सेनापती संताजी घोरपडे यांनी ही लढाई गनिमी काव्याने खेळून ती कशी जिंकली,
लेखन :
गडवाटकरी 'सचिन पोखरकर'
सेनापती संताजी घोरपडे यांनी ही लढाई गनिमी काव्याने खेळून ती कशी जिंकली, हे समजून घेण्यासाठी गव्हर्नर मार्टिनच्या डायरीतील नोंद काळजीपूर्वक अभ्यासली पाहिजे. संताजींच्या विजयाचे साग्र वर्णन पांदेचरीचा फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत केलेले आहे. मार्टिनसारख्या परकीयाने दक्षिण हिंदुस्थानातील या महत्त्वाच्या लढाईचे वर्णन इतके सुंदर केलेले आहे की, ते वाचून मार्टिनच्या चौकस बुद्धीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. संताजींच्या गनिमी काव्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने मार्टिनच्या डायरीतील उतारा अत्यंत महत्त्वाचा आहे :
● मार्टिन लिहितो :
“Ali Mardan Khan ordinarily held the plain with 1200 to 1500 horse for the security of the convoys. This month he was escorting a very large convoy to the camp. Santaji Ghorpare, a famous Maratha was coming from the other coast with 10 to 12 thousand horsemen to reinforce Jinji and received intelligence of the Mughal convoy being escorted by Ali Mardan. This General, clever and expert in the art of war, posted himself on the route by which the Moors (Mughals) had to pass. He chose the terrain for his premediated design and when it appeared that the enemy was near, he caused one part of his cavalry to fall back and himself appeared before the enemy with only 2 or 3 thousand horse. The Muslim cavalry, which didnot reck a corps of the Marathas twice as numerous as themselves, gave chase to Santaji, His retreat was well-planned; it appeared that Santaji was only trying to get time; but when the enemy came near the place where the remainder of the Maratha cavalry was posted, the Moors (the Mughals) were enveloped and after a fight of many hours, although their strength was very unequal, the escort was totally defeated. The Marathas seized and took into Jinji without any opposition, Ali Mardan Khan, many of his officers, many merchants who have believed the opportunity safe for going to that side, five elephants, 300 good horses, the baggage, and generally all the convoy and transport animals..”
(या प्रदेशातील मोगल रसदींचे संरक्षण करण्याची जबाबदारी अलिमर्दानखान हा आपल्या १२००/१५०० घोडदळानिशी सांभाळत असे. या महिन्यात जिंजीच्या पायथ्याशी असलेल्या मोगली सैन्यासाठी जाणाऱ्या रसदेचे संरक्षण करण्याचे काम तो करत होता. मराठ्यांचा नामांकित सरदार संताजी घोरपडे हा महाराष्ट्रातून जिंजीच्या मदतीला आपल्या १०-१२ हजार घोडदळासह निघाला होता. त्याला ही मोगली रसदेची बातमी समजली, तेव्हा युद्धकलेत अत्यंत हुशार व निष्णात असणाऱ्या या मराठा सेनानीने आपले लष्कर मोगल रसदेच्या मार्गावरच उभे केले. त्याने निवडलेली जागा त्याच्या लष्करी डावपेचाला अनुकूल अशी होती. शत्रू जवळ आल्याचे समजताच त्याने आपले बहुसंख्य घोडदळ मागे ठेवून तो स्वतः २-३ हजार घोडदळासह शत्रूस सामोरे गेला. मराठ्यांचे घोडदळ मोगलांच्या घोडदळाहून दुप्पट होते. पण त्याची पर्वा न करता मोगलांनी मराठ्यांचा पाठलाग सुरू केला. संताजींची ही माघार पूर्वनियोजित होती. त्याला विजयासाठी काही अवधी हवा होता. आपल्या पाठीवर शत्रू घेत त्याने त्यास अशा जागी आणले की, जिथे मराठ्यांचे मुख्य घोडदळ तयारीत होते. शत्रू टप्प्यात येताच मराठ्यांनी त्यांस सर्व बाजूंनी घेरले. मोठी धुमश्चक्री उडाली. मराठ्यांनी अलिमर्दानखानासह कित्येक मोगल अधिकारी व व्यापारी यांना कैद केले. शिवाय ५ हत्ती, ३०० उमदे घोडे, वाहतुकीची जनावरे आणि सर्व सामानसुमान त्यांच्या हाती पडले. त्या सर्वांना घेऊन मराठे जिंजी किल्ल्यात निघून गेले)..
――――――――――――
आर्टिस्ट : ओंकार जगताप
No comments:
Post a Comment