विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 2 May 2024

सरसेनापती संताजी घोरपडे.

 

१६ डिसेंबर १६९१...
 लेखन :

गडवाटकरी 'सचिन पोखरकर'

लाखभर सैन्याने वेढलेल्या चक्क औरंगजेब बादशहा च्या छावणीवर हल्ला करून त्याच्या तंबू चे कळस कापून आणणारे

सरसेनापती संताजी घोरपडे...🚩
छत्रपती संभाजी महाराज गेले आणि मराठा रियासतीवर शोककळाच पसरली औरंगजेबाचा हैदोस मात्र महाराष्ट्रावर अखंड चालूच होता त्याला जणू असे वाटले होते की आता मराठेशाही देखील आपण गिळंकृत करूच पण परिस्थितीवर रडण्या पेक्षा परिस्थितीशी लढण्यातच पुरुषार्थ आहे.. ही शिकवण शिवाजी महाराज देऊन गेले होते तेच शिवसूत्र मानून अनेक संकटे पार करीत राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावरून स्वराज्याचा गाडा हाकू लागले मोठ्या धैर्याने राजे हे कार्य बजावत होते..
शिवरायांनी निर्माण केलेल्या एका दुधारी शास्त्राच्या बळावर (रसाळ आणि मधाळ जीभ) राजाराम महाराजांनी खानच्या छावणीत भेद निर्माण करून टाकला मराठी राज्यावर पाखरे झालेल्या नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, व नागोजी माने या बड्या मराठी सरदारांच्या मनात.. तेस्वराज्यज्योती पेटवण्यास राजे यशस्वी झाले. परिणामी हे मराठा सरदार मोगली छावणी सोडून आपल्या लष्करासह जिंजीत राजेंकडे दाखल झाले (२३ नोव्हेंबर १६९०) हा मोगलांना बसलेला जबरदस्त धक्का होता तरी खानाने वेढा चालूच ठेवला तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला एक अजस्त्र किल्ला जिंकणे सोपी बाब नाही हे खान उमगला. आणि बादशहाच्या कानाला लागून त्याने वजीर आसदखान आणि व पुत्र शहजादा कामबक्ष यांच्या समवेत फौजफाटा पाठवून दिला १६ डिसेंबर १६९१ ते छावणीत दाखल झाले देखील आता मोगलांचे बळ वाढले ते देखील अनेक पटीने. आणि भेद शक्य नव्हता आता अजगराचे विळखे जबर पडू लागले लागले तेव्हा राजाराम महाराजांचे दोन वाघ शत्रू प्रदेशात धुमाकूळ घालत होते त्यातील एक वाघ निघाला जिंजीचा वेढा उठवायला शिवरायांचा अंकुर जपायला कोण होता तो वाघ..? दस्तुरखुद्द शिवरायांच्या तालमीत तयार झालेले हे घोंगावतं मराठी वादळ म्हणजे सेनापती संताजी घोरपडे होय...
सरसेनापती संताजी घोरपडे जिंजीकडे दौडत असता त्यांना जिंजीच्या तळाला रसद घेऊन अलीमर्दाखान जात असल्याची बातमी त्यांना मिळाली प्रथमतः मोगली रसद कापण्याचे त्यांनी ठरविलेजशी शिवरायांच्या काळात पेडगाव लुट झाली होती तशीच चाल संताजी खेळले दोन हजार सैन्य घेऊन खानावर चालून गेले आणि त्वरित माघार घेतली. त्यामुळे अलीमर्दाखानास चेव चढला त्याचे सैन्य संताजींच्या मागे निघाले शत्रूला पाठीवर घेऊन संताजींनी त्यास आपल्या मुख्य सैन्याच्या कचाट्यात आणून सोडले अचानक हल्ल्याने मोगल धास्तावले ते हरले अलीमर्दाखान मराठ्यांच्या हाती लागला, ५ हत्ती, ३०० उमदे घोडे, वाहतुकीची जनावरे आणि त्यांच्या पाठीवरची प्रचंड रसद मराठ्यांना लाभली...
या विजयामुळे तळावरील सैन्यास प्रचंड धक्काच बसला शत्रू सैन्याने इतकी दहशत खाल्ली की मोगली फौज आणि बादशाही छावणी या दरम्यान दळण वळण बंद पडली स्वतः औरंगजेब परलोक वासी झाल्याच्या बातम्या उठू लागल्या बादशहाच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी होणाऱ्या झगड्यात मराठ्यांकडून सहाय्य मिळावे आसदखाना करवी त्याचे प्रयत्न चालू झाले...
आणि अशा संधीचा फायदा घेऊनच मराठ्यांनी किल्ल्याबाहेर पडून मोगलांचे मोर्चे उधवस्त केले मराठ्यांचा मोठा जय झाला...🚩
——————————
संदर्भ : सेनापती संताजी घोरपडे..
इतिहासकार : डॉ.जयसिंगराव पवार..
———————————
चित्रकार : Ram Deshmukh 👌🏼♥️🔥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...