शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज गादीवर असताना दिल्लीचा मोगल बादशहा औरंगजेबाने प्रचंड सेनासागरासह ( सुमारे पाच लाखापेक्षा अधिक सेना ) स्वराज्यावर आक्रमण केले .
संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी कडवी झुंज देऊन रोखले परंतु मोंगलांकडून कैद झाल्याने त्यांचा दुर्देवी अंत झाला .
शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी सेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या ताराराणी यांचे हाती स्वराज्याची रक्षणाची धुरा आली .
छत्रपती राजाराम महाराजांचा इ. स. १७०० साली सिंहगडावर अकाली मृत्यू झाल्यानंतरही स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराराणी यांनी न डगमगता औरंगजेबाशी दीर्घ काळ निकराचा लढा दिला . मराठ्यांचा हा स्वातंत्र्य लढा इतिहासात प्रसिध्द आहे .
औरंगजेबाला आपल्या हयातीत स्वराज्याचा बीमोड करता आला नाही अखेर इ. स. १७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाला व मोगलशाही खिळखिळी झाली . याचा फायदा घेत ताराराणींनी तापी व नर्मदा पार धडक देत मोंगलांना शह दिला आणि मराठा साम्राज्यविस्ताराचा पाया रचला !
मराठ्यांच्या साम्राज्य विस्तार धोरणानुसार सरसेनापती खंडेराव दाभाडेंनी नर्मदानदी ओलांडून गुजरातमधून मोगलांना हटविले व आपले वर्चस्व प्रस्थापित केले .
गायकवाडांनी गुजरातमधे आपला अंमल बसविला व मराठा राज्याची निर्मिती करून करून बडोदा हे राजधानीचे शहर बनविले .
शिंदेंनी तर माळवा , मध्यभारत व दिल्लीच्या आसपासचा प्रदेश हस्तगत केला .
शिंदे ...गायकवाड ... होळकर ... पवार हे मराठेशाहीतील बलाढ्य सरदार होते . याकाळात मराठ्यांनी दिल्लीच्या पुढे पंजाब व लाहोर पर्यंत आपले झेंडे फडकवले . राजस्थानातील रजपूत राजे , दिल्ली जवळील जाट व पंजाबातील शिखांना नमोहरम केले .
मराठ्यांनी संपूर्ण भारतात आपला दरारा निर्माण केला . इतकेच नव्हे तर मराठे इतके शक्तीशाली बनले की खुद्द दिल्लीच्या बादशाहीची म्हणजेच परकीय व देशांतर्गत आक्रमकांपासून भारताचे रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर आली .
शिंदे घराण्यात राणोजी शिंदे ... जयप्पा शिंदे ... दत्ताजी शिंदे ... जनकोजी शिंदे ... महादजी शिंदे असे एकापेक्षा एक पराक्रमी वीर होऊन गेले . शिंदे घराण्यातील या पराक्रमी वीरांनी आपल्या तळपत्या समशेरीच्या जोरावर मराठ्यांचा जरीपटका मोठया दिमाखात डौलत ठेवला .
अफगाणिस्तानच्या अहमदशहा अब्दालीने इ. स. १७५९ मधे पंजाब मार्गे भारतावर आक्रमण केले . त्याला भारतातील रोहिला नजीबखान , अयोध्देचा नवाब शुजा सामिल झाले . अब्दाली आपल्या प्रचंड फौजेसह दिल्लीच्या रोखाने निघाला .
यावेळेस दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी शिंदे घराण्यातील शूर वीर दत्ताजी शिंदेंकडे होती .
दत्ताजी शिंदे म्हणजे ... एक लखलखता अंगार ... अंगात उफाळणारे शौर्य ... अत्यंत धाडसी व आक्रमक ... लढवय्या ... युध्दकलेत निपुण व कल्पक सेनानी .
अब्दाली जेव्हा दिल्लीवर चालून आला तेव्हा उत्तरेत फक्त दत्ताजींच्या सेनापतीत्वाखाली शिंदेंची फौज होती . अब्दाली , नजीब , शुजा यांच्या एकत्रित फौजेच्या मानाने ती खूपच अपुरी होती .
कठीण प्रसंग ओळखून दत्ताजींनी पेशवे व होळकरांकडे मदतीसाठी निरोप पाठवले . अब्दाली दिल्ली जवळ येई पर्यंत राजस्थानातून मल्हारराव होळकर सैन्यासह नक्कीच आपल्या मदतीला पोचतील अशी आशा दत्ताजींना वाटत होती .
१७६० सालच्या जानेवारी महिन्यात अब्दालीचे सैन्य दिल्ली नजिक पोचले परंतु तोपर्यंत निरोप मिळूनही होळकर सेना किंवा इतर कुमक दत्ताजींच्या मदतीला पोचू शकली नाही .
