विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 2 May 2024

वाकिनखेड्याच्या बेरडास सरसेनापती धनाजी जाधवांची मदत,

 वाकिनखेड्याच्या बेरडास सरसेनापती धनाजी जाधवांची मदत,

 लेखन :

गडवाटकरी 'सचिन पोखरकर'


वाकिनखेड्याच्या बेरडास सरसेनापती धनाजी जाधवांची मदत, ती तारीख होती ६ एप्रिल १७०५ :
बेरड-मोगलांचा वाकिनखेड्यास संघर्ष सुरू असताना बेरडांनी मराठ्यांशी हातमिळवणी केली. धनाजी जाधवाचे व बेरडांचे सख्य होते. धनाजी, हिंदूराव व इतर मराठ्यांचे कुटुंब तेथे आश्रयास होते. पाच हजार घोडदळ व वीस हजाराचे पायदळ घेऊन धनाजी जाधव व हिंदूराव घोरपडे यांनी मोगलांवर हल्ला केला. त्यांनी एकीकडे मोगलांना युद्धात गुंतवून दुसरीकडे दोन, तीन हजारांच्या तुकडीने किल्ल्यात शिरून आपले कबिले बाहेर काढले व घोड्यावर बसवून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविले. छावणीच्या बाहेर पाऊल टाकण्याची एकाही मोगल सैनिकास हिम्मत होईना. धान्य आणि चारा अतिशय महाग झाला..
भीमसेन सक्सेना या वेढ्यात हजर होता. तो म्हणतो...,
"सरदार हे अननुभवी, लोभी आणि कम हिम्मतीचे बनले आहेत. खानदानीचे शिपाईगडी यांना ते कामावर घेत नाहीत. उलट साध्या नोकर-चाकरांना घोड्यावर स्वार करून ते युद्धात घेऊन जातात. हे नोकर-चाकर म्हणजे शत्रुला पाठ दाखवून पळून येण्याच्याच लायकीचे.." (पगडी, हिंदवी स्वराज्य आणि मोगल, पृ.२७८-२७९).
बेरडांनी मराठ्यांनी मदत करून मोगलांना येथेही जेरीस आणले. भीमसेन सक्सेनांनी जे वर्णन केले त्यावरून मोगल सैन्यातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड होतो. यामुळेच मोगल ठिकठिकाणी पराभूत झाले. पाच महिने हा वेढा सुरू होता. त्यात मोगलांचे ७ हजार सैन्य व १२ प्रसिद्ध सेनानी मारले गेले. असे मनुचीने नमूद केले आहे. औरंगजेबाने रहमानबक्ष खेडा असे त्याचे नाव ठेवले..
मराठे किल्ले परत घेतात (सन १७०५) बादशहा वाकिनखेडा जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर जाताच महाराष्ट्रात मराठ्यांनी गेलेले किल्ले परत जिंकून घेतले. सन १७०५ च्या जानेवारीत धावजी विसार व चाफाजी शिंदे यांनी लोहगड, तर सिंहगड शंकराजी नारायण, रामजी फाटक, त्र्यंबक शिवदेव व पंताजी शिवदेव यांनी जिंकला. राजमाचीचा किल्लाही मराठ्यांनी परत घेतला..
――――――――――――
🎨 Ram Deshmukh 👌🏼♥️🔥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...