लेखन :संतोष झिपरे
तळटीप- सरदार महादजी बाबा पाटील यांच्या समाधी ज्या वानवडी येथे आहे त्या गावातील शिरोळशेठ काढताना जो वादविवाद झाले आहे तो सादर पत्रातून दिले आहे सदर वाद महादजी बाबा पुत्र सरदार दौलतराव शिंदे यांच्या एका पुत्र वानवडी येथे निधन झाले असावेत व यावेळी दौलतराव शिंदे वानवडी मुक्काम असावेत असे दिसते कारण दौलतराव शिंदे यांनी मुलांचे सुतक आहे म्हणून लाडोजीराव शितोळे देशमुख जो महादेव शिंदे यांचे जावई होते तो यावेळी वानवडी मुक्काम होते असे वरील नोंदीत दिसते पण यावेळी वादविवाद झाले म्हणून चौगुले, जाभुळकर व जगताप वाद सरकारीत गेले आहे हे दिसून येते
---------------------
१३८५ च्या सुमारास महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी बहामनी राजवट होती व महमूदशहा बहामनीचे महाराष्ट्रावर राज्य होते.
त्याच्या राज्यात शिराळशेट (किंवा श्रीयाळ श्रेष्ठी) नावाचा एक सत्प्रवृत्तीचा लिंगायत वाणी होता. या दुष्काळात शिराळशेठने अनेकांचे प्राण वाचवले. आपली सर्व संपत्ती विकून लमाणांच्या करवी बैलांच्या पाठीवरून गुजरातेतून धान्य आणून दुष्काळपीडित लोकांना मोफत दिले.
या राजाचे कौतुक एवढय़ासाठी की, शिराळशेठने केलेले प्रयत्न पाहून समाधान व्यक्त केले व त्याला राजदरबारी पाचारण करून धन्यवाद देऊन इच्छा असेल ते मागून घेण्यास सांगितले. शिराळशेठ मोठा चतुर असला पाहिजे. त्याने साडेतीन घटकांचे राज्यपद मागून घेतले व महमूदशहा बादशहाने त्याला ते आनंदाने दिले. कराराप्रमाणे राजाने आपली राज्यमोहोर त्याच्या स्वाधीन केली. या लक्ष्मीसंपन्न माणसाने स्वत:करता एक ढबू पैसाही घेतला नाही व आलेल्या अमोल संधीचा उपयोग इतरांसाठी केला. देवाधर्मासाठी केला व म्हणून तो अजरामर झाला.
जप्त केलेली हिंदू मंदिरे व खालसा केलेले त्यांचे उत्पन्न शिराळशेठने राज्यमोहोर लावून सरकारी आज्ञेने परत केली. जप्त झालेली अनेक इनामे व जमिनी परत केल्या व दानधर्म केला. त्याच्या या कृतीने बादशहा अधिकच खूश झाला व शिराळशेठच्या इच्छेप्रमाणे अंमलबजावणी करण्यास त्याने फर्मावले. या ठिकाणी पुन्हा बादशहाचे औदार्य दिसून येते. इतकेच नव्हे तर त्याने शिराळशेठच्या मुलाला बोलावून त्याला सरदारकी बहाल केली.
श्रावण शुद्ध षष्ठीला शिराळशेठच्या प्रतिमांचे पूजन होते. आदल्या दिवशी तेथील कुंभाराकडे पाट दिला जाई व त्या पाटावर कुंभार शिराळशेठची बैलावर बसलेली प्रतिमा,शिराळशेठपुढे त्याचा श्वान व घरातील मंडळी असा देखावा केलेला असतो. या सर्वाची करडीच्या बिया, पताका आदी गोष्टींनी आरास केलेली असते. असा सजवलेला पाट आणून शिराळशेठची पूजा होते व संध्याकाळी त्याचे विसर्जन केले जाते.
शिराळशेठने साडेतीन घटकांचे राज्यपद मागून आपली अनेक मंदिरे बहामनी राजांच्या जप्तीतून मुक्त केली
सामान्य लोकांच्या मनातला हा साडेतीन घटकांचा राजा व त्याच्याबद्दलची कृतज्ञता हे त्या पुतळ्याचे प्रतीक होते. त्याला मिळालेल्या साडेतीन घटकांत त्याने रयतेच्या कल्याणाचे निर्णय घेतले शिराळशेठ आपल्यातून जाऊ देता कामा नये अशी इच्छा लोकाच्या मनात निर्माण झाले म्हणून
शिराळशेटने त्याला मिळालेल्या अवघ्या साडेतीन घटिकांमधून दाखवून दिले. त्या तेवढया वेळेत त्याने तातडीने जास्तीत जास्त देवस्थानांना वर्षासनें नेमून दिली. अनेक धार्मिक स्थळांना शक्य तेवढया सोयी-सुविधांसाठी मुबलक निधी उपलब्ध करुन दिला, देणग्या दिल्या. दानधर्म केला. जे एखाद्या राजाला दहा-बारा वर्षांमध्ये जमणार नाही एवढी धर्मकृत्यें त्याने केली.
