विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 May 2024

🚩🚩सरदार भवानजी जाधव 🚩🚩

 






🚩🚩सरदार भवानजी जाधव 🚩🚩 सदर खालील दोन पत्रे हे यातील एक पत्र हे 17 59 मधले असून यात सज्जनगड येथील किल्लेदार असलेले भवनजी जाधव यांना पेशवा नानासाहेब यांनी लिहिले आहे व यात महाबळेश्वर येथील दिवाकर बट यांना सज्जनगडावरील असलेल्या अश्वथ पूजेच्या मानाप्रसंगी व उत्पन्न झालेल्या वाद संबंधात त्यांनी पुण्यात येऊन तक्रार केली असता यासंबंधी परंपरागत मान हा दिवाकर भटांचा असून यात वाद करणारे जोशी यास संबंध नाही असे पत्रात उल्लेख केला आहे तसेच यात किल्लेदार भवानजी जाधव यांना परंपरागत रित्या दिवाकर भटास असलेला मान सुरू ठेव ण्यास आज्ञा दिली आहे तर दुसऱ्या पत्रात लेखांक 272 मध्ये राणोजी शिंदे यांनी हे पत्र राक्षस भवन च्या लढाई वरून दिलेलं आहे यात मराठ्यांच्या विजयाची सूचना असून विठ्ठल सुंदर ठार झाल्याचा उल्लेख आहे तसेच बाबाजी जाधव म्हणजेच मानसिंगराव जाधव हे निजामाच्या वतीने लढताना ठार झाल्याचाही उल्लेख यात आहे तसेच यावेळी निजाम हा गंगातीरी म्हणजेच गोदावरी नदीच्या पलीकडे निघून गेल्याचाही उल्लेख यात येतो सदर दोन्ही पत्रातील सरदार भवनजी किल्लेदार हे कारडी या गावातले असून सोबत दिलेल्या वंशावळीत ते दिसून येतात सदर वंशावळ हे कारडी झरेवाडी कर जाधव घराण्यातील आहे यातील राणोजी शिंदे कोण हे शोधलं असता स्पष्ट होत नाही याबद्दल आणखीन संशोधन होणे गरजेचे आहे पण त्यांचा संबंध सज्जनगड किल्ल्याची आणि भवानजी जाधवांशी निश्चित आहे व ते स्वतः जातीने राक्षसभवनच्या लढाईत उपस्थित होते हे विशेष
________________
🚩🚩सज्जनगडावरील मानकरांची यादीत कारडी झरेवाडी कर जाधव 🚩🚩
पाठीमागे माझा अभ्यास दौरात कारडी व झरेवाडी या दोन्ही गावांना भेट देण्याचा योग आला यावेळी झरेवाडीतील जाधव घराण्यातील मंडळींच्या असणाऱ्या घरांच्या परिसरात एका घरासमोर एक तांब्याचा हंडा त्यात पाणी भरून ठेवलेला आमच्या बघण्यात आला होता आणि त्यावर जाधवराव हा उल्लेख असल्याचेही दिसून आलं यावेळी सदर जाधवराव उल्लेख या घराण्यात पुरातन काळापासून असल्याचा हा एक व शाश्वत पुरावा होता कारण सदर हंडा हा शंभर दीडशे वर्ष जुना असून तो एक वस्तुरूपी पुरावा या झरेवाडी कर घराण्यात आहे याबद्दलची पोस्ट सोशल मीडियाला चार-पाच वर्षांपूर्वी मी स्वतः टाकले आहेत याबद्दल खात्री करून घ्यावी सर्वांनी तसेच झरेवाडीतील याच घराण्याकडे वंशपरंपरागत सज्जनगडावर धनुष्यबाणाचा मान रामदास नवमीच्या पूजेस असतो व सज्जनगडावरील देवस्थानकडून सदर मान देण्यासाठी दरवर्षी मानकरी येऊन धनुष्यबाणाची पूजा करून मान देऊन जातात व येथील जाधव मंडळी सदर मान विधिवत घेऊन जातात सदर सज्जनगडावरील मानकरांची यादी या ठिकाणी देत आहोत हे विशेष.
