असल्याचा उल्लेख आहे. राजेजाधवरावांच्या बखरीनुसार बहादुरजीराजे हे चौथे पुत्र होत.
तसेच दत्ताजीराजे यांना यशवंतरावराजे व लिंबाजीराजे उर्फ ठाकुरजी हे दोन पुत्र असल्याचा उल्लेख शिलालेखात आढळतो.
२) तंजावरच्या बृहद्दीश्वर शिलालेखात राजेलखुजीराव पुत्रांचे नावे नोंदवुन ठेवलेली आहेत त्यात दादाजी(दत्ताजी),अचल(अचलोजी),बहादुर आणी राघव(राघोजी) अशी ४ नावे दिलेली आहेत .
३) कविंद्र परमानंदकृत शिवभारत यात इ स १६२४ मधिल भातवडी युद्धात मोगलातर्फे लढत असलेल्या सेनानीची नावे दिलेली आहेत,त्यात खुद्द जाधवराव व त्यांचे पुत्र अचलोजी,रघुजी आणी बहादुरजी अशी ३ नावे दिलेली आहेत परंतु त्यांचे ज्येष्ठपुत्र दत्ताजी इ स १६२३ मधील खंडागळे हत्तीप्रकरणात मारले गेले होते असे ४ पुत्र होत.
४) सिँदखेडकर राजेलखुजीराव जाधवराव घराण्याची सातार्याजवळ कृष्णा काठी भुईंज येथे एक शाखा आहे. जाधवरावांचा वंश त्यांच्या बखरीत नमुद असुन त्यात जिजाऊच्या ४ बंधुची नावे= दत्ताजी,राघोजी,अचलोजी आणी बहादुरजी अशी दिलेली आहेत
५) बुलढाणा जिल्ह्यातील गैझिटियर मध्ये सिंदखेडकर राजेलखुजीराव यांची वंशावळ दिलेली आहे त्यानुसार विठोजी पुत्र लखुजी आणी राजेलखुजीचे पुत्र राजेदत्ताजी,राजेअचलोजी,राजेबहादुरजी आणी राजेराघोजी अशी ४ पुत्रांची नावे दिलेली आहेत.
६) या. मा. काळे यांनी "वर्हाडाचा इतिहास" या ग्रंथात राजेजाधवरावांचा वंशवृक्ष विविध साधनांचा आधार घेऊन केलेला आहे त्यात पत्नी- म्हाळसाईराणी , गिरिजाबाईराणी आणी यमुनाबाईराणी , म्हाळसाईराणी पासुन कन्या जिजाऊ आऊसाहेब व पुत्र राजेदत्ताजी , राजेअचलोजी,राजेबहादुरजी आणी राजेराघोजी . बंधु राजेभुतजी/जगदेवराव यांना बहादुरजी दत्तक दिलेले आहेत.
७) DR P M JOSHI यांनी ऐतेहासिक घराण्याच्या वंशावळी यात राजेलखुजीराव याना कन्या जिजाऊ आणी दत्ताजी,अचलोजी,बहादुरजी आणी राघोजी असे ४ पुत्र अशी नोंद आहे.
८) तसेच म्हाळसाईराणी या फलटनकर वनगोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या बहिण होत्या.तसेच यमुनाबाई व भागिर्थिबाई या राजेशिर्के व राजे महाडीक घराण्याच्या आहेत ,याची नोंद आढळते.
९) २५ जुलै इ स १६२९ रोजी राजेलखुजीराव व त्यांचे २ पुत्र राजेअचलोजी व राजेराघोजी व नातु राजेयशवंतराव(दत्ताजीराजे यांचे पुत्र) यांच्या हत्येनंतर राजे लखुजीराव यांच्या नातवाच्या व पणतुच्या नावे वतन चालु राहिले, याची नोंद राजेजाधवरावांची बखर व सुरतमजलीस या अस्सल कागदपत्रात आढळते.
१०) मालोजीराजे भोसले यांचा कोल्हापुर प्रांतातिल पराक्रम पाहुन निजामशहाने बाबाजीराजे यांच्या मृत्यु नंतर जप्त केलेली दीड हजारी मनसबदारी परत बहाल केली.तसेच त्यानंतर राजेलखुजीराव यांच्या मध्यस्तीने वनगोजीराजे निबांळकर यांची कन्या दिपाऊ यांचा विवाह मालोजीराजे यांच्यासोबत झाला.म्हणजेच राजेभोसले,राजेजाधवराव आणी राजेनिंबाळकर ही घराणे नातेसंबधानी तोलामोलाचिच होती, परंतु इतिहासकारानी पुढे शहाजीराजे व जिजाऊ यांच्या विवाहावेळी हि दोन घराणे नातेसंबधानी तोलामोलाची नव्हती हा चुकिचा इतिहास लिहिला हे यावरुन स्पष्ट होते....
११) राजे जाधवराव घराण्याच्या विद्यमान वंशजशाखा :-
** सिंदखेडराजा परिसरातील वंशजशाखा = देऊळगाव राजा, आडगाव राजा,उमरद देशमुख,किनगाव राजा, जवळखेड व मेहुणाराजा. या सहा वंशजशाखा.
** सिंदखेडराजा परिसराबाहेरील वंशजशाखा = करवंड (ता चिखली जि बुलढाणा) , करणखेड (ता चिखली जि बुलढाणा) , घनसावंगी( जि जालना) , सारवडी (जि जालना) , वडाळी( ता कन्नड जि छत्रपती संभाजीनगर) , तेल्हारा, माळेगाव बुद्रुक (बारामती) , मांडवे (सातारा), भुईंज (सातारा), माहेगाव देशमुख (कोपरगाव), पाटेवडी (नगर), कुंभारगाव (ता करमाळा), अक्कलकोट, भुम, वाडी, नांदेड (पुणे), वाघोली (पुणे)...
संदर्भ=
१) तंजापुरी श्रीबृहद्दीश्वरालयस्य शिलालिखितवंश तंजावर पृ ७-८,
२) सिँदखेडकर राजेजाधवराव बखर
३) सुरतमजलीस
४)शिवभारत अ 4 श्लोक 23ते 27 page 32,
५) मराठ्यांच्या इतिहासाची साधने ,
६) वर्हाडाचा इतिहास - या मा काळे ,
७) राजेलखुजीराव जाधवराव एक चिकित्सक चरित्र- डॉ बाहेकर
लेख - Rajenaresh Jadhavrao
No comments:
Post a Comment