विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 10 April 2024

मराठा साम्राज्यातील निष्ठावंत घराणी

 


मराठा साम्राज्यातील निष्ठावंत घराणी
लेखन आणि संकलन – मुकेश मारुती वडीयार
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिवृत्त शके 1837 नुसार, औरंगाबाद येथील भगवंतराव यादव मुनशी नांवाच्या कवीने चौपन्न श्लोकांचे एक लहानसें स्तुतिपर काव्य रचून ते श्रीमंत नानासाहेब पेशवे यांस अर्पण केले होते.(3) त्यांत बाळाजी विश्वनाथापासून नानासाहेबांपर्यंत झालेल्या ऐतिहासिक पुरुषांचे काव्यमय वर्णन आले आहे. तसेच आपल्या कुलधर्माचे पालन करत स्वराज्याच्या सेवेत कर्तृत्व गाजवणा-या काही घराण्याचा उल्लेख केलेला आहे. कवि मराठा साम्राज्यातील निष्ठावंत घराणी याबद्दल उल्लेख करताना लिहतो-
ज्याच्या दुंदुभिचा ध्वनी करितसे दिग्व्याळ बाधिर्यता ।
शौर्ये वीर्ये पराक्रमे निज यशें शोभे ध्वजा उन्नता ॥
गायकवाड पवार जाधव भले ब्रीदें जया साजती ।
सेनाधीप असंख्य थोर कुळिचे वर्णू तयातें किती ॥
ढमढेरे कवडे हि भापकर ते समरंगणीचे गडे ।
शस्त्राचे रगडे करुनि दभिती शत्रुदळा रोकडे ॥
शिंदे होळकरादि सैनिक बळी वीरश्रिये शोभले ।
अश्वी धारकरी अनेक चढती भारी शतायाकळे ॥(3)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...