सदर यादीत विविध घराण्यातील मानकरांची व त्यांच्या गावांची नावे उपलब्ध असून असून आजही ही सर्व गावातील मंडळी रामदास नवमी त्या ठिकाणी आपापला मान व विविध क्षेत्रात धारण करून पूजेसाठी जातात हे विशेष
--------------------------
🚩🚩सेनापती धनाजी जाधव उंब्रजकर🚩🚩
छत्रपती थोरले शाहू महाराज सातारा येथे आपला राज्याभिषेक करून घेतला खालील एक पत्र आमच्या वाचनात आले यात 1709 मधील छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात सज्जनगड येथील विविध मानकरी घराण्याची यादी यात दिली आहे त्यात रामदास नवमी उत्साहाने साजरा करण्यारे घराण्यातील नावातच तत्कालीन विविध घराण्याच्या सोबत सेनापती धनाजी जाधव उंब्रजकर असा उल्लेख त्यात आला आहे तसेच आज घडीस व छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळातील उंब्रज येथे जाधवराव घराण्यातील एक शाखा वास्तव्यास असून तिथे चहुबुर्जीवाडा म्हणून इतिहास प्रसिद्ध आहे आणि आजही तिथे जाधवराव मंडळी इनामदार म्हणून ओळखली जातात आणि सदर पत्रात सेनापती धनाजी जाधव यांचा उल्लेख उंब्रजकर म्हणून आढळतो आणि सज्जनगडावर उत्सव साजरा करणारे यादीत धनाजी जाधव उब्रंजकर असे उल्लेख येत तर कारडी व झरेवाडी कर येथील जाधवराव हे सगळं इनामदार ही पदवी लावतात त्यांनी छत्रपती कडून तीन वेळा इनाम जमीन मिळाले इतिहासात नोंद आढळते. त्याअर्थे कारडी व झरेवाडी कर हे मंडळी धनाजी जाधवराव यांच्याशी संबंधित आहेत काय ? याचाही शोध घेतला पाहिजे 1709 मध्ये धनाजी जाधव उंब्रजकर यांना सज्जनगड येथील रामदास नवमी तील मानकरी म्हणून उपस्थित असतील आणि आजघडीस तो मान झरेवाडी कर येथील जाधवराव मंडळी असेल तर कारडी व झरेवाडी कर जाधवराव ही धनाजी जाधवराव यांच्या सेनापती घराण्यातील आहेत काय याबाबत सकल संशोधन व्हावं तसेच उंब्रज येथील जाधवराव इनामदार मंडळीही धनाजी जाधवराव यांच्याच वंशातील आहेत काय या दृष्टीने ही सदर पत्र एक संशोधनाच्या दृष्टीने पाऊल म्हणून अथवा पुरावा म्हणून किंवा एक मार्ग म्हणून वापरल्यास इतिहासातील आणखी बऱ्याचशा गोष्टी या जाधव व जाधवराव मंडळी बद्दल इतिहास बाहेर येईल.
पण एवढे निश्चित आहे की कारडी व झरवाडीतील जाधव मंडळींचा संबंध जाधवराव घराण्याची आहे कारण राणोजी शिंदेंनी पाठवलेला पत्रात बाबाजीराव जाधव उर्फ मानसिंगराव पैठणकर यांचे राक्षस भवन लढाईतील ठार झाल्याचा उल्लेख तसेच आनंदराव जाधव किल्लेदार अजिंक्यतारा यांचे महाराणी ताराराणी ने केलेली हत्या यावेळीही बाबाजी जाधवराव हे तेथे ताराबाईंच्या तंत्राने राहणारे म्हणून उल्लेख आहेत आणि ते सर्वश्रुत आहे तसेच 1709 च्या छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील यादीत धनाजी जाधव सेनापती उंब्रजकर असा उल्लेख हा संशोधनास वाव देणारा आहे या ठिकाणी तटस्थपणे संशोधन झालं पाहिजे सदर वंशावळीत आनंदराव जाधव व भवनजी जाधव यांचा उल्लेख आला आहे
!!सज्जनगड किल्लेदार येसाजी जाधव!!
येसाजी जाधव यांचाही उल्लेख या वंशावळीत आहे या येसाजी जाधवास रामराजे यांनी काही जमीन इनाम दिली आहे सदर येसाजी जाधव हे सज्जनगड येथे किल्लेदार असल्याची नोंद ही शाहू दप्तरी सापडते
_____
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे 9049760888
____----______---__
🚩🚩 छत्रपती रामराजे च्या सुटकेसाठी बलिदान देणारे अंजिक्यतारा हवालदार सरदार आनंदराव जाधव. 🚩🚩
