छत्रपती शंभूराजे आणि गोवेकर
जुन्या गोव्याच्या उत्तरेस मांडवी नदीचे दोन फाटे आहेत ते या बेटाच्या दोन्ही बाजूंनी जातात जुन्या बेटाच्या पश्चिमेस दिवाड आणि क्षेत्र नारवे ही ठिकाणे आहेत.....
संरक्षणाचे दृष्टीनेच त्याचे तट उंच आणि मजबूत बांधणीचे केले होते अनेक वर्षांपूर्वी गोवे पोर्तुगीजांच्या ताब्यात आले ती तारीख २५ नोव्हेंबर ही होती या विजयाच्या स्मरणार्थ सेंट। कॅथेरिन नावाचे एक लहानसे चर्च बांधले होते."
२४ नोव्हेंबर, १६८३ रोजी मराठ्यांच्या ४० लोकांच्या तुकडीने रात्री जुवे बेटात प्रवेश केला तटबंदी बरीच उंच असल्यामुळे शिड्या लावून प्रवेश करावा लागला किल्ल्यात अजिबात शिबंदी नव्हती एक म्हातारा किल्लेदार होता...
एक तोफखानेवाला होता मराठ्यांनी त्यांना ठार केले आणि दुसऱ्या बाजूस असलेल्या आपल्या लोकांना इशारा देण्यासाठी तोफांचे आवाज केले ते आवाज गोव्यातील लोकांस ऐकू गेले आणि लोक खडबडून उठले गोवे शहरात लोकांना घंटा वाजवून जागे करण्यात आले....
ह्या वेळी मांडवी नदीस भरती येत होती पाद्री लोकांनी शस्त्रे गोळा केली आणि शहराच्या तटाकडे पळत सुटले विजरई कोद दी आल्व्हरने धावजी गावा जवळ येऊन शत्रू त्या बाजूने। येईल म्हणून वाट पाहत तेथे रात्र काढली.....
२५ नोव्हेंबर रोजी विजरई ४०० लोकांना घेऊन जुवे बेटात आला "तोफा येईपर्यंत थांबावे पुढे जाऊ नये"असे काही लोक सांगत होते पण विजरईन ते मानले नाही तो टेकडी चढावयास लागला किल्ल्यावर पोहचे पर्यंत ३०० लोक राहिले जोराचा मारा दिला....
मराठे पळून गेले दुसऱ्या तुकडीचे ३०० घोडेस्वार किल्ल्यावर आले आणि पोर्तुगीज सैन्यावर तुटून पडले विजरईने आपल्या लोकांस माघार घेण्यास सांगितल्यावर सैनिक सैरावैरा पळू लागले शिपाई डोंगराकडून थेट नदीतीराकडे धावत सुटले.....
विजरई काकुळतीस आला अगदी साश्रु नयनाने त्याने लोकांना विनविण्या करून रोखण्याचा प्रयत्न केला पण लोक अतिशय घाबरले होते विजरई परत फिरला मराठ्यांच्या चार घोडे स्वारांनी पाठलाग केला त्या चार घोडे स्वारांच्या तडाख्यातून तो वाचला....
फक्त जखम झाली एका कॅप्टनने त्याला या भीषण प्रसंगातून वाचविले पोर्तुगीज सैन्यावर तटबंदीवरून अणकुचीदार दगडांनी मराठ्यांनी वर्षाव केला त्यामुळे अनेक लोकांची डोकी फुटली, रक्तबंबाळ। अवस्थेत सैनिक पळू लागले....
सगळीकडे आकांत झाला दीडशेपेक्षा अधिक लोक मेले जे जगले ते। सर्व जखमी अवस्थेत घरी पोहचले विजरईच्या दंडात गोळी लागली होती दोम द रोद्रीगो कास्ताच्या तोंडावर गोळी लागली होती....
दोघेही रक्तबंबाळ झाले होते ४० लोकांच्या मदतीने त्यांचा प्रतिकार चालू होता शेवटी दोन वाजता विजरई खाडीवर पोहचला घोडे मराठ्यांनी घेतले....