त्याच्या ह्या औदार्याचे आणि धर्मशीलतेचे स्मरण म्हणून महाराष्ट्रात शिराळशेट काढले जाते.
-----------------------
रोज मजकुरीं शिराळशेटीचा दिवस. उभयतां देशमुखास दौलतरावबावाच्या मुलाचें सुतक होतें. परंतु शिराळशेटी घालून नदीस पोंचविले. विशेष समारंभ केला नाहीं. वाजंत्री लावून नदीस नेऊन
टाकिले असेत. १
रोजमजकुरीं मौजे वानवडी ता। हवेली पाटील, चौगुले यांच्या शिराळशेटीची कटकट जाली. कुसाजी जांबूळकर याचा वडील पुतण्या चौगुलकी करितो. शिराळशेटी घालीत आले आहेत. त्याजला संभाजी माळी जांबुळकर व सुभानजी हे कटकटीस आरंभले आहेत. द्वाही देणार ह्मणून अबाजीपंत कुलकर्णी याणीं सुभानजीस सांगितल्या च्यार गोष्टी विचाराच्या. तेव्हां त्यानीं कबूल केलें कीं, तूर्त आह्मीं कजिया करीत नाही, परंतु पुढें आमचें त्याचें मनास आणा. ऐसें कबूल केले. मागती मंदवारीं बदलला कीं, आह्मीं आडवें येऊं. त्याजवरून कुसाजीचा भाऊ येथें आला. त्याजपाशीं जमीदारीचे कागद पांढरीस मोकदमाच्या नांवें दिल्हे कीं, याचा शिराळशेटी चालत आला आहे, तैसा चालों देणे. ज्यास भांडणें असेल त्याणें येथें यावें, मनास आणिलें जाईल. ते कागद दाखविले. आपण अवघे घरास गेले. शिराळशेटी नवा ह्मणून सांगितलें. संभानें पोर आपला पाठविला. तो जाऊन वेशीपाशीं शिराळशेटी काठीने पाडिला. रामोजी जगथाप याणें शिदोजीचा शिराळशेटी उजवीकडे असतो तो आपल्या हाते आपल्या डावीकडे केला. चौगुलियाचा पडिला. पाटिलाचेंहि उजवे डावें जालें. याजमुळें तेथेंच शिराळशेटी ठेविले. येथें माळी बोभाट घेऊन उभयतां आले. संभाजी ह्मणों लागला की, आह्मीं कजिया करणार होतों. तुमचा कागद आला. मग आह्मीं घरास गेलों. पोरास कागदाचा विचार ठावका नव्हता. त्याणें शिराळशेटी पाडिला. पोरासोरी जाली. म्या आपल्या पोरास काठी मारिली कीं, तू कां आडवा जालास ? कुसाजीस सांगितले कीं, तुह्मी आपला शिराळशेटी न्या. परंतु हे नेईनात. वेशींतच ठेविला. ऐसें त्याणें सांगितले. कुसाजीच्यांनी सांगितलें कीं, याणीं पाडिला, मग आह्मीं उगेंच काशियास न्यावा ऐसें सांगितलें. ऐशियास, संभाजी माळी जिवाजीपंताचा सरिक, त्याजपावेतों हा लांबवील, याजकरितां बाळकृष्णपंतास माळियाचें वर्तमान सांगितले. त्याणीं प्यादा बा। दिल्हा कीं, शिराळशेटी नदींत टाका आणि हुजूर या. ऐसें दुसरे रोजी जालें असे१
________________
शिराळशेटचा मान कशासाठी व का दिला जातो हे आपण समजून घेऊ - एखादा गावातील पाटील, देशमुख, चौगुर्लीका घराण्यातील भाऊबंदकी मध्ये मानपान वरून वाद अथवा गावच्या पांढरीत देशमुख, पाटील, चौगुले, सह इतर यांच्यात गावातील मानपानवरून वाद असतील तर यावेळी मानपान, पासोडी, वाटून दिले जात असे तसेच सरंजामदार, वतनदार, जागीरदार यांच्यात भाऊबंदकीत वाद असतील तर थोरल्या भावाकडे वंशपरंपरागत मान देऊन धाकटा भावाकडे शिराळशेटचा मान देऊन सन्मान ठेवले जात असे यामुळे गावच्या पांढरी तसेच गावच्या पाटील अथवा चौगुले ती करणाऱ्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याची सरकारीतून दक्षता घेतली जात असे विशेषता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा मान विभागून देण्याचं सुरुवात झाली असे दिसून येते असे अनेक महजरातून आढळून आले आहे
आपले
9048760888
No comments:
Post a Comment