‘लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे’
लेखन आणि संकलन – मुकेश मारुती वडीयार
आणिबाणीच्या
प्रसंगी वेळ पडल्यावर काही सरदारांनी आपाल्या जीवाचीही तमा बाळगली नाही
उलट आपले प्राणसुध्दा पणाला लावले. जिवा महाले, हिरोजी फर्जंद, बाजी प्रभू
देशपांडे, तानाजी मालुसरे अशी अनेक नावे सांगता येतील. तख्ताचा गड रायगड
पडल्यावर गडावरील सर्व मात्तबर शाहू बरोबर मोगलांच्या हवाली झाली.
आणीबाणीच्या या प्रसंगी गडावरील कर्तबगार मराठ्यांनी कच खाली नाही. शाहू
महाराज 18 वर्ष मोगलांच्या निर्बंधात होते, कैदेत असतानाही येसूबाईंनी
त्याच्यावर योग्य ते संस्कार केले. हिंदु धर्मशास्त्रानुसार
तुरुंगात(कैदेत असताना) शिजवलेले अन्न खाणे हे निषिद्ध मानले असल्याने
शाहूही बादशहाच्या कैदेत शिजवलेले अन्न न खाता फक्त गोड पदार्थ सेवन करीत
असे. हि गोष्ट जेव्हा औवरंगजेबाच्या कानावर गेली तेव्हा त्यांने शाहूस
मुसलमान होण्याचा हुकूम दिला. शाहूने ते मान्य केले नाही म्हणून त्यावर
कडक नजर ठेवण्यात आली. उद्भवलेला प्रसंग पाहून येसूबाईंनी बेगम मार्फत
बरेच यत्न करुन औवरंगजेबाचे मन वळविले. परंतू बादशहाने जे ठरवले जे झाले
नाही तर, बादशहाच्या शद्बाची किमंत जाते असे सांगत औवरंगजेबाने शाहू ऐवजी
दोन सरदारांनी मुस्लिम व्हावे ही अट घातली. शेवटी शाहूच्या बचावासाठी दोन
सरदार पुढे आले. खंडेराव व जगजीवन हे गुजरबंधू मुस्लिम होण्यास तयार झाले.
16 मे रोजी मोहरमच्या मुहुर्तावर त्यांना मुसलमान करुन त्यांची नांवे
अब्दुर्रहीम व अब्दुर्रहमान अशी ठेवण्यात आली. (12) गुजर ह्या घराण्याचे
हे उपकार महाराष्ट्र कधीहि विसरणार नाही. सेतू माधवराव पगडी या अनुषंगाने
म्हणतात, ‘शाहूने धर्मांतर केले असते तर महाराष्ट्राचा संपुर्ण इतिहास
बदलला असता. मराठ्यांनी त्यांची सत्ता मानली नसती. औवरंगजेबाने त्याला
जहागिरी देऊन नवाब केले असते. पुढील काळात पेशवे (घराणे) उदयाला आले,
त्यांनी मराठी राज्याचे अखिल भारतीय साम्राज्यांना रुपांतर केले या गोष्टी
झाल्या नसत्या.”(13)
औवरंगजेबाच्या
कैदेतून जेव्हा शाहूंची सूटका झाली तेव्हा अनेक मात्तबर सरदार त्यांस
जावून मिळाले त्यांच्यातीलच ‘मल्हार तुकदेव’ हा मराठा सरदार पहिला होय.
यानंतर अनेक घराणी शाहूंच्या बाजूस आले. कदम बांडे, हैबतराव निंबाळकर,
नेमाजी शिंदे, कान्होजी भोसले, मानसिंग मोरे, रुस्तमराव जाधव, जिमणाजी
दामोदर, चांबळीकर गणे, शंकर सरनाईक, केसो त्रिमल पिंगळे, रामचंद्र त्रिंबक
बाकणीस, पंताजी शिवदेव हणमंते मंडळी यांचे बरोबर प्रभू, बोकील, मेडशी इ.
प्रभावळ त्यांच्या भोवती जमा झाल्या. या सर्वांबरोबर स्वराज्याचे चिटणिस
घराणेही शांहू बरोबर होते. चिटणिस घराण्याचे योगदान ही मराठ्यांच्या
इतिहासात असाधारण आहे. जेव्हा शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी प्रभू यांना
जेव्हा राज्याभिषेका अगोदर अष्ट प्रधानात येण्याचे विचारले होते, तेव्हा
प्रभूंनी चिटणीसी वंश परंपरागत स्वरुपात मिळावी हिच विनंती केली. अष्ट
प्रधानातील नेमणूक न घेता चिटणिसीद्वारे स्वराज्याची सेवा अखंड करता यावी
हीच मागणी शिवाजी महाराजांसमोर ठेवली. चिटणीस घराण्याची स्वराज्या प्रती
असलेली निष्ठा ओळखूण शिवाजी महाराज व शाहूं महाराजांनी या घराण्यांचा
विशेष गौरव केल्याचे दिसून येते. त्यातीलच काही पत्रव्यवहार पुढील प्रमाणे
आहे. –
पत्र क्रमांक 1 (शिवकालीन) (14) –
पत्र क्रमांक 2 (शिवकालीन)(14)
पत्र क्रमांक 2 (शाहूकालीन) (15)-
मराठ्यांचा
इतिहास हा इतका समृध्द आहे, की त्यातून ठरावीक घराणी निवडूण शब्दांची
मर्यादा ठेवून त्यांची माहिती देणे. उपरोक्त पोस्ट मध्ये आपल्या धन्याशी
इमानीने राहिलेल्या काही मोजक्याच घराण्याच्या बद्दल माहिती मी दिलेली
आहे. यामध्ये अनेक घराण्याची माहिती देता येवू शकते परंतू शब्दांची आणि
वेळेची मर्यादा येते हे मी नम्रपणे नमूद करतो.
-लेखन आणि संकलन – मुकेश मारुती वडीयार
संदर्भ –
(1) mr.wikipedia.org/wiki/मराठा
(2) महाभारत (शांतिपर्व) अध्याय -64 श्लोक 26
(3) महाराष्ट्र इतिहास मंजीरी – पेशवे काव्य (पृष्ठ क्र. 219)
(4) मराठ्यांचा इतिहास (भाग 3) –द.बा. करकरे
(5) मराठी रियासत (पुर्वार्ध)- गोविंद सखाराम सरदेसाई
(6) शिवकालीन पत्र सार संग्रह – पत्र क्र. 2345
(7) शिवकालीन पत्र सार संग्रह – पत्र क्र. 2368
( महाराष्ट्रातील प्रसिध्द सरदार घराणी – प्रा. म. रा. कुलकर्णी
(9)समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी – सुनिल चिंचोलकर
(10) कृष्णाजी अनंत सभासद विरचित छत्रपती श्रीशिवाजीराजे यांची बखर- शं. ना. जोशी
(11) साधन-परिचय अर्थात महाराष्ट्राचा पत्ररुप इतिहास (क्रमांक 49)
(12) मराठी रियासत (खंड 2)- गोविंद सखाराम सरदेसाई
(13) महाराणी येसूबाई- सदाशिव शिवदे (पृ. 109)
(14) शिवकालीन पत्र सार संग्रह – पत्र क्र. 1654 व 1659
(15) साधन-परिचय अर्थात महाराष्ट्राचा पत्ररुप इतिहास (क्रमांक 71)

No comments:
Post a Comment