भरतीमुळे नदी तुडूंब भरली सगळीकडे पाण्याचा फुगवटा वाढला पायी जाणे अशक्य झाले विजरई कोंद दी आल्व्हर आणि कॅप्टन दोम द रोद्रीगो कास्ता छातीभर पाण्यात उतरले आणि मचव्यात घुसले व पळाले ज्यांना नावा मिळाल्या नाहीत ते चिखलात अडकले त्यांना मराठ्यांनी ठार केले....
नदीला लागून असलेल्या शेतांचे बांध फोडल्यामुळे नदीचे पाणी पसरले आणि पात्र रुंद झाले सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे बरेच पोर्तुगीज सैनिक बुडून मेले संभाजीराजे स्वत: या मोहिमेचे नेतृत्व करीत होते मराठे आता नदीतून कापाकापी करीत जाण्याच्या विचारात होते....
नदीच्या पलीकडील लोक ही लढाई पाहत होते संभाजी महाराजांनी आवेशाचे भरात आपला घोडा पाण्यात घातला पण भरतीमळे पाण्याचा वेगही फार होता त्यामुळे घोडा पहुणीस लागला खंडो बल्लाळ याने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी टाकली आणि संभाजी महाराजांचा घोडा तीरावर आणला असे म्हणतात.."
"ते दिवशी गोवे घ्यावयाचे, परंतु फिरंगियांचे दैव समुद्राने रक्षिले"
संभाजी महाराजांनी खंडो बल्लाळचा उचित सन्मान केला, त्यास बक्षिस दिले, असा मल्हार रामराव चिटणीस बखरीत या बाबतीत उल्लेख आढळतो.....
"फिरंगी मोडिला लोक फार मारिले असता पळून गोव्याचे किल्ल्यांत गेले महाराजांनी तलवार मारिली शिपायगिरी केली गोवेकर सावध झाले पाणी चढले तेव्हां माघारे फिरले तो खासा । दियावरून जिनास पाणी लागता घोडा घातला....
याज बरोबर घोडा पहूणीस लागला खंडो बल्लाळ नी उडी टाकून महाराजांचा घोडा धरून पोहून बाहेर निघाले ते समयीं बहूत संतोष होऊन पोटाशी धरले आणि बोलिले जे, 'तुझे वडील निरपराध लुच्यांचे सांगण्यावरून विचार न करितां मारिले ।
असतां आज चाकरीची शर्त केली! तुझी चिटणिशी महाराजांनी वंशपरंपरे करून दिली निसबतीचे धंदे कारखानिशा जमानिशा ते बहाल आहेत कैलासवासी शिवाजी महाराज तुमचे वडिलांवरी प्रीती विश्वास ।
ठेऊन करीत होते ते पाहिले आहे त्याहून अधिक तुम्हावर प्रीती विश्वास ठेऊन चालवीन कुली खरे!'ऐसे नावाजन 'आमचे वंशीचा असेल तो परंपरेने तिन्ही धंदे चालवील, ऐसें पुन: आश्वासन देऊन घोडा बक्षिस दिला....
खासा उतार पोशाख व मोत्यांची कंठा व तुरा दिला स्वारी माघारी आलियावरि पालखी ।बहुमान देऊन गौरव करून मुतालिक लिहिणार बोलावून, त्यांचे आज्ञेत सांगतील तसें चालावें, तेरीख पत्रे यांचे सांगण्या खेरीज लिहूं नये, ऐसे सांगितले वरकड लोकही बरोबरचे यांणी कामेकाजें केली......
तरवारा मारिल्या व पाण्यात उड्या टाकिल्या, त्यांस बक्षिसे दिल्ही तैनातीही वाढविल्या महाराज संगमेश्वरीच राहते जाले
गोव्याच्या व्हाइसराॅयने पोर्तुगालला राजाकडे पाठविलेल्या रिपोर्टात २५ जानेवारी, १६८४
मध्ये गोव्याच्या संभाजी महाराजांचा घोडा मांडवी नदीत पोहणीस लागला वगैरेचा उल्लेख नाही....
मराठ्यांच्या तीव्र हल्ल्यामुळे पोर्तुगीज सैन्य सैरावैरा पळू लागले व सैन्याने पाठ फिरविली एवढाच उल्लेख आहे."
मनुचीने या लढाईची माहिती दिली आहे ती अशी इ.स.१६८३ च्या पंचवीस नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजता संभाजीने ओहोटीच्या वेळी आपले चार हजार सैन्य पाठवून सेंटोएस्टेव्होचा किल्ला ताब्यात घेतला....
