!!गाढवे- गाढवे देशमुख घराणे!!
भाग-१
लेखन :संतोष झिपरे
१) सरदार मलोजी ऊर्फ मालोजी गाढवे-हे यास मौजे पाडली, मौजे. बोरगाव येथे छत्रपती कडून शेते सनदी होते
२) सरदार मळोजीराव गाढवे- इनाम
३) सरदार यशवंतराव गाढवे- यास चिटणीस पत्रातून उल्लेख सापडतो.
४) सरदार पुजांजीराव गाढवे -यांचे पत्रातून उल्लेख आढळतो.
५) सरदार पदाजीराव गाढवे-हे शिरवळ येथील गाढवे घराण्यातील होते.
६) सरदार पुजांजीराव गाढवे-हे शिल्लेदार पथकातील सरदार होते. तसेच यास छत्रपती कडून इनाम होते.
७) माणकोजीराव कुसाजीराव गाढवे देशमुख. - खंडाळा येथील देशमुखी कारभार करताना दिसतात.
८) सरदार सुलतानजीराव गाढवे- हे यास लष्करी मोकासा होते
९) सरदार धुलोजीराव गाढवे -काही पत्रातून उल्लेख आढळतो पण गाव कोणत आणखी सापडले नाही
१०)सरदार नाईकजीराव गाढवे -बद्दल माहिती विविध पत्रातून उल्लेख आढळतो
११) सरदार सखोजीराव गाढवे -यास इनाम दारावर होते,यांच्या बद्दल उल्लेख शिंदे घराण्यातील कागदपत्रे तून येत. जाखणगाव येथील हे घराणे......
१२) सरदार तुकोजीराव गाढवे-पत्रातून उल्लेख आढळतो. हो १७६१ पानिपतच्या युद्धात वीरमरण आले.
१३) सरदार संताजीराव गाढवे-छत्रपती घराण्यातील खाजगी कडील इनाम मध्ये उल्लेख येत
१४) सरदार कृष्णाजी गाढवे- हे सरंजामदार व इनाम पत्रातून उल्लेख आढळतो यास बोरगावकर गाढवे म्हणून ओळखले जाते
१५) सरदार लिंगोजी राव गाढवे-यास इनाम कागदपत्रे तून उल्लेख येत तसेच शिंदे सरदार सोबत उत्तर दिग्विजय हे सरदार राणोजीराव शिंदे सोबत होते यावेळी शिंदे व गाढवे नातेसंबंधांची उल्लेख आढळते
१६) सरदार केदार जी गाढवे- यास मोकासा होते येत प्रमुखांनी पुढील गावात उल्लेख सापडतात, मौजे पिपंलवडी, मौजे देवजली-देवळली, मौजे कोढिये
१७) सरदार पदाजीराव फिरंगोजी राव गाढवे-हे छत्रपती च्या कडून लष्करी कारवाई करताना दिसतात.
बहुतांश लष्करी खर्चाच्या हिशोबात उल्लेख सापडतो.
१८) सरदार जानोजीराव गाढवे- हे छत्रपती विशेषतः लष्करी कारवाई मध्ये सहभागी दिसतात या गाढवे घराण्यातील आणखीन तीन सरदार झाले आहेत.
_______________
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
लेख व माहिती संकलित संतोष झिपरे 9049760888
_________________
१९) निंबाजीराव व जिवाजी राव गाढवे हे बोरगाव येथे शेते सनदी छत्रपती कडून मिळाले.
२०) सरदार नागोजीराव गाढवे हे मौजे करनवडी येथील गाव इनाम दिले आहे .
२१) सरलष्कर सोबत हे दोन्ही भाऊ छत्रपती च्या सेवेत होते याबद्दल उल्लेख सातारा कर छत्रपती च्या लष्करी तील सरदार होते.
