|| डोंगराई गड ||
शिवकाळामध्ये शिवराजांनी हा डोंगराई गड समजून, मंदिराचा प्रथम जिर्णोध्दार केला. त्यांनी कडेपूरचे लढाऊ यादव-देशमुख व परिसरातील शेकडो भक्त हाताशी धरून, तटबंधी गड बांधला . उत्तर दिशेला (औंध) देविकडे तोंड करून चिरेबंदी मोठा दरवाजा बांधला. गडाच्या पायार्या केल्या. या डोंगराई गडावरुन चारी दिशांची स्पष्ट टेहळणी केन्द्र म्हणून निवड करून , तोफखांय व्यवस्था केली.
12 वर्षे तीर्थथान करुन इ. स. 1645 साली, श्री समर्थ रामदास स्वामी चाफलाहून (उंब्रज मार्गे) प्रथम काडासूर (आताचे नांव कडेपूर) या परिसरमध्ये आले. तेव्हा त्यांनी या डोंगरीईवर काहीतरी, दैविक गोष्टींचा साक्षात्कार झाला. त्यावेळी त्यांचे वय 37 वर्षे होते. डोंगराई मंदिरावर राजगुरू समर्थ रामदास स्वामी यांनी येथे मारूतीरायंची व अन्य देवतांची स्थापना केल्याचे जाणकारकडून व इतर पुस्तकाच्या आधारे दिसून येते. यादव घराला त्यांनी अनुग्रह दिला. डोंगराइवर माघ पोर्णिमा करून, सदर मंदिराची सेवा करण्यास यादवांना सांगून ते वाईला गेले.
बहामनी राज्याचे विघटन झालेवर , इ. स. 1527 मध्ये विजापुरच्या आदिलशहाकडे देवगिरीचे यादव सरदार लढाईवर होते. आदिलशहाने पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वारी करताना हिंदूच्या शेकडो मंदिराची मोडतोड केली. भिवघाट विटा मार्गे पश्चिमेकडील डोंगराई मंदिर नष्ट करण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू झल्यावर मराठे यादव सरदार यांना पुढे पाठविले, ते सरदार कडेपूर येथे डोंगराइवर आल्यावर त्यांनी आदिलशहा डोंगरीई मंदिर नष्ट करणार आहे. याची गोपनीय माहिती काडेपूर घराण्याला दिली. गावकर्यांनी आसपासची (कडेगाव,तडसर,हिंगानगाव खुर्द,वंगी,शिवनी,चिखली,सोहोली ,विहापुर, शाळगाव ) इ. पंचक्रोशीतील सर्व गावातील माणसे बोलावली, त्या दिवशी नव्याची माघ पोर्णिमा होती. सर्वानी मिळून डोंगाराईच्या दिक्षिणेस प्रती मशीद बांधून त्यावर हिरवा कपडा झकाला. यादव सरदारांनी गनिमी काव्याने ती मशीद आदिलशहास लांबून दाखविली, त्यावेळी बादशहा म्हणाला, ‘यह तो अपनी मशीद है’, त्यामुळे, या डोंगराईवर आदिलशहाचा हल्ला झाला नाही(हा एक इतिहासकालीन दैवी चमत्कार आहे.)
येथे, शिवकालीन भुयार मार्ग आहे. दोन पाण्याची तळी आहेत. ज्योतिर्लीग, भगूबाई, श्रावणबाळ, भैरोबा, म्हसोबा, मांतगी, मारुती, गणेश, तुकाई, महादेव, धानाई, नोकलाई, नागोबा, नंदागिरी महाराज अशी चौदा मंदिरे सध्या अस्तित्वात आहेत(ती मंदिरे आपण पाहु शकता). विहंगम गुहा आहेत. चारी दिशा डोंगर पाहता तो पुर्ण गरूडाकृती दिसतो. डोक्यावर अमृत कुंभ टेवून, स्वर्गाकडे भरारी मारावी, तसे अलौकिक उड्डाण चोहोबाजूने दिसते.
सह्याद्री रांगेत गिरीकंदरात, अतिप्राचीन सुशोभित उंच उंच असे हे हेमंडपन्ती जागृत देवस्थान आहे. उंच अशी दोन भव्य मंदिरे डोळ्याला लाबुन सहज दिसतात.
- इंटरनेटवरून साभार
No comments:
Post a Comment