विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 28 March 2024

छत्रपती राजाराम महाराज

 

⛳⛳२४ फेब्रुवारी

छत्रपती राजाराम महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ⛳⛳
💐💐‌एका भयानक संकटात सापडलेल्या प्रत्येक दिवसागणिक सीमा आकासत चालल्या राज्याचे 19 वर्षाचा पोरसवदा छत्रपती एक 82 वर्षाच्या 22 सुभ्याचा स्वामी असलेल्या सम्राट सोबत लढा सुरू करतो स्वकीय परकीय व निसर्गाची आक्रमणे झेलत विश्वासघात सहन करत वेळ प्रसंगी आपल्या वडिलांनी घालून दिलेल्या नियम बदलत रयतेचे स्वराज्य टिकवून ठेवतो. आपल्या राज्य संपवायला आलेल्या बादशहाची राजधानी जिंकण्याच स्वप्न पाहतो व ते स्वप्न आपल्या सरदारांना सुध्दा दाखवतो व त्या साठी त्यांना प्रोत्साहित सुध्दा करतो.बादशहा विरुद्ध 10 ते 11 वर् संघर्ष चालू ठेवतो.असा मोठा लढा देऊन पण तो इतिहासत उपेक्षित राहिला .हाच महान प्रशासक म्हणजे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज .💐💐
🏹🏹राजाराम महाराजांची आयुष्यतली पहिली लढाई जुन 1689 साली प्रतागडाच्या पायथ्याशी पार गावजवळ काकर खान नावाच्या मोगल सरदाराच्या विरुद्धात लढली . काकर खानाचे बळ जास्त असल्यामुळे त्यांना तिथून माघार घ्यावी लागली.
‌आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभिक काळामध्ये राजाराम महाराजांनी प्रचंड लष्करी डावपेच क संयोजनाच नमुना दाखवत महाराष्ट्र व दक्षिणेत कर्नाटक अश्या 2 फळ्या मोगलांच्या विरुद्धात उभ्या केल्या त्यामुळे बादशहाला त्याची ताकत व लक्ष दोन्ही विचलित करून दक्षिणेत पसरावी लागली व अपोपप महाराष्ट्रावरील आक्रमणाचा जोर कमी झाला.🏹🏹
⚜️⚜️ज्या प्रमाणे शाहजीराजेनी कर्नाटक मध्ये असताना हिंदू नाईकांना आश्रय देत होते त्याप्रमाणे राजाराम महाराजांनी स्थानिक हिंदू नाईकांशी संधान साधून त्याची औरंगजेबाच्या विरुद्धात फळी निर्माण केली. दक्षिणेमध्ये जिजी हे राजधानी बनली असताना व महाराष्ट्रातील जबाबदारी मोरोपंत वर जरी असली तर सुध्दा महाराज महाराष्ट्रातील मोहिमांचे नियोजन व सरदारांना आदेश देत हे त्यांनी 13 एप्रिल 1690 रोजी चांदजीराव पाटणकर याना लिहलेल्या पत्रामध्ये दिसुन येते. याच कालखंडात कृष्णा सावंत यांनी नर्मदा नदी पार करून उतरेत स्वारी केली.
राजाराम महाराजांच्या कालखंडात मराठे प्रबळ असणारे गडकोट आपल्या ताब्यात ठेवत व त्या परिसरातील ठाणी मोगलांच्या ताब्यात असत . फोजेची टाकत ही ठाणी ताब्यात घेण्यासाठी न वापरता मोगल मुलुखात धुमाकूळ घालून पैसा उभारण्याचा काम करत असत.⚜️⚜️
🌞🌞आपल्या सरदारांचे मनोधैर्य वाढवताना मल्हारजी भांडवलकर सेनापंचसहस्त्री यास 22 सप्टेंबर 1689 साली लिहलेल्या पत्रात महाराज लिहात की
" हे स्वामींचे राज्य तुम्हा मराठे लोकांचे आहे. आवघे मिलोन कस्त करिता तेव्हा गणिमाचा काये हिसाब आहे"
यातून राष्ट्रीय ऐक्याची भावना देत हे रयतेचे राज्य आहे व ते आपण सर्वांनी एकतर येवून लढा दिला तर टिकवणे सहज शक्य आहे याची जाणीव ते करुन देतात.
तसेच बाजी सर्जेराव जेधे याना पाठीवलेल्या पत्रात लिहितात
" गनिमाचा हिसाब काय आहे ! तुम्ही लोक जेव्हा मनावरी धरिता तेव्हा गनीम तो काय? गनिमास तुम्ही लोकी केला आहे. ते तुम्हीच लोक या राज्याची पोटतिडकी धरता तेव्हा (आम्ही) अवरंगजेबाचा हिसाब धरीत नाही."
