विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 2 April 2024

परमार पवार राजांचा राज्यकाळ

 


परमार पवार राजांचा राज्यकाळ
लेखन :श्रीमंत राजे पवार घराणे
इस सन १३१० ते १७०७ पर्यंत परमार वंश ₹ महाराष्ट्र आणि वैनगंगा या प्रदेशात स्थिरावत होता. माळवा आणि धार वर पुन्हा पवार राज्य ( मराठा पवार ) : सन १७२५ ते १९४७ - ४८ पर्यंत. छत्रपती शाहूंचे मराठा सरदार उदाजीराव पवारांनी सन १७२३ मध्ये माळवा प्रदेश जिंकला पण नंतर बाजीराव पेशवा यांच्याशी वाद झाल्याने त्यांचे छोटे बंधू आनंदराव पवार यांना सन १७३२ ते १७३५ पर्यंत त्यांना धार चे राजे बनवले गेले
  • विक्रमादित्य प्रथम : इसा से ५७ वर्षा पूर्वी
  • द्वितीय विक्रमादित्य : ४ थे शतक _ कालिदास च्या वेळी
  • कृष्णराज उर्फ उपेंद्र : सन ८०० ते ८२५
  • वाक्पंती प्रथम ; सन ८७५ ते ९१४
  • वाक्पंती द्वितीय / मुंजदेव : सन ९७४ ते ९९७
  • सिन्धुलराज /नव शशांक : सन ९९७ ते १०१०
  • राजा भोजदेव प्रथम : सन १०१० ते१०५५
  • जयसिंह : सन १०५५ ते १०५९
  • उदायादित्य : सन १०८० ते १०८६
  • जगदेव परमार : सन १११६ ते ११६८
  • नरवर्मनदेव : सन ११०४ ते११३३ ( भाई ल्क्ष्मणदेव नन्दीवर्धन ( नागपूर ) चे महाराज
  • यशोवर्मन : सन ११३३ से ११४२
  • जयवर्मन : सन ११४२ ते ११६०
  • विंध्यवर्मन : सन ११६० ते११९३
  • सुभातवर्मन : सन ११९३ ते १२१०
  • अर्जुनवर्मन : १२१० ते १२१६
  • देवपाल : सन १२१६ ते १२४०
  • जयतुर्गादेव : सन १२४० ते १२५६
  • जयवर्मन द्वितीय : १२५६ ते १२६१
  • जयसिंह तृतीय : सन १२६१ ते १२७०
  • अर्जुनवर्मन द्वितीय : सन १२७० ते १२८०
  • भोजदेव द्वितीय : सन १२८० से १३१० ( अल्लाउद्दिन खिलजी कडून पराभव )
पवार घराण्याचा दर्जा पूर्वी पासून फार उच्च कुलीन आहे. हे घराणे राजपूत असून दक्षिणेत ९६ कुळी मराठ्यात सामील झाले. पवार घराण्याला पूर्वी पासून वेदोक्तांचा अधिकार आहे. कृष्णाजी राजे पवार यांना ब्रम्हेन्द्र स्वामी यांनी लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख आहे की तुम्ही (कृष्णाजी राजे पवार विश्वासराव) जातीने क्षत्रिय, सात जाती दिल्लीहून आल्या त्यात तुमची जात उत्तम आणि तुम्हास सूर्य गायत्री आणि यज्ञोपावीत (जाणवे) होते.. उत्तर हिंदुस्तानात मावळ व राजपुताना ह्या प्रांतात परमार उर्फ पवार ह्या घराण्याचे राज्य कित्येक शतके चालू होते. मुस्लिमांच्या आगमना नंतर उत्तरेतील हिंदू साम्राज्यास उतरती कळा लागून पुढे राज्य लयास गेले, तेव्हा त्यांच्या घराण्याच्या अनेक शाखा निरनिराळ्या मुलखांत जाऊन स्थायिक झाल्या. त्यातील एक शाखेचा उदय महाराष्ट्रात १७व्या शतकाच्या आरंभास झाला.
उपनावे
  • प्रथम मुलूखगिरी करताना काही खितांब मिळाले त्या पुढे तेच खिताब आडनाव म्हणून रुजू झाले.
  • महिपतराव २) विश्वासराव ३) मुकूटराव ४) औषधराव ५) झुंझारराव ६) धारेराव ७) धारकर..
  • आरफळकर - संत ज्ञानेश्वर अन संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळाचे मालक हैबतबाबा अरफळकर मूळचे धार पवार ग्वाल्हेरचे शिंदे सरदार यांच्या सोबत कामगिरीवर असणारे हैबतबाबा हे सातारा मधील आरफळ गावचे. श्रीमंत शितोळे सरकारांच्या मदतीने आजच्या पालखी सोहळ्याचे लष्करी स्वरूप सरदार हैबतबाबा अरफळकर यांनी दिले.
  • निंबाळकर - फलटणचे प्रसिद्ध असलेले राजघराणे मूळचे धार पवार आहे. मूळ पुरुष निंबराज पवार यांनी वसवलेल्या निंबळक गावावरून निंबाळकर उपनाव प्राप्त झाले. थोरल्या महाराणी सईबाईसाहेब याच निंबाळकर घराण्यातील.
  • विश्वासराव - हे शिवपूर्व व शिवकाळातील प्रसिध्द धार पवार घराणे. नगरदेवळे येथील पवार घराणे तसेच कोकणात राजापूर येथे कुरंग कोंडगे येथें तर पनवेल येथील काल्हे गावात विजयराव विश्वासराव (शिवनेरी किल्लेदार) यांची शाखा आहे.
