विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 28 March 2024

पानिपत वीर सदाशिव भाऊ पेशवा विश्वासराव पेशवा व सरदार संताजी वाघ यांच्यावर पानिपतवर झालेले अंत्यसंस्कार व समाधी

 

पानिपत वीर सदाशिव भाऊ पेशवा विश्वासराव पेशवा व सरदार संताजी वाघ यांच्यावर पानिपतवर झालेले अंत्यसंस्कार व समाधी🚩
🚩लेखन ::संतोष झिपरे











!!सहसंदर्भ देत आहोत!!
पानिपतच्या लढाईवर मराठ्यांच्या वतीने गोसाव्यांचे एक पथक एक आपलं पराक्रम गाजवित होतं यातील प्रमुख होते आणि अनुप गिरी गोसावी व चरणागिरी गोसावी होय आणि पानिपतच्या पराभवानंतर पुढे काय झालं याबद्दल इतिहासाची साधना खूप कमी बोलतात आणि मराठ्यांचे खूप कमी इतिहासकार याबद्दल लिहिताना दिसतात सदर पत्र हे पाणीपतवरून अनुपगिरी गोसावी यांनी लिहिलेले असून पुण्यात नानासाहेब पेशव्यास पाठवला आहे या पत्रात अनुपगिरी गोसावी यांनी सदाशिव भाऊं व विश्वास राव पेशवे तसेच सरदार संताजी वाघ यांच्या वर अंत्यसंस्कार केल्याचे स्पष्ट उल्लेख या पत्रातून दिसून येते व सदाशिव भाऊ पेशव्यांचा देह कशाप्रकारे त्यांच्या ताब्यात आलं याचाही उल्लेख या ठिकाणी केला आहे.. तोफखाना प्रमुख इब्राहिम खान गार्दी व विश्वासराव पेशवा गोळ्या लागून ठार झाल्याचे उल्लेख या ठिकाणी आला आहे तसेच सदर अंत्यविधी पेशव्यांच्या खिजमतगार बलराम व , काशीराज वकील,(काशीराज बखरकर) वाघोजी नाईक मंडळी साक्षीदार असल्याचे या पत्रावरून दिसतं तसे. .....
सादर अनुपगिरी गोसावी यांनी पुण्यास नानासाहेब पेशवे यांनी लिहिले पत्र पुढील प्रमाणे आहे.......
[ ४०७ ]
श्रीरामनाम शके १६८२ माघ वद्य २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नाना यांसिः-
प्रति राजा अनुपगीर जय सदाशिव उपरि येथील क्षेम जाणून, आपलें क्षेमं ता। छ १५ रजब पा। कुशलवृत्त लेखन करून, चित्त प्रमोदवीत गेलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाहाले, आपणाकडून पत्रार्थ अवगत होत न होत. तेणेंकरून फार चिंत्तावस्थ निर्माण जाहलें. तितक्यांत रा। गणेश वेदांतीचा पत्रावरून सर्व साकल्यें कळों आलें. युधप्रसंगीं, छ ८ जमादिलाखर, पुशे सुध ८, बुधवारी, माहायौवनासीं झुजांत रणमंडलांतून श्रीमंत रायासी दुरानी घेऊन आले. त्या समागमें रा। बापू हिंगणे होते. ते दुसरे दिवशीं तृतीय प्रहरीं नवाब सुजातदौलाकडे वर्तगान आले. त्यासि नवाब सुजातदौला समाचार ऐकोन रायीचे लोभ आपणाजवळ आणविले. तेव्हां आह्मांसी आज्ञा केलें की येथासांग याचें सार्थक करणें. रजा दिले. तेव्हां आपले डेर्यासी घेऊन आलों. रा। गणेश वेदांती, रा। गणेश शेंकर उज्जनकर, रा। कासीराज वकील, वेणीप्रसाद यासमागमें