विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 May 2024

सेनापती संताजी बाबा घोरपडे यांच्या आठवणी आजही जोपासणारा कुलकर्णी वाडा

 

🚩





सेनापती संताजी बाबा घोरपडे यांच्या आठवणी आजही जोपासणारा कुलकर्णी वाडा🚩🚩🚩
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या चार मुद्रा --
१)🚩🚩श्रीराजाराम चरणी तत्पर! संताजी घोरपडे निरंतर 🚩🚩
--इ. स. १६९३च्या सुमारास संताजीने रामचंद्र पंताना लिहिलेल्या पत्रावरील मुद्रा
२)०श्री राजाराम भूपाल भक्तसेनापते :शुभा!! संताजी घोरपडे तस्य मुद्रा भाति जय प्रदा!! --४ आँक्टोबर १६९१रोजीच्या हजीर मजालसी पत्रावरील मुद्रा
३)श्री राजाराम भक्तस्य जफतनमुलुकस्यच संताजी ++++--१एपिल १६९७रोजी संताजीने जयरामस्वामीनां लिहिलेल्या पत्रावरील मुद्रा
४)******
****
प्रभा संताची घोरपडे तस्य मुद्रा भाति जयप्रदा!!--
स्वामी संताजी घोरपडे सेवेस तत्पर ++++ कुलकर्णी घराणी निरंतर
वरील शिक्का असा असावा काय याबद्दलही मला कधी कधी प्रश्न पडतो कारण काही घराण्यांची निष्ठा ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, यांच्या सोबत जशी निरंतर होती तसेच गिरवीच्या कुलकर्णी वाड्यातील ब्राह्मण कुलकर्णी घराण्याची निष्ठा आहे मराठ्यांचे सरसेनापती संताजी बाबा घोरपडे यांच्या चरणाशी निरंतर असावी यामुळेच आजही या वाड्यात एक तळघर असून त्या संताजी बाबाचा तळघर अथवा संताजी घोरपडे यांचे खलबतखाना असे म्हटले जाते हा वाडा एक एकर मध्ये असून अशी एकास एक जोडलेले तीन वाडे या ठिकाणी आहेत याची वंशांशी संपर्क झाला असून त्यांनी इतिहासातील काही कागदपत्र व संदर्भ या घराण्याकडून पंधरा-वीस वर्षांपूर्वी अभ्यासासाठी एका अभ्यासिकेने घेऊन गेल्याची ही सांगण्यात आले या अभ्यासिका चा शोध या ठिकाणी चालू असून तसेच या घराण्यातील असलेले कागदपत्र ही आपल्या सेवेस लवकरच ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे इतिहास तील पाऊलखुणा या या गावगाड्यात सर्वत्र आढळतात तसे औरंगजेबच्या महाराष्ट्रातील आगमनानंतर मराठ्यांचे सेनापती असणार सरसेनापती संताजी बाबा घोरपडे यांच्या वास्तव्याने पावन आणि पवित्र झालेल्या कारखेल व त्याच्या पदस्पर्शानेत पवन झालेल्या कारखेल येथील या गावांमध्ये आजही कमी जास्त प्रमाणात आढळतात आणि एक लेखकांनी येथील कुलकर्णी घराण्यातील उल्लेख आपल्या पुस्तकात आढळून येते गिरवीच्या बामणाचं घराणं म्हणजेच कुलकर्णी घराणे होय या कुलकर्णी घराण्याची निष्ठा आणि त्याग आणि सेनापती संताजी घोरपडे यांच्या बलिदान च्या काळात सांगतील जाणार उल्लेख व इतिहास व इतिहासातील माहिती योगदानाबद्दल शोध सुरू केले आहे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या काळात वर्षभरातील मोहिमेनंतर जो मराठ्यांचा खजिना कारखेलमध्ये यायचा तो या वाड्यात उतरायचा आणि त्यानंतर इतरत्र पाठवला जायचा अशी या वाड्याची ख्याती इतिहासाचे ध्रुवीकरण करताना आम्ही बामणांना किंवा एखाद्या कुलकर्णी घरांना विरोध निश्चित करतो पण या घराण्याची मराठ्यांच्या जिरपटका विषयी व छत्रपती घराणे विषयी असलेली निष्ठा व सेनापती संताजी घोरपडे घराण्याच्या बलिदान काळात केलेल्या सेवा ही मराठ्यांच्या इतिहासाची अद्वितीय उदाहरण आहे गरजेपुरता व सोईपुरता इतिहास सांगण्यापेक्षा इतिहासात न सांगितलेल्या घराण्यांचा इतिहास पुढे येणे व छत्रपतींशी मराठ्यांची व छत्रपतींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या प्रत्येक सेनापती सेनानी शिलेदार यांच्याशी एक निष्ठा असणाऱ्या घराण्याचा जेव्हा इतिहास भविष्यात लिहिला जाईल त्यात गिरवीच्या ब्राह्मण घराण्यातील कुलकर्णी वाड्यांचा इतिहास हाही समाविष्ट करावी लागणार आहे हेही तितकच सत्य याविषयी आणखीन माहिती लवकरच आपल्यापर्यंत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ध्यास हा महाराष्ट्राच्या किंवा गावगाड्यातील मातीतून खोदून नाही खाली चलन काढण्याची वेळ आली आहे कारण आजच्या काळात असलेले शिल्लक कागदपत्र आणि माहितीगार व्यक्ती जर काळाच्या आड गेले तर खरा इतिहास कधीच येणार नाही आणि मराठ्यांच्या प्रत्येक शिवभक्तांच्या मानबिंदू असणारे व प्रत्येक शिवभक्त जिथे ओल्या डोळ्यांनी मस्त होतो त्या संताजी बाबांचा इतिहास समोर येण्यासाठी इतिहासातील काही गोष्टी शोधणे माहिती काढणं व लोकांपर्यंत पोहोचणे हे गरजेचे आहे त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत यावेळी स्थानिक इतिहास प्रेमी चैतन्य देशपांडे, अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिग्विजय जाधव व संतोष झिपरे
तळटीप:--
यावेळी येथील वंशज हे इतर ठिकाणी स्थायिक असलेल्या मुळे वाडा उघडुन बघता आले नाही पुढील भेटतो निश्चित..........
🚩🚩 🚩🚩🚩🚩
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...