यातून ते वतनाच्या लोभामुळ जेव्हा आपलेच लोक गनिमाला जाऊन मिळतात त्यामुळे गनिमाचे ताकत वाढून तो बलवान होतो अशावेळी जर स्वराज रक्षणासाठी जर सर्वजण एक आले तर शत्रूला परास्त करन हे सहज शक्य आहे .🌞🌞
🌙🌙पुरंदरच्या बेरडानाना अभयपत्र मध्ये म्हणतात
‌"तुम्ही पुरंदरची हवी(हेरगिरी) करून गाद हस्तगत करून देणे. कोन्हेविशी शक न धरणे . स्वामी तुमचे चालवतील आपले दिलासे असो देऊन एकानिस्टने स्वामीकार्य करणे ." ज्याप्रमाणे शिवरायांनी सर्वाना एकत्र करुन स्वराज्य स्थापन केले त्यापरामाणेच सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या मध्ये रहाणाऱ्या लोकांमध्ये राष्ट्रभवना जागृत करून देत सर्व घटकांना एकत्र करून त्याना अश्वाशीत करून एक मोठा लढा उभा करत होते.🌙🌙
🔱🔱या सर्वांमध्ये महत्वाचं आणि शेजवलकरांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मुखोतगत असावं असं पत्र म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांनी हणमंतराव घोरपडे व कृष्णाजी घोरपडे याना लिहिलेलं पत्र या मध्ये शत्रूचा प्रदेश मारल्या नंतर चा सरंजाम सांगितला आहे . रायगड प्रांत,विजापूर ,भागानगर आणि औरणगाबाद घेतल्या नंतर प्रत्येकी 62,500 हणमंतराव घोरपडे याना व त्याचे पुत्र कृष्णाजीराव घोरपडे याना 12,500 चा सरंजाम. सर्वात महत्वाचं व मराठ्यांची मानसिक परिस्थिती किती बुलंद होती हे स्पष्ठ करणार म्हणजे जर दिल्ली काबीज केलींतर 2,50,00 चा सरंजाम हणमंतराव याना व त्यांच्या पुत्रांना 50,000 सरंजाम. यातून दिल्ली काबीज करण्याचं मराठ्यांचा स्वप्न दिसून येते.
छत्रपती राजाराम महाराजांनी सरंजाम पद्धतीला पुन्हा सुरवात केली पण त्यांनी सरंजाम देताना स्वराज्यमध्ये न देतात शत्रूच्या प्रदेशात दिला त्यामुळे शत्रूचा प्रदेश काबीज करण्याची जणू सरदारान मध्ये स्पर्धा सुरू झाली .यामध्ये सेनापती संताजी घोरपडे सेनापती धनाजी जाधव , हिमतबहादूर विठोजी चव्हाण, हबीराव मोहिते .अश्या अनेक मराठा सरदारांनी पराक्रमाची शर्थ केली व स्वराज्य रक्षण करत करत स्वराज्याचा विस्तार सुध्दा केला . या कठीण प्रसंगांमध्ये जेव्हा जिंजीला वेढा पडला होता तेव्हा तंजावरच्या शहाजी महाराज यांनी राजाराम महाराजांना वेळोवेळी मोलाची मदत केली . 🔱🔱
⚔️⚔️‌जिंजीहुन महाराष्ट्रा मध्ये परत आल्यानंतर औरंगजेबा विरुद्ध मोठा लढा उभाकरण्याचा मानस होता पण या शिवपुत्राच्या अकाली मृत्यमुळे मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामस खूप मोठे नुकसान झाले. पण त्यानंतर सुध्दा ताराराणी बाईसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढा देत रहिले व शेवटी अजिंक्य राहिले . He laughs best , who laughs last याप्रमाणे औरंगजेब शेवट पर्यंत विजयी हास्याची प्रतीक्षा करत राहिला पण ते काही त्याच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. ⚔️⚔️
आशा या पराक्रमी मुत्सद्दी शिवपुत्रास जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
मा. श्री. रणजीत दादा जगताप
(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष)
मा. श्री. संतोष झिपरे
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...