विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 March 2024

स्वराज्यवीर छत्रपती शंभूराजे

 

स्वराज्यवीर छत्रपती शंभूराजे
lekhan :sachindada pawar


छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक ज्वलंत, तेजस्वी आणि पराक्रमी व्यक्तिमत्व. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर अनेक नाटके, चित्रपट, कादंबरी निघाल्या विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे इतिहासातील असे एकमेव व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त चित्रपट आणि नाटके निघाले असतील. परंतु याच माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना बदफैली, व्यसनी रंगवण्याचा प्रकार केला गेला आणि त्याला भर म्हणून कांदबरीकारांनी कपोलकल्पित असा इतिहास लिहून अजुन भर टाकली. या सर्व प्रकाराला कारणीभुत म्हणजे उत्तरकालीन, पेशवेकालीन बखरी. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर वा.सी. बेंद्रे, कमल गोखले, डॉ जयसिंगराव पवार आणि इतर इतिहाससंशोधकांनी अनेक कष्ट आणि संघर्ष सहन करत छत्रपती संभाजी महाराजांचा खरा आणि तेजस्वी असा इतिहास आपल्यासमोर मांडला. छत्रपती संभाजी महाराजांचे आणि छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी सोयराबाई सरकार यांचे कसले हि मतभेद नसताना काही लोकांनी हे मतभेद मांडण्याचा अनाठायी प्रयत्न केला आणि ते सिद्ध करण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज महाराजांच्या लग्नास छत्रपती संभाजी महाराज यांना निमंत्रण नव्हते हा दाखला काही इतिहासकार आणि कादंबरीकार लोक देत असतात पण याची वास्तिवकता काय आहे ते आपण इतिहासाच्या वेगळ्या दृष्टिकोणातून पाहू ..
छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ मार्च १६८० रोजी छत्रपती राजाराम महाराज यांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी रायगडावर लावून दिले. ह्या समारंभास संभाजीराजे हजर नव्हते तर ते पन्हाळगडावर होते आणि छत्रपती शिवाजी महाराज, सोयराबाई महाराणी सरकार यांच्यामध्ये आणि संभाजीराजे यांच्यात मनभेद असल्याकारणाने संभाजीराजेंना या लग्नाचे आमंत्रण दिले नसावे असे काही इतिहासकारांचे मत आहे तसेच आपल्याही मनात संभाजीराजे पन्हाळगडावर असूनही लग्नास का हजर नाहीत हा प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु संभाजीराजे हे यासमयी पन्हाळगडावर ही नव्हते तर ते बृहाणपुर या मोगली ठाणे असलेल्या मोहिमेवर होते. संभाजीराजे मोगली छावणीतून स्वराज्यात पन्हाळगडावर आले तेंव्हा १३ जानेवारी १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भेट झाली. त्यासमयी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजे यांना पन्हाळा प्रांताची मोठी सुभेदारी आणि दिलेरखानाच्या तत्कालीन मनस्तिथिचा फायदा घेण्यासाठी मोगलांविरूद्ध मोहिमेची खास जबाबदारी दिली होती. याच जबाबदारीचा एक भाग आणि शिवरायांची आज्ञा म्हणून संभाजीराजे मार्च १६८० मध्ये बृहाणपुरच्या मोहिमेवर होते. बृहाणपुरची स्वारी आटपुन संभाजीराजे मार्च १६८० अखेरीस पन्हाळगडावर आले असावेत. त्यामुळे या धामधुमीच्या प्रसंगी संभाजीराजे रायगडावर लग्न समारंभास हजर असणे शक्य नव्हते आणि त्यांना निमंत्रण नव्हते किंवा सोयराबाई सरकार आणि संभाजी महाराज यांच्यात मतभेद होते हे ही म्हणणे ईष्ट नाही ...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...