संभाजीचे सैन्य किल्ल्यात घुसले आणि त्यांनी किल्ल्यातील सर्व शिबंदीची कत्तल केली संभाजीच्या सैन्याची मुळीच हानी झाली नाही किल्ला ताब्यात आला याचा इशारा म्हणून संभाजीच्या सैनिकांनी अनेक गोळे सोडले त्या वेळी गोव्यात विलक्षण गोंधळ उडाला.....
दुसऱ्या दिवशी व्हाइसरॉयने किल्ला परत घेण्याचा प्रयत्न केला पण डॉम डिकोस्टा याच्या मर्जीस ही गोष्ट आली नाही त्याचा सल्ला असा की, पुलाच्या टोकापाशी दोन तोफा उभ्या कराव्या आणि सेंटोएस्टेव्होच्या किल्ल्यातून मराठे बाहेर येऊ पाहत असतील...
त्यांना रोखून धरावे याशिवाय गोव्याच्या भोवती लहान लहान नावांची सारखी गस्त चालू ठेवावी आणि मराठ्यांनी गोवे घेण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडावा....
डॉम रॉड्रिग्जचा सल्ला अंमलात आणणे सहज शक्य होते अशा नाकेबंदीने एस्टेव्होच्या किल्ल्यात असलेल्या मराठा सैनिकांना शरण येणे भाग पडले असते पण व्हाइसरॉयचा स्वत:च्या निर्णयावर विश्वास होता त्याने किल्ल्याकडे सैनिक पाठविण्याचे ठरविले....
त्याने १५० सैनिकांची निवड केली ज्याला यायचे असेल त्याने माझ्या मागे यावे असे तो मोठमोठ्याने ओरडू लागला तो किल्ल्याच्या आत गेला आणि तटाला वेढण्याचा त्याने प्रयत्न केला.....
या प्रयत्नात संभाजीच्या सैन्याने व्हाइसरॉयची आणि डॉम रॉड्रिगो हे आपल्या नावा पर्यंत पोहचले आणि पळून आले नाही तर इतरां प्रमाणे त्यांचीही कत्तल झाली असती त्यांना परतण्यास हा वेळ मिळाला तरी कसा?
तर त्याचे उत्तर असे की, माझा मित्र एक ऑगस्टियन पाद्री पेडोडी सिएरा याने व्हाईसरॉय वरील गंभीर संकट ओळखून पुलाला लागूनच काही माणसे गोळा केली होती त्यांनी जवळच असलेला उसाचा मळा लुटला...
प्रत्येकाने एक एक ऊस हातात धरला त्यांच्या पैकी अगदी थोड्यांच्या जवळ बंदुकी होत्या त्यांचे त्यांनी वायबार काढले या लोकांना पाहून मराठ्यांना वाटले की, व्हाइसरॉयला मदत करण्यास आलेले पथक ते हेच त्यांनी
पाठलाग थांबविला....
त्यामुळे व्हाईसरॉयला नावेत चढण्यास वेळ मिळाला पण त्यांची अनेक माणसे चिखलात फसून राहिली आणि मराठ्यांच्या बाणांस व बंदुकीस बळी पडली इतर माणसे पाण्यात बुडून मेली....
नावेत चढण्यापूर्वी व्हाईसराय आणि डॉम रॉड्रीग्ज याने बंदुकीने आपले घोडे ठार मारले ते मराठ्यांच्या हाती पडू नयेत हा त्यांचा उद्देश होता....
सँटोएस्टेव्होचे बेट संभाजीच्या ताब्यात राहिले मराठे आता गोव्याला भिडल्यासारखे झाले गोवे शहराला मराठ्यांमुळे अतिशय उपसर्ग होऊ लागला शेवटी संभाजीकडे वकील पाठवून तह होऊ शकतो का हे पाहण्याचा प्रयत्न केला....
मला दुसऱ्यांदा संभाजीकडे जावे लागले मी संभाजीच्या छावणी जवळ पोहचलो तेथे मला एक हेर भेटला तो त्यावेळी संभाजीच्या नोकरीत होता त्याने मला ताजी आणि खरीखुरी बातमी दिली तो म्हणाला की,
"औरंगजेबाचा मोठा मुलगा शहाआलम याचे सैन्य अगदी जवळ येऊन ठेपले आहे ही बातमी ऐकून तहाच्या वाटाघाटी करण्याचा बेत मी टाकून दिला....
