विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 March 2024

छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाईसाहेब

 


छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाईसाहेब यांची विशाळगडावरील समाधी
छत्रपती राजाराम महाराज यांचे २ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले. राजाराम महाराजांच्या निधनाची बातमी त्या वेळी विशाळगडावर असणाऱ्या राजकुटुंबास समजली. राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाईसाहेब यांनी त्या वेळच्या प्रथेप्रमाणे सती गेल्या.
या सती गेलेल्या अहिल्याबाई उर्फ अंबिकाबाईंचे स्मारक विशाळगडावर आहे. त्या स्मारकाचा जीर्णोद्धार बहुजन समाज उद्घारक् राजश्री शाहू छात्रपतींचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी केला आहे.
विशाळगडावरील अंबिकाबाईंच्या दिव्य स्मारकाचा जीर्णोद्धार करून राजाराम महाराजांनी या ठिकाणी एका घडिव दगडी शिळेवर संगरवरामधील पादुका बसवून त्यावर छोटेखानी दगडी घुमटीची निर्मिति केली.
आज या स्मृती स्मारकाची विशाळगडावरील स्मृती स्मारकांप्रमाणे पडझड होत चालली आहे.
पोस्ट साभार - रवि शिवाजी मोरे @_s_a_r_d_a_r_4_7
पोस्ट - @sarsenapati_santaji_ghorpade

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...