गेलो. तितक्यांत माहा यौवनाचें नशेकची येऊन लोथ परतोन नेलें. दुसरे दिवसीं महाप्रयत्न करावा लागलिया उपरांत माहायौवनाचें शैन्यांतच होते. तिसरे दिवसीं सुक्रवारीं वर्तमान ऐकिलें कीं, रणभूमींत स्वामिर्कायीनीमत्य थोरथोर सरदार कार्येसी आले आहे. ह्मणोन वर्तमान ऐकिलें. त्यासी, नवाब साहेबासी सांगून रणभूमिका शोध केलों. त्यामधें एका शरीरासी मस्तक न होते. तें शेरीरासी पाहोन, कोणाचें आहे ह्मणोन शोध केला. त्या शरीराखालीं सात मोतीं सांपडले. त्यांचे चिन्हें उजवे पायावर केश नव्हते. दुसरें कठारीचे जखम कमरेसी होतें. ते पाहोन, सरकारचे खिजमतगार रविवारी येथ आले होते, त्यांचे नांवें बलराम, वाघोजी नाईक, रा। गणेश वेदांती, वरकड आपले कारकून मंडळी, जे आले होते, सर्वांनी पाहिलें. तेव्हां संताजी वाघ या (णि) उभयतांसी हस्तीवर घालून आणलें. मग चेंदनादिक विधी करविलें. मग अस्ती ब्रामणद्वारेंकडून रा। गणेश वेदांतीनें भागीरथीसीं पाठविलें. याउपरि आपणासी शंदेह : निर्माण जाहलें असल्या तर आला जाठाकडे कांहीं फौजा गेले आहेत त्याची बातमी आणून वकिलाचे पत्रावरून विदित केला पाहिजे. विशेषः
सो।सी गणेश शेंकर उजनकर सां। नमस्कार विनंति उपरिः येथील वर्तमान सविस्तर पत्रीं लिहिलें आहे, त्याजवरून विदित होईल. बहुत काय लिहिणें ! हे विनंति.
___________________
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य लेख व माहिती संकलित -संतोष झिपरे 9049760888
___________________
काशीराजाच्या बखरींतील वर्णन विस्तृत आहे. (पा. संग्राम. पृ. १०४-१०६) सुजाउद्दील्यानें पाणी वाहणारे भिस्ती (पखाली)बरोबर घेऊन पानिपतच्या रणांगणावर शोध केला. तेव्हां एक प्रेत काढतांना त्यावरून मूल्यवान मोती( सात) खाली पडले. शरीरावर पैशाएवढा काळा तीळ पायावर मत्स्याची खूण व पाठीवर मुजफ्फरखानानें केलेली कट्यारीची जखम अशा खुणा दिसल्य। त्यावरून तें प्रेत भाऊंचेच अशी खात्री झाली. एका दुराणी शिपायानें भाऊचे शिर लपवले होतें तेंही नतर मिळालें. शुजाउद्दौल्यानें भाऊंचें प्रेत व संताजी वाघाचे प्रेत दोन्ही हत्तीवर घालून आणली आणि काशिराजाकडे संस्कारासाठीं दिली. काशीराजाच्या दोन पत्रांत भाऊसाहेब' व विश्वासराव यांच्या शवावर आग्निसंस्कार केल्याचा उल्लेख आला
आहे.
सं- काशी राजाची बखर
_________________
सादर पत्र हे सरदार पानिपत वीर सटवोजीराव जाधवराव वाघोलीकर यांनी पानिपतच्या लढाईनंतर आपले पुत्र सुभानजी राव जाधवराव यांनी लिहुन पानिपतच्या लढाईतील वर्तमान सांगितले आहे व पेशवे नानासाहेब पेशवे व सरदार इब्राहिम खान गारदी गोळी लागून ठार झाल्याचा उल्लेख या पत्रातून स्पष्टपणे केला आहे सादर पत्र पहा.