२२) सरदार देवजी गाढवे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. बहुतेक यांचे काही भाऊबंद तंजावर येथे पण असावेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात जी मातब्बर मंडळी व घराणे त्यांच्यासोबत होती ती सर्व सरलष्कर शहाजीराजांच्या विश्वास तील दिमंतातील होती
२३)बहिराप्पा गाढवे-
१३८] श्रीशंकर. २७ आगष्ट १७५६.
श्रीमंत राजश्री बाबूरावजीदादा स्वामींचे सेवेसी :-
पोष्य गोविंद बखले कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम स्वामीचे कृपेकरून भादो शुध्द २ पावेतों छत्रपुरीं सुखरूप असो. यानंतर श्रीमंत राजश्री पंत स्वामीकडून पत्रें आलीं, लाखोटे दोन. ते छत्रपुरीहून मुजरत अजुरदार काशिदाची जोडी करून स्वामीकडेस लाखोटे पाठविले आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर सत्वर पाठविलें पाहिजे. बहुत जलदीनें श्रींमंतीं उत्तर आणविलें आहे. तर कृपा करून उत्तर सत्वर पाठविलें पाहिजे. पेशजी दोनदां मिळोन दोन जोडिया काशिदांच्या पाठविल्या आहेत. पत्रें तों स्वामीस पावलींच असतील. परंतु, उत्तर श्रीमंतास न आलें. अजुरदार पावले न पावले हें कांहींच कळत नाहीं. सविस्तर उठिलें पाहिजे. पुणेयाहून आपण रुपये देविले ते छत्रपुरीं येणेप्रमाणें आह्मी श्रीमंतांचे लिहिल्याप्रमाणें देऊन त्यांची पावलियाची कबजें घेऊन पाठविलीं आहेत.
७००० देणें सातप्पा चव्हाण व दादशेट दि॥ मोरशेट वीरकर, मित्ती श्रावण वदि २
२००० देणें बहिराप्पा गाढवे दि॥ वर्धप्पाशेट वीरकर श्रावण वदि २ संवत् १८१२.
-------
९०००
येणेप्रमाणें नवहजार रुपये उत्तम, पुराणे छत्रपुरी देऊन, कबजें घेऊन आपणाकडे पाठविलीं आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर पाठविलें पाहिजे. श्रीमंतास लिहावें कीं, छत्रपुरीहून कबजें नवहजारांची पाठविली ते पावलीं ह्मणून जरूर जरूर श्रीमंताचे पत्रीं लिहिलें पाहिजे. वरकड वर्तमान सर्व श्रीमंतांचे पत्रावरून विदित होईल. पत्राचें उत्तर सत्वर पाठवून अजुरदारांची विदा केली पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ कीजे. हे विनंती.
_______________
२४) माणकोजीराव कुसाजीराव गाढवे देशमुख यांचे उल्लेख छत्रपती सातारा महाराज यांच्या अभयपत्रातून येत हे खंडाळा येथील देशमुखी करताना दिसतात. क्रमंश
तळटीप- आजघडीला उत्तर हिंदुस्तानात असणाऱ्या गाढवे देशमुख घराण्यातील जो सरदार शिंदे घराण्याच्या सोबत होते हे जाखणगाव येथील आहेत . तसेच बोरगाव, मांडवे व पाडली हे जाधवराव घराण्यातील इनाम गाव आहे त पण या जाधवराव घराण्यातील मंडळीच्या सोबत गाढवे सरदार दिसतात कारण हे गाव सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्या कडे तसेच पुढे सेनापती चंद्रसेन जाधवराव, सेनापती संताजीराव जाधवराव यांचे वंश व वास्तव्य या तिन्ही गावातील जाधवराव यांचे वाडा होते व आहेत आजपण... तसेच विशेषतः सेनापती धनाजीराव जाधवराव व सेनापती संताजीराव घोरपडे यांच्या सोबत हे मडंळी होते यास पुष्टी मिळते
No comments:
Post a Comment