मराठ्यांनी सांत इन्सव्हाव जिंकले हाती काहीच लागले नाही फक्त विजरईची फजिती झाली गोवा पण घेता आला नाही किल्ला ताब्यात घेतल्यावर तेथील चर्च मराठ्यांनी जाळले आत लेडी व्हर्जिनची मूर्ती होती ती फोडली जिथे जिथे चर्च दिसले ते फोडले पोर्तुगिजांचा धर्मछळ मराठ्यांना माहित होता त्याचाच हा राग असावा....
जेधे शकावलीतील नोंद - शके १६०५ रुधिरोदगारी संवछरे मार्गशीर्ष मासी फिरंगियांचे कुंभारजुवे घेतले साष्टी बारदेश मारिला....
जुवे व कुंभारजुवे ही बेटे एकमेकास लागूनच आहेत त्यामुळे जुवे ऐवजी कुंभारजुवे असा उल्लेख शकावलीत आला असावा....
विजरईने १६ डिसेंबर, १६८३ ला पोर्तुगालच्या राजास पत्र लिहून कळविले त्यात तो लिहितो-"मी गोव्याला येऊन पोहचल्यावर अवघ्या काहीच दिवसांत शत्रूने काहीसा इश्वतेव्हांव (सेंटा स्टिफन) ह्या बेटावर हल्ला चढविला....
ती बातमी कळताच माझ्या हाताशी जे मूठभर लोक होते त्यांना घेऊन दुसऱ्या दिवशी मी शत्रूवर चाल करून गेलो आम्ही ज्या निश्चयाने शत्रूवर हल्ला चढविला तो निश्चय पाहून शत्रू भ्याला व त्याने पळ काढण्यास सुरुवात केली.
परंतु आमच्या सैनिकांच्या हातून जे वर्तन घडले ते अतिशय लाजिरवाणे होते शत्रूचे एक लहानसे घोडदळ तेथे होते ते घोडेस्वार पाहन आमच्या सैनिकांना ते आपणावर चालून येत असावे असे वाटले व त्यांनी शत्रूला पाठ दाखवून पळ काढण्यास सुरुवात केली.....
शत्रूची आमच्या सैन्याने एवढी दहशत घेतली की त्या भरात त्यांनी एकदम नदीत उड्या टाकल्या काही सैनिक नदीत बुडून मेले शेवटी५० माणसांसह मी माघारी परतलो शत्रूने आमचा पाठलाग केला, पण नंतर त्याने
तो नाद सोडून दिला त्याच रात्री मी नदी ओलांडली व आमच्या उतरेकडील आरमारातील काही नौकांना सां इस्वेव्हाव बेटाकडे जाण्याचा हुकूम केला त्या युद्ध ।नौकांच्या भीतीने म्हणा अथवा अन्य कोणत्याही जबरदस्त कारणामुळे म्हणा शत्रूने किल्ला खाली करून पैलतीर गाठले...
त्याला माघार घेण्याची एवढी घाई झाली की, त्याने केवळ आपला तोफखानाच नव्हेतर पुष्कळ सामान मागे टाकले त्याने वापरलेली हत्यारे नदीत सापडतात दोन दिवसांनी संभाजीने राजपुत्र अकबर आपल्या बरोबर असल्याचा बहाणा करून तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी आमच्याकडे एक दूत पाठविला.
परंतु त्या दूताने अधिकारपत्र आणले नव्हते म्हणून आम्ही त्याला अधिकृत दूत म्हणून मानण्यास नकार दिला मोघल बादशहा संभाजीवर गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही स्वारी करणार असल्याची वदंता आहे....
त्याने जर चिकाटीने स्वारी केली तर त्याला संभाजीचा नाश करणे अशक्य होणार नाही परंतु मोघल बादशहा हा स्वभावाने चंचल असल्या कारणे त्याच्यावर विश्वास ठेवावा असे वाटत नाही.....
