अपरिचित छत्रपती राजाराम पुत्राचे स्वराज्यासाठी बलिदान
७जानेवारी १७००
मयत राजा अनूप सिंग यांचा पुत्र सरूपसिंग याने( राजा) रामाला कबिला विजापूरचा सुभेदार लुत्फुल्लाखान याजकडे ठेवावा. जडजवाहीर, हत्ती वगैरे तळावर (ब्रम्हपुरी) जुम्लतुल्मुल्क ( असद खान वजीर) याजकडे धावे आणि स्वतः हुजुरात यावे अशी आज्ञा झाली.
______________________
३१जानेवारी १७००
विजापूरच्या बातम्यावरून पुढीलप्रमाणे कळले.;-(राजा) रामाची सकुटुंबीय व संबंधी माणसे यांना राव सरूपसिंग याने विजापूरचा सुभेदार लुत्फुल्लाखान यांच्या हवाली करून त्याबद्दलची रसीद (पोच) घेतला आहे. बादशहाची आज्ञा होती की:त्यांना विजापूरच्या किल्ले अर्क ( आतील भाग, मुख्य बलिकिल्ले) मध्ये ठेवावे. पण किल्ले अर्कचा किल्लेदार इनायतखान याला तसे हुकूम मिळाले नाहीत. त्यामुळे लुत्फुल्लाखान याने वरील मंडळी ना कोतवाली चबुतऱ्यापाशी ठेवले आहे. काय आज्ञा? बादशहा म्हणाले, इनायतखानाला याबद्दल लिंहा..
_______________________
२०एप्रिल १७००
राजारामाचा कबिला आणण्यासाठी खानेआलम हा तळावरून (ब्रम्हपुरी) विजापूरला गेला होता. त्याने कबिला तळावर (ब्रम्हपुरी) आणला असे बादशहांना कळविण्यात आले
_____________________
२२ मे १७००
हरकायांच्या तोंडून पुढील हकीकत ली:-कळनरकवासी (राजा) राम यांची कुटुंबीय माणसे तळावर नवाब जीनतुनिसा बेगम ( औरंगजेबाची मुलगी) हिच्यापाशी नजर कैदेत आहेत. या बायका मंडळीत एक दहा अकरा वर्षाचा मुलगा आहे. या मुलाला आपल्या आईपाशी ठेवावे की (जनानखान्याच्या) बाहेर ठेवावे. काय आज्ञा? त्याला आपल्या आईपाशी राहू दया अशी फादशहांनी आज्ञा केली.
_________________________
२९मे १७००
नायब कोतवाल मुहम्मद अमीन याने विनंती केली की:नरकवासी रामा (राजाराम) याच्या मुलाबरोबर तेहतीस माणसे तळावर (ब्रम्हपुरी) कैदेत आहे त त्यांना ठार मारावे अशी आज्ञा झाली आहे. तर याबाबतीत जुम्दतुल्मुलक ( असदखान मुख्य
प्रधान व ब्रम्हपुरी च्या तळाचा रक्षक ) यास आज्ञा देण्यात यांवर. ज्बादशहानी विनंती मान्य केली. फजाइलखान यानें तसे लिहावे अशी आज्ञा झाली.
________________________
३०मे १७०० हरकारा (भास्करराव गायकवाड) च्या तोंडून पुढील हकीकत कळली:-नरकवासी रामा (राजाराम) याचे कारभारी (पेशकार) रामचंद्र, (रामचंद्र पंत अमात्य) यांची वकील रामाजी पंडित व परशुराम (परशुराम प्रतिनिधी) यांचा वकील अंबाजी (अंताजी आप देव) हे छावणीत आले आहेत. बादशहाजादा आज्जमशहा यांच्या मध्यस्थीने किल्ले देऊ व (राजा) रामाच्या मुलाला जिवाचे अभय मिळवावे असे त्यांचा उद्देश आहे.
----------------------------
सुचना:-अखबरातील नोंद जशीच्या तशी दिले आहे गैरसमज नको कारण छत्रपती राजाराम पुत्र बद्दल माहिती व लेख सर्वात प्रथम माहिती स्पष्टीकरण सह देते आहेत कारण इतिहास अभ्यास व वाचकांनी संदर्भ खात्रीशीर आहेत की याबद्दल शंका उपस्थित होऊ नये म्हणून:- आपले संतोष झिपरे
छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यास जुल्फिकार खान यांनी ८वर्ष घातल्यानंतर जिंजी किल्ला हाती येण्यापूर्वी छत्रपती राजाराम महाराज निसटून स्वराज्यात दाखल झाले. पण यावेळी जिंजी किल्ला वरील कुटुंब कबिला , छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी जानकीबाई राणी सरकार मोगलांच्या ताब्यात सापडले होते त्यात
छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र व इतर तेहतीस असामी ना कैद करून बादशहाचे तळावर बंदोबस्तात पाठवले
या कैदीत ४२माणसादी होती असे दिसत
येत छत्रपती छत्रपती संभाजीराजे काळातील प्रल्हाद निराजी न्यायधीश, त्यांचे चुलते भाऊ तसेच जिंजीतील पंतप्रतिनिधी प्रल्हादपंत, त्यांचे चलतू भाऊ त्रिबंशकर न्यायधीश आदी असामी या सर्वांचा ठार मारण्याचा आदेश औरंगजेब यांनी दिले.
