post by
छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्वर वरील वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले..
महाराजांनी जेव्हा स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली तेव्हा हजारो मावळे शिवरायांच्या नेतृत्वा खाली सज्ज झाले. त्यातील कोणाच्याही मनात ना जहागिरीची लालसा होती ना इनामांचा लोभ होता तो फक्त नेतृत्वावर ठाम विश्वास..! आपले महाराज जे काही करताहेत ते आपल्या भल्या साठीच आहे या एकाच भावनेने मावळ्यांनी महाराजांच्या चरणी आपल्या निष्ठा अर्पण केल्या होत्या. महाराजांच्या कोणत्याही निर्णयावर कोणत्याही मावळ्याने शंका घेतली नाही. शिवराय महाराजांचे सैन्यबळ मोजकेच होते मात्र त्यातील हर एक सैनिकाची निष्ठा राजगडाच्या अभेद्य बुरुजांसम अढळ होती. महाराजांविरुद्ध लढणारेही बहुतांश स्वकीयच होते मात्र मोजक्या निष्ठावंतांच्या जोरावरच शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले..
स्वराज्य शपथ घेणाऱ्या शिवरायांनी पुढच्या काही काळात १ हजार सैन्य उभे केले होते. समोर असलेल्या परिस्थितिमधून मार्ग काढताना, नविन राज्यपद्धती रुद्ध करताना त्यानी एक नविन युद्धतंत्र प्रवर्तित केले. गरज वाढली तसे सैन्येचे संख्याबळ आणि त्यांना लागणाऱ्या साधनसामुग्री उभी केली. लढण्याचा ध्येयवाद त्यांच्यामध्ये निर्माण केला..
● इतिहासकार सेतु माधवराव पगडी म्हणतात :
"The Marathas fought for saving their homelands. It was cause worth Fighting & Dying for. They were led by a Man of No ordinary Skills & Calibre.."
स्वराज्याच्या पहिल्या तपात माणसे जोडणे, त्यांच्यात ध्येय निर्माण करून लष्करी आणि मुलकी व्यवस्था लावणे हे काम शिवरायांनी तडीस लावले. आवशक्यता असेल तेंव्हा स्वतः मोहिमेचे नेतृत्व करून सैन्यात उमेद आणि उत्साह निर्माण केला. लाखभर फौजा उभ्या करून सुद्धा त्यांनी कुठल्याही लढाईमध्ये निम्यापेक्षा अधिक सैन्य कधीच गुंतवले नाही. कौटिल्यच्या अर्थशास्त्रानुसार राजाने आपले सैन्याचा चौथा भाग युद्धात गुंतवू नये असा नियम लिहिला आहे. शिवरायांनी हेच धोरण अंगीकारले आहे असे दिसते..
आपण ज्यांच्या स्वतंत्र व उज्ज्वल भविष्यासाठी लढत आहोत तेच आपल्याविरुद्ध शस्त्रे घेऊन उभे आहेत म्हणून महाराज कधी डगमगले नाहीत. “...मानसिक धैर्य काय असते हे शिवरायांकडून शिकावे व स्वामीनिष्ठा काय असते हे महाराजांच्या मावळ्यांकडून शिकावे....”
हर हर महादेव
No comments:
Post a Comment