४०६ ]
श्री शके १६८२ माघ शुद्ध १.
श्रियासह चिरंजीव राजश्री सुभानबा यासीः--
सटवोजीराव जाधवराव आशिर्वाद उपरि येथील वर्तमान ता। माघ शु॥ १ मुक्काम कुंभेर यथास्थित असे. विशेष. पाणिपतावरी अडिच महिने मोर्चेबंदी करून राहिलों होतों. गिलजाचा आमचा दोकोसाची तफावत होता. सध्या फौजा पुढें, मागें बुणगें, याप्रमाणें मोर्चे बांधून, तोफा पसरून, राहिलो होतो. एक लढाई कार्तिक शु॥ १५ मेस जाली. व दुसरी लढाई आमावाशेष जाली. दोन्ही लढायांत दोहीकडील फौजा कायेमच होत्या. गिलजा आमच्या लष्कराभोंवता फिरोन रस्तबंद केली. वैरण जाळली. यामुळे लष्करांत काळ पडला. दोन अडीच शेर दाणे जाले. लोकांस अन्न न मिळे, ऐसा प्रसंग जाला. घोडीं तो बहुत लोकांचीं मेलीच होती. राहिली तींही पोटामुळे तुटली होती. निदान प्रसंग जाणोन, पौषशु॥ अष्टमी बुधवारी हल्ला केली. पुढे फौजा, त्यापुढें तोफखाना, बुणगें पाठीवर समागमें घेऊन, निघोन, मोगलावर चालोन जाऊन, जुंज उत्तम प्रकारें केलें. अडीच तीन प्रहरपर्यंत कुंज चांगलेच जालें. राजश्री विश्वासराव यांस गोळी लागोन ठार जाले. इभ्रामखान गारदी यासे गोळ्या लागोन ठार जाले. वरकडही कितेक मातबर लोक कामास आले.
आपले फौजेनें शिकस्त खादली. ज्यास जिकडे सोय पडली तिकडे निघाले. कोणी कोणास मिळालें नाही. राजश्री मल्हारजी बाबा हजार दोन हजार फौजेनशीं निघाले. रा। नारोशंकर दिल्लींत होते. त्याजपाशीं फौज पांच सात हजार होती. तितक्यानिशी निघोन, सौभाग्यवती पार्वतीबाई दोन च्यारशें स्वारांनिशी निघाली होती त्यांची राजश्री मलारजीबावाची गांठ वाटेस पडली, त्यांजला ते संभाळून घेऊन चमेलीपार भदावरच्या मुलकांत गेले. वरकड फौज बाळोच्याच्या मुलकांतून ज्यास जिकडे वाट फुटली तिकडून निघाली. वाटेनें गांव मातबर. गांवोगांव रावतांचा भरणा. जाबीगार फार. दोन रोज रात्रंदिवस गवारांचे जुंज पुरवलें. घोडीं थकोन राहिली. कोणाचे घोडें निभावलें नाहीं. तमाम फौजा पायउतारा जाली. आमचींही घोडीं तमाम थकलीं. आह्मी मागाहून डोल्यांत व गाड्यांत बसून हळू हळू कुंभेरीस आलों. तेथून भरतपूरास जात होतों तों ठाकूर सुरजमल्ल यांनी सामोरे येऊन भेटले. फिरोन ते व आह्मी समागमें कुंभेरीस आलों. तेथून रा। मलारजी बाबाकडे पत्रें लिहून पाठविलीं आहेत. त्यांचे प्रतिउत्तराची मार्गप्रतीक्षा करीत असो. दो चौ रोजांनी त्यांचे उत्तर आलें ह्मणजे येथून स्वार होऊन आपल्या परगण्यांत सिपरी व कुलारसास जाऊं. तेथून सविस्तर वर्तमान तुह्मास लिहून पाठवूं. सिपरी येथून चौ रोजांची वाट आहे. लौकरीच जाऊं. सौ। पार्वतीबाई व रा। मल्हारजी होळकर जिवानिशीं मात्र गेलीं. रा। भाऊसाहेब कोणीकडे गेले त्याचे अद्यापि ठिकाण नाहीं. रा। जनकोजी शिंदे, त्यांचेही ठिकाण नाहीं. वरकड सरदार, कोणी पुढें गेले, कोणी अद्याप मागेंच आहेत. सारांश, आपले फौजेचा विध्वंस जाला, तो लिहितां पुरवत नाहीं. ईश्वरी सत्तेनें होणार तें जालें. सिपरीस गेलियावर सर्व सरंजाम नवा केला पाहिजे. ईश्वरी कृपेनें होऊन येईल. तुह्मी कोणेविशीं जाळकी न करणें. तुह्मी आपले ठाई सावध राहणें. आपलें वर्तमान लिहून पाठविणें. बहुत काय लिहिणें ? हे आशिर्वाद.
