विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 10 April 2024

महाराष्ट्रातील प्रसिध्द सरदार घराणी’

 




महाराष्ट्रातील प्रसिध्द सरदार घराणी’
लेखन आणि संकलन – मुकेश मारुती वडीयार
शिवकाळपुर्वी अनेक सरादार घराणी आपल्या युध्द नैपुण्याचा आणि शौर्याचा वापर हा यवनी सत्तेच्या रक्षणासाठीच करत असल्याने त्यास स्वराज्याची चाड लागणे अजून बाकी होते. ‘महाराष्ट्रातील प्रसिध्द सरदार घराणी’ या आपल्या पुस्तकात प्रा. म. रा. कुलकर्णी नमूद करतात, “अनेक कर्तृत्ववान मराठी घराणीआ आपला पराक्रम सुलतानाच्या चरणी वाहून आपली राजनिष्ठा व्यक्त करण्यात आपणास धन्य मानीत होती. आपण फार तर मोठा सरदार होण्याची महत्त्वकांशा ठेवायची, पण बादशाही मात्र त्यांनीच उपभोगायची. यवनी सत्ता चंद्र-सूर्य असेपर्यंअत टिकणारी आहे. आपले सर्वप्रकारचे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य फक्त दिल्लीश्वर किंवा जगदीश्वर यांचे हाती आहे अशी सर्वत्र पराभूत मनोवृती निर्माण झालेली असता सा-यांना खडबडून जागे करण्याचे काम शिवरायांनी केले. बादशहानी मेहेरबानीने दिलेल्या वतने, जहांगि-या, ईनामे, मनसबदा-या स्वीकाराण्यात भूषण न मानता, स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर महाराष्ट्राची वीतभर जमीन स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करा त्यात तुम्हाला तात्म मिळाले तरी स्वतःला धन्य माना असा, महामंत्र शिवरायांनी सा-या महाराष्ट्राला दिला.”
जयास वाटे जीवाचे भये । तेणे क्षात्रधर्म करु नये ।
काहितरीआ करोनि उपाये । पोट भरावे ॥
मारिता मारिता मरावे । तेणे गतीस पावावे ।
फिरोनि येता भोगावे । महद्भाग्य ॥
देवमात्र ऊच्छेदिला आपुला । स्वधर्म बुडविला ।
जित्यापरीस मृत्यू भला । ऐसे समजावे ॥
मराठा तितुका मेळवावा । आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।
ये विषयी न करिता तकवा । पूर्वज हासती ॥
(समर्थ रामदास)(9)
सुलतानाच्यावर छत्र धरण्याचा मान कित्येक मराठा घराण्यांना लाभला. परंतू जेव्हा भोसले घरण्यातील शहाजी भोसले म्हणजेच थोरले महाराज यांना संधी मिळाली आणि त्यांनी निजामशाहीचे तख्त राखले. छोट्या निजामशहास आपल्या मांडीवर घेवून बसल्यावर जेव्हा इतर सरदारांना कुरनिसात करताना कमीपणाचे वाटू लागले, तेव्हाच शराजीराजे भोसले स्वतःच्या स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न बाळगले. भोसल्यांच्या कित्येक पिढ्यांनी निजामशाहीत आपले कतृत्व गाजवले, परंतू मोगल आणि आदिलशहाच्या ऐक्यामुळे स्वराज्याचे स्वप्न सत्यात आले नाही. परंतू शहाजीराजे भोसले यांनी पेटवलेली स्वराज्याची मशाल वनवा बनण्यास तयार होती. स्वराज्याचे बाळकडू भोसले घराण्यात शहाजीराजांकडून शिवाजीराजांना मिळाले आणि ते पुढील अनेक पिढ्या वारसा बनून गेल. ‘मराठा तितुका मेळवावा, आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा’ सारखे अनेक उपदेश संतांनी महाराष्ट्राच्या मातीला दिले. त्यामातीतूनच स्वराज्यासाठी नविन घराण्यांचा उदय होत गेला. आमात्य, मालुसरे, मोहिते, फर्जद, जेधे, प्रभू, आंग्रे,पालकर, नरसाला, पिंगले असे अनेक घराण्यांनी शिवकालात स्वराज्याच्या बांधणीत योगदान दिले. बखरकार कृष्णाजी अनंत सभासद यांनी आपल्या बखरीत ‘शिवजी महाराजांच्या राज्याची मोजदाद केली तेव्हाची स्वराज्याच्या सरदारांची यादी दिली आहे ती या प्रमाणे (10)-

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...