  • दळवी - हे शिवकालीन धार पवार सरदार घराणे आहे. यांचे मूलस्थान कोकणात पालवणी गावात होते. मुळशी तालुक्यात आंबवणे येथील दळवी घराणे सुद्धा ऐतिहासिक आहे. दलाचे अधिपती असल्या दळवी हे आडनावं झाले.
  • ढवळे - इस १३०० च्या सुमारास अबु येथील रणधवल परमार (पवार) घराण्याचा मूळ पुरुष दक्षिणेत आला. त्यांनी ढवळ व नांदवळ गावे वसवली. ढवळचे पवार फलटणच्या निंबाळकर यांच्या पदरी सरदार होते.
  • पाणसंबळ - छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षण लखोजी जाधवराव यांनी नेमलेले प्रशिक्षक सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचेकडूनच पूर्ण झाले. गोमाजी नाईक यांनी जिजाबाई साहेब आणि बाल शिवाजी हे शिवनेरी येथे असतानाच शिवाजी राजांच्या प्रशिक्षणाची सुरूवात केली होती. नाईक पानसंबळ हे आडनाव मराठ्यांच्या शहाण्णव कुळातील पवार कुळातील आहे. ते मध्यप्रदेशातील धार संस्थानच्या परमारराव उर्फ पवार यांचे वंशज आहेत. परमाररावांचा पुढे पवार असा अपभ्रंश होऊन, पवारातील काही लोक 'नाईक निंबाळकर' अशा पडनावाने राहू लागले. आणि याच नाईक निंबाळकर आडनावातील काही लोकांच्या आडनावात पुन्हा एकदा अपभ्रंश होऊन, ते 'नाईक पानसंबळ' असे झाल्याचे गोमाजी नाईकांच्या वंशजांमधून सांगितले जाते. सरदार गोमाजी नाईक पानसंबळ यांचे गाव अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे हे असल्याचे सांगितले जाते.
  • जगदाळे - श्रीमंत जगदाळे हे धारच्या पवार घरण्याची शाखा. पानिपतच्या युध्दात आपल्या पराक्रम मूळ प्रसिद्ध. बहमनी काळापासून या घराण्याला १६८ गावाचा मसूर परगणा व देशमुखी होती. मसुरे गराडे व दौंड लिंगळे येथे दिडशे गावाची सरपाटिलकी मिळाली. जगदेवराव जगदाळे हे मूळपुरुष समजले जातात
  • औषधराव - वैद्यकीय ज्ञान व वैद्यकीय व्यवसाय असणाऱ्या धार पवार घराण्याची हि शाखा . औषधराव म्हणजे राजवैद्य, वैद्य. हेच पुढं औषधराव चे अपभ्रंश. मावळ, मुळशी तालुक्यात या घराण्यांचे वास्तव्य आहे.
  • धारेराव - सांगली जिल्ह्यातील रेणावी गावातील आपल्या कामगिरीच्या जोरावर पवार घरण्याला धारेराव हा खितांब.
  • धारकर- पुणे जिल्ह्यातील वाल्हे गावातील धार पवार घरण्याला धारकर हा खितांब. छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत असणाऱ्या सरदार तुकोजीराव पवार ह्याच गावचे.
  • सोरटे - पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील हे मूळ धार पवार घराणे. आपल्या सरदारकी बरोबरोच मानशिरकरी हा खितांब.
  • वाघळकर - सुपेकर - आपल्या वतन मिळलेल्या गावात वास्तव्यामुळे धार पवार वाघाळे येथील वाघळकर तर सुपे येथील सुपेकर म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • पंडीत - कोकणात काही गावातील मंदिरात पूजेचा मान असल्या मुळे पंडित उपणाव झाले. प्रसिध्द कासोटीपटू चंद्रकांत पंडित हे ह्याच धार पवार घराण्यातील.
  • सावंत - कोकणात असलेले हे मूळ धार पवार घराणे. आपल्या स्वकर्तुत्वाने वर आले. नर्मदेच्या पलीकडे जाऊन हल्ला केलेला पाहिले मराठा सरदार हे कृष्णजी सावंत हे मूळ धार पवार.
  • गूढेकर , घोसाळकर , पटेल ,बणे , गढीकर , सावंत , विश्वासराव , पंडित , सोरटे, कवडे, पोकळे, भरम , वाघ , नातू , वैद्य ,धनवडे ,विश्वासराव, निंबाळकर, जगदाळे, औषधराव,सरोदे,घोसाळकर, वाकचौरे , कांचन धार पवार घरण्याची उपणावे...
  • उत्तर भारतात पणवार , परमार , पँवार , पुवार तर गॊवा भागात पोवार असा उल्लेख करतात.
श्रीशिवछत्रपती चरणी तत्पर...!!
श्रीमंत राजे पवार घराणे निरंतर...!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...