संभाजीशी आम्हास पुनः तह करता येईल परंतु मोघलांशी त्याचे जे युद्ध होणार आहे, त्या युद्धातून गोकळा झाल्यावर त्याने जर वचनभंग करून आमच्यावर स्वारी केली, तर पुढे काय करायचे?
म्हणून महाराज, माझी आपणाला विनंती आहे की, आपण ह्या राज्याच्या रक्षणाच्या प्रश्नाकडे गंभीरपणे बघावे आम्हाला सैन्य, शस्त्रे, दारूगोळा आणि कसलेले सेनापती तर पाहिजेच आहेत, पण त्याच बरोबर पैशाचीही मदत हवी आहे, कारण ह्या राज्याचा जो महसूल मिळतो, तो खर्चालाच पुरत नाही....मग युद्धाचा खर्च कसा भागवायचा?.... "
मराठ्यांनी जुवे बेट सोडले अली आदिलशहा या विजापूरच्या बादशहाने मोठ्या सैन्यानिशी इ.स. १५७० मध्ये या बेटावर स्वारी करून हे बेट जिंकले होते पोर्तुगिजांच्या आरमाराने यावेळी वेढा घालून बेटात घुसलेल्या आदिलशाही सैन्याचा धुव्वा उडविला होता....
त्यामुळे या बेटास 'मृतांचे बेट' (Iha Dos Mortos ) असे पोर्तुगीज संबोधू लागले मराठ्यांनी जुवे बेट सोडले.
मराठ्यांनी जातांना आपल्या बंदुका, सामान सुमान किल्ल्यात टाकून दिले पोर्तुगीजांनी मांडवी नदीच्या मुखावरील आग्वाद रेईस मागुस,काबु व मुरगांव ह्या किल्ल्यांच्या बंदोबस्तासाठी आरमार तयार ठेवले होते
त्याने झेविअरकडे करुणा भाकली सर्वांनी मशाली पेटवून तळघरात जाऊन सेंट झेविअरची पेटी उघडली विजरईने आपला "राजदंड" व "राजचिन्हे" झेविअरच्या पायाशी ठेवली.....
पोर्तुगालच्या राजाच्या वतीने स्वलिखीत असा अर्ज झेविअरच्या कॉफिनमध्ये ठेवला त्या अर्जात राजाचे नावाने प्रार्थना होती की, राजसूत्रे हाती घेऊन सेंट प्रान्सिसनी गोव्याचे संरक्षण करावे.....
पिअर जोसेफ द ओलैया हा फ्रेंच जेसुईट, इंग्रजीत भाषांतरीत झालेल्या आपल्या History of Shevaji & Of his suceessor, recent conquerors of India या ग्रंथात म्हणतो.....
"इ.स. १६८३ साल अखेर म्हणजे नाताळच्या सुमारास गोवा शहर संभाजीच्या धोक्यापासून मुक्त झाले व्हाईसराॅयची अशी भावना झाली की, प्रस्तुत संकट टळले ते आपला पराक्रम, धैर्य ह्यांमुळे नसून दैवी कृपेमुळे,विशेष करून सेंट झेवियरने त्या शहराचे सरंक्षण केल्यामुळे.
व्हाइसराॅयची त्याच्यावर भक्ती बसण्याचे कारण की तो लढाईत प्राणांतिक जखमी झाला असता ती जखम सेंट झेवियरच्या चबुतऱ्या समोर बरी।झाली होती गोवा शहरावरील संकट टळलेले पाहून केवळ कृतज्ञता म्हणून व्हाइसराॅयने आपली राजचिन्हे सेंट झेवियरला अर्पण केली...
व यापुढे आपण झेवियरच्या वतीने राज्य करणार असे जाहीर केले हा विधी चालू असतांनाच बातमी आली की 'शहाआलम मोठे सैन्य घेऊन पोर्तुगीजांच्या मदतीस येत आहे....
त्यामुळे ही कृपा सेंट झेविअरने केली आणि त्याने गोव्यास वाचविले तो आमचा रक्षणकर्ता (Patron Saint)म्हणून समजले जाऊ लागले गोवा शहरावर मराठ्यांच्या हल्ल्याच्या भीतीने पोर्तुगीजांनी आपली राजधानी मार्मा गोव्याला हलविण्याचा निर्णय घेतला."
संदर्भ - ज्जवलनतेजस संभाजीराजा....
No comments:
Post a Comment