विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 April 2024

२ एप्रिल १६७९ भूपाळगडाची लढाई.

 


२ एप्रिल १६७९ भूपाळगडाची लढाई...🚩
छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्वेकडील प्रदेशांवर वचक ठेवण्यासाठी तसेच भांडारगृह म्हणून हे ठाणे निवडले आणि तेथे किल्ला बांधला व त्याचे नाव भूपाळगड असे ठेवले..
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांत वितुष्ट आले तेव्हा संभाजी मोगलांचा सुभेदार दिलेरखानाला मिळाले, दिलेरखानाने संभाजीराजेंच्या फितुरीचा फायदा घेऊन मराठा मुलूख पादाक्रांत करण्यास सुरूवात केली. त्या मोहिमेत त्यांनी भूपाळगडाकडे कूच केली. मोगलांची फौज येत आहे असे समजताच गावोगावची माणसे आश्रयासाठी किल्ल्यात आली..
● या लढाई विषयीच्या वृत्तांत सभासद बखर, अनुपुराण, जेधे शकावली, सुरतेच्या वखारीचे दफ्तर, परमानंद काव्य इ. विविध साधनसामग्रीतून मिळतो तथापि त्यात एकवाक्यता नाही :
दिलेरखानाने २ एप्रिल १६७९ रोजी सकाळी किल्ल्यावर हल्ला केला. दोघात मोठी लढाई झाली. मोगलांच्या प्रचंड सैन्यापुढे मराठ्यांचे सैन्य अल्प असूनही त्यांनी शिकस्तीने लढा दिला. शिवाजी महाराजांनी १६,००० घोडेस्वारांची कुमक मदतीसाठी पाठविली परंतु ती पोहोचण्यापूर्वीच किल्ला पडला. तरी सुद्धा मराठा सैन्याने निकराने लढा दिला. किल्ल्यातील धान्य, दारूगोळा व इतर संपत्ती घेऊन दिलेरखानाने ७०० मराठा शिपायांचा उजवा हात तोडला व त्यांना सोडून दिले. इतरांना कैद केले. त्यानंतर शिवाजींराजेंनी पाठविलेल्या सैन्याने किल्ल्याला चारी बाजूंनी वेढले. तेव्हा त्यांना कळले की इराजखान व बाजाजीराव (निंबाळकर) किल्ले परांड्याकडून दिलेरखानाच्या फौजेस सामान-संरजामाची मदत करीत आहेत तेव्हा मराठे त्यांच्यावर चालून गेले. यावेळी दिलेरखानाने इख्लारसखानाला १५०० स्वार देऊन इराजखानाच्या मदतीसाठी पाठविले. किल्ल्यापासून सु.२५ किमी. वर इख्लाासखान आणि मराठे यांच्यात घनघोर लढाई झाली. अखेर मराठ्यांचे सैन्य पराभूत झाले तेव्हा दिलेरखानाने किल्ल्यातील ज्या वस्तू-ऐवज नेता येत नाही, तो सर्व जाळून टाकून किल्ल्याची मोडतोड केली व तो संभाजीराजेंसह धुळखेड या ठिकाणी आला. पुढे मराठ्यांनी करकंबजवळ इराजखानाचा पराभव केला आणि भूपाळगडच्या पराभवाचा सूड उगवला. भूपाळगडच्या लढाईनंतर मोगल सुभेदार व विजापूरचा आदिलशाह यांत वैमनस्य आले. शिवाजीमहाराजांनी संभाजीराजेंची समजूत घातली. परिणामतः संभाजीराजेंने मोगलांना सोडले आणि ते पन्हाळ्यास शिवाजी महाराजांकडे परत आले, ती तारीख होती (२१ डिसेंबर १६७९)..

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...