विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 10 April 2024

म-हाठा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट कांही सामान्य नाही”

 


म-हाठा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट कांही सामान्य नाही
लेखन आणि संकलन – मुकेश मारुती वडीयार
कतृत्ववान सरदार, शिलेदार, सुभेदार घराण्यांच्या जोरावरच महाराजांनी सुलतान शाह्या आणि मोघलांशी झुंज दिली. याच्याच परीणामी शिवाजी महाराज ‘क्षत्रियकुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज’ झाले. महाराजांनी स्वराज्याची पहिले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. स्वराज्याच्या निर्मीतीत अनेक घराण्यांनी खस्ता खाल्या त्या असंख्य मावळ्यांचे प्रतिनिधीत्व हे अष्ट प्रधान मंडळ करत होते. पुढे जेव्हा रायगड पडला आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दास सुरुवात तेव्हाही अनेक सरदार घराण्यांनी राजारामास सहाय्य केले. आदिलशाहीत घोरपडे घराणे कसे उत्कर्षास आले ते आपण मागे पाहिले आहे. परंतू मोघल-मराठे युध्दाच्यावेळी सुध्दा संताजी घोरपडे नावारुपास आले आणि त्यांस सेनापतीपद मिळाले. औरंगजेब बादशहावर छापा घालून त्याच्या तंबुचे सोन्याचे कळस कापून आणना-या संताजी घोरपडे यांस सेनापतीपद दिल्याचा उल्लेख खालील पत्रात आढळून येतो-(11)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...