छत्रपती रामराजेंच्या राज्याभिषेकानंतर रामराजे हे छत्रपती महाराणी ताराराणी साहेब यांच्या कडून अनुकूल नव्हता पेशव्यांकडून अनुकूल होऊन कारभार पाहू लागले यामुळे महाराणी साहेब यांचा छत्रपती रामराजेंवर राग खूप झाला यावेळी चंपाषष्ठीच्या जीवना निमित्त रामराजेंना गडावर बोलवून त्यास कैद करण्यात आले छत्रपती रामराजे यांच्या ३रे पत्नी च्या वडील बुरांणजी मोहिते यांच्या कन्या होत्या सरदार बुरांणजी मोहिते त्यांच्यामार्फत पेशव्यांनी मध्यस्थी करण्यास सुरुवात केली व छत्रपतींची सुटका करून कारभार सुरळीत करण्यास प्रयत्न सुरू करण्यात आले यावेळी मातोश्री छत्रपती ताराराणी साहेब यांना संशय आल्याने त्यांनी हवालदार आनंदराव जाधवांसह अनेक लोकांना ठार मारली हे सरदार आनंदराव जाधव हे अजिंक्य तारा किल्लाच्या पाठीमागे असलेल्या कारडी गावातील वतनदार व छत्रपती शाहू महाराजांच्या विश्वासातले म्हणून ओळखले जाणारे तसेच मानसिंगराव उर्फ बाबाजी जाधवराव पैठणकर यांचे ते भाऊबंद असल्यामुळे बाबाजी जाधवराव आहे महाराणी ताराबाई साहेब यांच्या विश्वासातले होते यावेळी स्वतः अजिंक्यतारावर व ताराराणी सरकार यांच्या बाजूनी खिंड लाढवते होते छत्रपती रामराजांच्या सुटकेस प्रयत्न केल्याचा संशय मुळे छत्रपतीं ताराराणींच्या हातून आलेलं
बलिदान हे आजही कारडी कर जाधव घराण्यातील मंडळी अभिमानाने सांगतात या सरदार आनंदराव जाधव यांची समाधी मस्तकासह कारडी गावातील भैरवनाथ मंदिराच्या डाव्या हाताला असलेल्या वृक्षाखाली होती पण काही वर्षांपूर्वी भैरवनाथ मंदिराच्या सुशभीकरणात सदर समाधी काढून टाकण्यात आली स्थानिक समाधीचे महत्व आणि इतिहास माहीत नसल्याने हे आयोगाने घडलेलं कृत्य आहे दुर्दैवाने महाराष्ट्रात असे अनेक मंदिराच्या परिसरातील समाध्या काढून टाकून सदर मंदिर परिसर सुशोभित करताना केला जात आहे आजघडीला ही शोकांतिका आहे पण सदर समाधी पुन्हा बांधण्याची किंवा मूळ ठिकाणी उभे करण्याची मानसिकता तेथील जाधव मंडळींनी दाखवावे असे आम्हास वाटते आनंदराव जाधव यांच्या बलिदानाची हकीकत अशी
आईसाहेबांकडे मध्यस्थी करून कलह मिटविण्याची कामगिरी पेशव्यानें बराणजी मोहित्यास सांगितली, त्यावरून त्याने कळविलें, "आम्ही आपल्या आज्ञेप्रमाणें मातुश्री व महाराज यांचे भेटीस जावें तर त्या उभयतांची चित्त- शुद्धि दिसोन येत नाहीं. आम्हांस भेटीस यावें म्हणोन त्यांचे हुजरे आले आहेत. आपण सांगाल तेणेंप्रमाणें वर्तणूक करूं." म्हणजे सर्व जाणत्या माणसांना महाराणी ताराबाईची शाश्वती वाटत नव्हती. समेटाच्या वाटाघाटी चालू असतां संशया- वरून धरपकडीचीं कृत्यें ती करीत होती, हवालदार बगैरे मंडळीशों पुरंदरे यांनीं बोलणीं चालविल्याचें ताराबाईस समजतांच "किल्ल्याचा हवालदार आनंदराव जाधव यास खलबतास म्हणून बोलावून त्याचा तिर्ने ता० १६ जुलई, स. १७५१ रोजीं शिरच्छेद करविला. त्यावरोवरच लोक व सरदार बगैरे फार मारिले. त्यावरून लोक अत्यंत भयभीत झाले. *
________________
🚩🚩जनाबाई आनंदराव जाधव🚩🚩
अजिंक्यतारा किल्ल्यावर हवालदार असणारे सरदार आनंदराव जाधव यांची हत्या महाराणी ताराबाई साहेब यांनी केली पुढे छत्रपती रामराजांच्या सुटकेनंतर छत्रपती रामराजे यांनी आनंदराव जाधव यांच्या पत्नी शी जमीन इनाम करून दिली व त्यांच्या बलिदानाचे सार्थक केलं पण पण तेथील वरातदार त्या इनामस वरात लावत असल्याने तक्रार त्यांच्या पत्नीने केली यावर छत्रपती रामराजेंचे एक पत्र शाहू दप्तरी आहे त्यात आनंदराव जाधवांच्या पत्नीच्या जमिनी वरात लावू नये असे स्पष्ट उल्लेख त्यात आहे त्यांच्या पत्नीचे नाव जनाबाई असे स्थानिक मंडळी सांगतात याबद्दल खुलासा पुढील काळात कागदपत्रातील होईल छत्रपती घराण्याच्या लोककीला साजन असेच असंच धोरण छत्रपती रामराजेंनी स्वीकारल्याचं या ठिकाणी दिसते खरं आपल्यासाठी बळी देण्यासाठी कुटुंबाचा पुढे चालवले पाहिजे म्हणून रामराजेंनी त्यास इनाम दिले मुळात रामराज्य बद्दल लिहिताना इतिहासकारांनी अनेक टीका केल्या आहेत पण छत्रपती च्या रक्तातला" रयतेस पोटात लावणी आहे" हे धोरण रामराजेंनीही सुरू ठेवले हे विशेष....
---------------------------
माहिती व लेख सग्रंह
संतोष झिपरे 9049760888

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...