येत छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र यांनी पण ठार मारण्यात आले पण हो पुत्र कोण? बहुतेक खाशी राजपुत्र उल्लेख औरस पुत्र साठी वापरले जाते. त्याअर्थी आपण विचारा व अभ्यास करताना असे दिसते की छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत जिंजी येथे थोरल्या महाराणी जानकीबाई साहेब सोबत होत्या छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रात येताना जिंजी किल्लावर जो कारभारी मंडळी गडावर राहिले त्याच्या सोबत महाराणी जानकीबाई होत्या तसेच १६८९पासून जिंजी मुक्काम छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत महाराणी म्हणून राज कारभारी सांभाळली तेव्हा त्यांनी पुत्र झाले असणारे असे दिसते. कारण जिंजी किल्ला तून बाहेर पडताना छत्रपती राजाराम महाराजांनी मध्यरात्री निघाले कारण सदर किल्लाच्या पायथ्याशी झुल्फिकार खान आठ वर्षे पासून वेढा देऊन बसला होते तसेच छत्रपती घराण्यातील वारसा सुरक्षित राहील पाहिजे हे एक कारण असावे.
चिकित्सा;-७जानेवारी १७००रोजीच्या नोंदीनुसार औरंगजेब यांनी सरूपसिंगयास विजापूर (विजयपूर) येथे जिंजी येथून छत्रपती राजाराम यांचा कुटुंबे कबिला सुभेदार लुत्फुल्लाखानकडे जावे असे म्हटले आहे तर ३१जानेवारी रोजी रसीद (पोच) घेतला आहे तसेच औरंगजेब यांनी किल्ले अर्क म्हणजे बालेकिल्ल्याच्या मध्यभागी म्हणजे आजचे मुळ विजयपूर किल्लातील जो ओढा तो परिसर होय.
येथे एक लक्षात येते की सदर कैदेत छत्रपती घराण्यातील मंडळी आहेत व या मराठ्यांचे गादीवरील वारसदार आहे यामुळे मराठे यांच्या सुटका करण्यासाठी येणार हे निश्चित....
२०एप्रिल रोजी बादशाह आदेशानुसार ब्रम्हपुरीतून खानेआलम विजयपूर ला जाऊन छत्रपती परिवारातील मंडळी ब्रम्हपुरीच्या छावणीत घेऊन आले तरी २२ मे १७००रोजी नोंदीनुसार औरंगजेब यांची मुलगी जीनतुनिसा बेगम हीच सोबत छत्रपती राजाराम यांची कुटुंब तील बायका मंडळीत एक दहा अकरा वर्षाचा मुलगा आहे व त्याला त्याच्या आईसोबत जीनतुनिसा बेगम सोबत ठेवण्यात यावे असे आदेश औरंगजेब यांनी दिले आहे
तळटीप:-तत्कालीन काळात महाराणी येसूबाई, महाराणी सकवारबाई साहेब, मराठ्यांच्या गादीवरील वारसा बाल शिवाजी ऊर्फ शाहू महाराज औरंगजेब सोबत होते.
तसेच २९मे १७००रोजी ब्रम्हपुरी छावणीतील नायब कोतवाल मुहम्मद अमीन यास छत्रपती राजाराम महाराजांच्या मुलाबरोबर तेहतीस माणसे ठार मारावे अशी आज्ञा (आदेश) औरंगजेब यांनी वजीर असद खान यास दिले
तर दुसऱ्या दिवशी ३०मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सकवरबाई यांची बंधू व भास्करराव गायकवाड हरकारा यांनी औरंगजेब यास सागितले की, बादशाहाजादा आज्जमशहा यांच्या मध्यस्थीने किल्ले देऊ पण छत्रपती राजारामच्या मुलाला सुटका करावे म्हणून रामचंद्रपंत अमात्य कडून रामाजी पंडित व परशुराम पंतप्रतिनिधी कडून अंबाजी (अंताजी आप देव बहुतेक हे सानदेव असावे) वाटाघाटी करण्यास आलेत यामुळे संतापलेल्या औरंगजेब यांनी
रामाजी पंडित यांनी अटेक करून शीर मारले व शहजाद यास दर्शनासाठी येऊ नये म्हणून संबोधले
यावरून मराठ्यांनी सदर राजा पुत्र सुटकेसाठी स्वतः अमात्य व पंतप्रतिनिधी यांनी प्रयत्न केला आहेत सदर नोंदीनुसार छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी जानकीबाई पुत्र यांची हत्या औरंगजेब यांनी केले असावे असे दिसते.
सदर कोणत्याही प्रकारची उल्लेख मराठी बखरीत व कागदपत्रे येत नाही. कारण मराठ्यांचे रायगड, जिंजी येथील दोन्ही दप्तरखाना झुल्फिकार खान यांनी नष्ट केला आहे जर
याबद्दल तंजावर येथील छत्रपती घराण्यातील खाजगी तील कागदपत्रे काही माहिती येऊ शकते . तो पर्यंत ........
महाराणी जानकीबाई यांच्या पुत्राच्या बलिदान शी आम्हाला काही देणे घेणे नाही कमीत कमी भोसरीकर गुज्जर घराण्यातील वारसदार तरी महाराणी जानकीबाई पुत्र च्या स्मृती दिन अभिवादन करण्यासाठी येतील
बाकी सगळे........
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे (अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)
9049760888