______________
या काळात दिल्ली व पाणीपतवर उपस्थित असलेल्या तसेच मोगल इतिहासकारांनी काय दिला आहे ते आपण पाहू
पाणिपतची बखर कितीकांचे तोतये जाहाले - 🚩🚩भाऊसाहेब केवळ ... मंगळवारीं पौष शुद्ध २ अवतार संपविला--🚩🚩
पानिपतचे निकाली युद्ध १४ जानेवारी १७६१ रोजी, बुधवार पौष २७ अष्टमीस झाले. शेजवलकर व रियासतकार सरदेसाई दोघांनीं पौष शुद्ध अष्टमी हीच तिथी ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारें ग्राह्य मानली आहे. सटवोजी जाधवरावाचे दोन्ही पत्रांत हीच तिथी येते. ( राजवाडे खंड १, क्र. ४०९)🚩🚩 पौश शुद्ध अष्टमात श्रीमंत राजश्री भाऊसाहेब यांणी आपल्या फौजेनिशीं अब्दालीवरी चालोन गले 🚩🚩- ( राजवाडे खंड ६, क्र. ४०६) मध्ये - निदान प्रतंग जाणोन पौप शुद्ध अष्टमी बुधवारी हल्ला केला. असा उल्लेख आहे. नाना पुरंद-यांच्या मातोश्रीला लिहिलेल्या पत्रात (पु. द. ३, क्र.२०९) पौरा शु ॥ ८ अष्टमीस श्रीमंतांनी गिलज्याचे फौजेसी जाऊने युद्धे मात्र मातवर केले म्हटले आहे. याखेरीज पहा-नाना फडणीस पत्र ( पु. ६ १, क्र. ४१७ ) भाऊसाहेबांचे ठिकाण लागले नाही असा उल्लेख कांहीं कागद पत्रांतून येतो तर कांहीं कागदपत्रोत, रणांगणावर नंतर भाऊसाहेबांचे प्रत सांपडले व त्याचेवर अग्निसंस्कार करण्यात आला असे उल्लेख आढळतात: याबद्दल
१) फारशी ग्रंथ खजानाये अमिरा २) नजीबखान चरित्र ३) शहानामाये अहमदिया ४) तारीखे फैजवक्ष ५) मनाजिल अल्फतूह ६) इमादुस्सादत्त ७) तारीखे सुलतानी ग्रंथकार।
पा. संग्राम्. पृ.
लेखक
बिलग्रामी ५९ नुरुद्दीन निजामुद्दीन ७३ शिवप्रसाद ७८ शाम्लू सय्यद गुलामअली नकबी.. ७९सुलतान महमदखान दुराणी १७० १२० १४८
तळटीप:- सदर लेख व संदर्भ नाव व नंबर सह शेअर करावे
समाधी स्थळ:-
डेरा लाधिवाला, गाव साधी, जिल्हा रोहतक, हरयाणा येथे संभाव्य समाधी........

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...