विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 28 March 2024

सरदार सखाराम हरी गुप्ते

 


सरदार सखाराम हरी गुप्ते 
लेखन ::संतोष झिपरे
सरदार सखाराम हरी गुप्ते व त्यांचे बंधू बाबुराव हरी गुप्ते 15 ते 16 वर्षाचे असताना श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी जंजिऱ्यावर स्वारी केली तेंव्हा सखाराम हरी गुप्ते यांनी सिद्दी रहेमानास ठार मारून मराठ्यांना विजयश्री मिळवून दिली व तेंव्हा पासून सखाराम हरी हे पेशव्यांचे महत्वाचे सरदार बनले इ सन 1738 च्या निजामाच्या स्वारीत मराठ्यांना यश मिळाले आणि रघुनाथराव व सखाराम हरी यांच्यात मैत्री झाली व सखाराम हरी मराठी सै न्यात लोकप्रिय झाले अटकेपार झेंडे लावले तेंव्हा सखाराम हरी रघुनाथराव यांचे उजवे हात होते नाना फडणवीस यांनी सखाराम हरी यांना आपल्या पक्षात घ्यायचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी रघुनाथराव यांच्याशी गद्दारी केली नाही निष्ठा या काय स्थाच्या महत्त्वाचा गुण त्याला ते जागले कर्नाटकात हैदर अलीचा प्रतिकार करण्यासाठी रघुनाथराव व सखाराम हरी गेले असतांना रघुनाथरावना शह देण्यासाठी नाना फडणवीस यांनी त्यांच्या बरोबर गेलेल्या सरदार मंडळींच्या घरावर चौक्या बसविल्या त्यांच्या नात्यातील मुलं माणसांना कैद केले रघुनाथराव यांच्या नंतर सखाराम हरिना पेशवे दरबारात कोणी मित्र राहिला नाही नाना फडणवीस यांनी त्यांना कैदेत टाकले 1779 साली त्यांचा धनगडावरून कडेलोट केला त्यांची घरे दारे जप्त केली त्यांचे कुटुंबीय बडोद्यास स्थलांतरित झाले होते इंग्रजांच्या कारकिर्दीत गायकवाड वाड्यासमोर मोकळे पटांगण होते त्याला सखाराम हरी पटांगण म्हणत असत ती सखाराम हरींच्या मालकीची जागा होती काही तत्कालीन चांद्र सेनीय कायस्थ प्रभू लोकांनी बडोद्यास जाऊन ती जागा समाजाच्या कामासाठी मागितली त्यांच्या वारसांनी होकार दिल्यावर ती जागा सरकार दरबारातून रीतसर सोडवून ताब्यात घेतली व 1951 साली ट्रस्ट स्थापन करून त्या जागेवर सखाराम हरींचे स्मारक म्हणून सभागृह बांधले

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...