आपल्या मातृभूमी पासून शेकडो मैल दूरवर .... अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत .... मोठ्या संकटात .... एकाकी असतानाही शूर वीर दत्ताजी शिंदे किंचितही डगमगले नाहीत ... माघार न घेता शत्रूशी लढण्याचा धाडसी निर्णय दत्ताजींनी घेतला !
दिल्ली जवळील बुरांडी घाट येथील यमुना नदीचे पात्र ओलांडून दिल्लीवर हल्ला करण्याची योजना अहमदशहा अब्दालीने आखली .
१० जानेवारी १७६० रोजी दत्ताजींनी आपल्या प्राणांची पर्वा न करता .... अब्दालीच्या सैन्याला यमुनेच्या पात्रात रोखले .
घनघोर रणसंग्राम झाला .... शत्रूशी लढता लढता शूर वीर दत्ताजी शिंदेंना वीरमरण आले आणि ....
#बचेंगे_तो ... #और_भी_लढेंगे .... !
हे दत्ताजी शिंदेंचे वाक्य इतिहासात अजरामर झाले !
दिल्ली अब्दालीच्या हाती लागली . अब्दालीने दिल्लीची राखरांगोळी केली .
दिल्लीचा पाडाव झाल्याची व दत्ताजींच्या मृत्यूची बातमी मराठ्यांना समजली .
अब्दाली व नजीबचे पारिपत्य करून पराभवाचा बदला घेण्यासाठी महाराष्ट्रातून सदाशिवराव भाऊ व विश्वासराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेनेने उत्तरेकडे कुच केले .
अहमदशहा अब्दाली व नजीबखानचा पाठलाग करत मराठा सैन्य दिल्लीच्या पुढे पानिपत पर्यंत पोहोचले आणि ....
१४ जानेवारी १७६१ या दिवशी हिंदुस्थानवरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं ... !
उभ्या भारतातून रजपूत ... जाट ... शिख यापैकी एकही स्वकीय मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहिला नाही .
मराठे एकटेच गिलचे व रोहिल्यां विरुध्द एकाकी झुंजले . अभिमन्यूप्रमाणे झुंजत ... झुंजत ... त्यांनी देह ठेवला !
मराठ्यांनी रणांगणात पाय रोवून युध्द केलं ... रक्त मांसाचा चिखल झाला .... मराठ्यांची एक आख्खी पिढी मारली गेली ... !
पेशवेंच्या घरासह भोसले , शिंदे , जाधव , पवार , दाभाडे , गायकवाड , निंबाळकर , जगताप , मोहिते , कदम , घोरपडे , घाटगे , माने , शितोळे , काकडे , पायगुडे यासारख्या महाराष्ट्रातील शूर वीरांच्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर शहीद झाला !
दो पानीदार मोती गये ... दस — बीस अश्राफात गये ... रुपयोंकी तो गिनती ही नही । ...
पण पानिपतावर झालेला पराभव मराठ्यांनी महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली धुऊन काढला . कारण .... त्यानंतर कित्येक वर्ष लाल किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा डौलाने फडकत होता हा खरा इतिहास आहे !
मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे तर सगळी दिल्लीच पुन्हा आपल्या ताब्यात घेतली . नंतर कितीतरी वर्षे महादजींनी दिल्लीत राहून दिल्लीचा कारभार पाहिला . हा खरा इतिहास आहे !
महादजी शिंद्यांनी एकेका रजपूताला सुटा करुन करुन पिदवला व अजमेरच्या स्वारीत राठोडांनी कपटनीतीने मारेकरी घालून जयप्पा शिंदेंना मारल्याचा बदला घेतला हा खरा इतिहास आहे !
गढ में गढ चित्तोड गढ बाकी सब गढीयाॅं । ... म्हणून लौकीक मिळवलेला किल्ला जवळपास ८ महीने लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर सम्राट अकबराला मिळाला होता . महादजींनी बोल .. बोल .. म्हणता तो फक्त १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे !
नजिबाचा नातू गुलाम कादीर याने दिल्लीच्या शहा आलम बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून महादजींनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ तीन दिवस बिना मुंडक्याचा उलटा टांगून ठेवला होता . हा खरा इतिहास आहे !
पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर महादजींनी सुरुंग लावून उडवून दिली . हर हर महादेव च्या गर्जनेत तिच्या ठिकऱ्या ... ठिकऱ्या ...उडवल्या हा खरा इतिहास आहे..
पानिपतावर मराठ्यांच्या फौजांचा पराभव झाला खरा ... पण आज अडीचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ पराभव म्हणून न बघता गुरुदक्षिणा म्हणून बघा . .. !
मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली गुरुदक्षिणा ... !
राष्ट्रावर आलेल संकट आपल्या छातीवर घ्यायची शिकवण त्या युगपुरूषाने मराठ्यांना दिली होती ... !
त्या शिकवणुकीची गुरुदक्षिणा म्हणजे ...
पानिपत....!
No comments:
Post a Comment