‘घोरपडे’ घराणे
लेखन आणि संकलन – मुकेश मारुती वडीयार
शिवपूर्व
कालखंड हा आत्मविस्मृति आणि पारतंत्र्याचा कालखंड म्हणून इतिहासात ओळखला
जातो. यवनी राजसत्तेचा अमंल हिंदुस्थानावर होता. दिल्ली, मालवा, गुजरात,
बंगाल, बहामनी इत्यादी अनेक हिंदुस्थानच्या प्रदेशावर सुलतानशाही तख्त
नशीन होत्या. ‘तख्ता या ताबूत’ चा सुलतानशीत बोलबाला असल्याने सामान्य
जनता यामध्ये भरडली जात होती. अनेक कर्तुत्वान मराठा घराणी आपल्या
पराक्रमाचा उपयोग ह्या शह्यांच्या सत्तेच्या सरंक्षणासाठी करीत होत्या.
मुळातच सुलतांनाच्याकडे मराठे हे एकटे आपली सेवा देत नसत, शिया-सुन्नी
मुसलमाना बरोबरच पठाण, अफगाण सारख्या मुस्लिम जमातीसुध्दा होत्या.
मुसलीमांतील शिया-सुन्नी त्याचबरोबर इतर जमातीमधील वादात मराठा घराण्याचा
वापर करुन प्रबल होवू पाहणा-या सुलतांनामुळे अनेक मराठ्यांना उत्कर्षाची
संधी मिळाली. या परिस्थितीचा योग्य वापर करत, कतृत्वाच्या जोरावर अनेक
मराठा घराणी उदयास आली. सतराव्या शतकाच्या आरंभी भोसले घराणे दक्षिण
हिंदुस्थानात उदयास येण्यापुर्वी घाटगे, शिर्के, फलटणचे निंबाळकर, मलवडीकर,
मोरे, महाडीक वगैरे मराठा घराणी प्रसिध्दीच्या आणि समृध्दीच्या मार्गावर
होती.(4) यातील एक महत्वाचे कर्तबगार मराठा घराणे म्हणजेच ‘घोरपडे’ घराणे
होय.
रियासतकार
गोविंद सखाराम सरदेसाई घोरपडे घराण्याबद्दल लिहतात, “मराठ्यांचे दुसरें
मोठे कुटुंब घोरपड्यांचे होय. त्यांचे मूळचें उपनांव भोसले. बहामनी
राज्यांत त्यांनी कोंकणांतील एक किल्ला घोरपडीच्या साह्यानें वर चढून सर
केला, तेव्हांपासून त्यांस हें नांव प्राप्त झालें. विजापुरचे राज्यांत
त्यांस देशमुखी होती. कापशीकर (वारणेच्या काठी), सोडूरकर, मुधोळकर, दतवाड व
गुत्तीकर अशी घोरपड्यांची अनेंक घराणी इतिहासांत प्रसिध्द आहेत.
घोरपड्यांचे घराणे पुष्कळ जुनें असून त्यांस ‘हिंदुराव’ हा किताब बहामनी
राज्यांतून व ‘अमीर-उल-उमराव’ हा किताब कापशीकरांस आदिलशाहींतून मिळाला
होता.”(5) या घोरपडे घराण्याच्या इतिहास आणि कर्तबगारीवर तत्कालीन काही
पत्रव्यवहारातून भाष्य करता येते. त्यातील पहिले पत्र आहे, जे पहिला
आदिलशहाने सन 1564-65 ला लिहले आहे. या पत्रात चोलराज घोरपडे यांचे बद्दल
नमूद करताना आदिलशहा म्हणतो, ‘(आपली) ही चाकरी व आत्मयज्ञ ध्यानांत आणून
कुलाच्या शाश्वततेसाठी’ रायबाग व हुकेरी येथील 84 गावे व वाई परगण्यातील 40
आणि एक किल्ला असे इमान चालु ठेवावे. हे पुर्ण पत्र या प्रमाणे- (6)
तसेच
आणखिन एका पत्रात चोलराज घोरपडे यांचा मुलगा पिलाजी घोरपडे यांच्या
मृत्यू नंतर त्यांचा मुलगा प्रतापसिंग घोरपडे यांस सात हजारी मनसब व जागीर
देताना दुसरा इब्राहिम आदिलशहा यांने लिहलेले पत्र आहे. हे पुर्ण पत्र या
प्रमाणे- (7)
No comments:
Post a Comment