विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 26 May 2024

सरदार महिमाजी पलांडे

 

🚩🚩 छत्रपती शाहू महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील ऐक्य व रणभूमीवर

सरदार महिमाजी पलांडे यांचे उपस्थित🚩🚩
सदर पत्र हे महादजी आबाजी पुरंदरे यांनी पेशवे यांच्या वतीने
नाना साहेब पिशवी यांच्या वतीने ते चिमाजी अप्पा यास लिहिले आहे यावेळी निजाम मुल्क याने विजापूर परिसरातील काही गावांवर हल्ला केला आणि स्वतः तो चालू झाला हा प्रदेश तत्कालीन काळात उदाजीराव किंमत बहाद्दूर यांच्याकडे होता हिम्मत बदल उदाजी चव्हाण हे कोल्हापूरकर छत्रपतींचे सरदार होते छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात लढणारा निजाम कोल्हापूरकरांच्या प्रदेशात आक्रमण करून कोल्हापूरकर संभाजी महाराज छत्रपती यांच्यावर दबाव आणत आहे असे या पत्रातून दिसते आणि छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शाहू महाराज अर्थात आपले वडील बंधू यांच्याकडे मदत मागितली. दरम्यानच्या काळात संभाजी महाराजांनी संभाजीने बाजीरावांच्या बहिणीचे पती व्यंकटराव नारायण घोरपडे यांचे इचलकरंजी शहरावर हल्ला करून ताब्यात घेतले, यावेळी व्यंकटराव हे थोरल्या बाजीरावांच्या सोबत उत्तरेला दूर होते. चिमाजी अप्पांनी छत्रपती शाहू महाराजांना संभाजींना पत्र लिहून व्यंकटराव नारायण घोरपडे यांचा पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी परावृत्त करण्याची विनंती केली. हे प्रकरण खूप एकीकडून येणारा निजाम इचलकरंजी ताब्यात घेतल्यामुळे सदर प्रकरण छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती थोरले शाहू महाराजांसाठी त्रासदायक बनले होतं पण छत्रपती शाहूंनी वैयक्तिकरित्या छत्रपती संभाजी महाराजांशी हे त्यांच्या विनंतीस मान देऊन सदर प्रकरण मिटवले व आपले सरदार निजामावर पाठवले कारण छत्रपती शाहू महाराजांच्या सरदाराची अवस्था ही तत्कालीन काळात त्या परिसरात विकत होती हेही मान्य करावे लागेल दोन्ही छत्रपती घराण्यातील संबंध विकोपास जाणार नाहीत याची काळजी वडील बंधू म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी घेतले व सदर प्रकरण मिटवले , आणि सदर पत्र हे सरदार माहीमची पलांडे यांच्या जमावातील शिपायांबरोबर पाठवण्याचा उल्लेख सदर पत्रातून आला आहे यामुळे निजाम मुलुख छत्रपती शाहू महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या परस्परातील संघर्षाच्या काळात पलांडे घराण्यातील सरदार महिमाजी पलांडे आपल्या जमावानिश हजर होते असं सदर पत्रातील मजकुरावरून दिसून येते.
तुर्की निजाम कोल्हापूरकरांच्या प्रांतात विजापूर परिसरात येत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी मागितलेली मदत आणि शाहू महाराजांनी पाठवलेली मदत व त्यानंतर घडलेल्या घडामोडी या पत्रात दिसतात यावरून असे दिसते की परकीय शत्रू आल्यानंतर परस्परातील मतभेद विसरून एकत्रित पण शत्रू ला सामोरे गेलं पाहिजे हे छत्रपती हे छत्रपती थोरले शाहू महाराज व संभाजी महाराज छत्रपती कोल्हापूर यांनी घालून दिलेला आदर्श तत्कालीन काळातील सरदारांना मुजरा असावा यामुळे पुढील काळात सातारा गादी व कोल्हापूर गादीत संघर्ष आढळत नाही आढळला तरी तो विकोपास गेलेला नाही सदर खालील प्रमाणे...
२०]
❗❗श्री❗❗
पुरवणी तीर्थरूप राजश्री आपा स्वामीचे सेवेसी विनंती. स्वामीनी महिमाजी पलांडे याच्या जमावातील सिपायाबराबर पत्र पाठविले तेथे लिहिले की, इचल- करंजीस राजश्री संभाजी राजे याणी पहिले वेढा घातला होता व गावावर हलाहि केली होती; परंतु गावकरी यानी हला मारुन काहाडली यास्तव वेढा उठऊन गेले होते. प्रस्तुत मागती वेढा घातला आहे व त्यास साहायासी राजश्री येमाजीपंत व माहादजी घाटगे जातात. यैसियासी इचलकरजी वगैरे ठाणी राजश्री वेकंटराऊ याची आहेत; ते तीर्थरूपाबराबर गेले आहेत. पैसे असतां ठाणी मागे घ्यावीं, हे विहित नाही व आमचा लौकिक राहात नाही; तरी तुम्ही राजश्री स्वामीस विनंती करून राणा येमाजीपंतास व राजश्री माहादाजी घाटगे यासी राजश्री स्वामीची पत्र घेऊन पाठवणे की तुम्ही तिकडील साहित्यास न जाणें, म्हणून स्वामीनी लिहिले; यैसियासी राजश्री संभाजी राजे याचे पत्र राजश्री स्वामीस आलें कीं नवाब बागलकोटास आले; पुढें आपल्या राज्यातील ठाणी व लोक जागा जागा आहेत, त्यास उपद्रव देतील. यास्तव राजश्री येमाजीपंतास आज्ञा करून आम्हास सामील होत ते करावे, म्हणजे ते व आम्ही येक विचारे करणे ते करू. व उदाजी चव्हाण याची ठाणी ह्या प्रांतात आहेत त्यास पहिले तह जाहाला असता ठाणी त्याणी ठेवावी पैसे काये आहे? त्याकरिता तोहि विचार करणे तो करूं म्हणून लिहिले. त्यावरून राजश्री स्वामीनी राजश्री येमाजीपंतास पत्र लिहिले कीं, उदाजी चव्हाणाची ठाणी खेरीज करून वरकड साहित्य चिरंजीवाचे सर्व प्रकारे करणे. यैसे पत्र लेहून पाठविले व राजश्री संभाजी राजे यासीहि लिहिले की उदाजी चव्हाण आपल्या राज्यात असता विरुध करावे पैसे नाही. वरकड आपल्या सांगितल्याप्रमाणें सेवा करतील. यैसे लेहून पत्रे पाठविली. राजश्री संभाजी राजे याजकडील कारकून व हुज पत्रे सदरहू घेऊन आला होता. स्वामीनी लिहिले त्या पूर्वीच हा कारभार उरकला. अजी राजश्री प्रतापगडास गेले. स्वामीस विदित व्हावे यास्तव लिहिले असे. घोरपडेयाकडील ठाण्याविसी स्वामीनी आम्हास लिहिले होते ते पत्र राजश्री
नारबावास आम्ही दाखविले. त्यावर बाबानी स्वामीस पत्र लिहिले त्यावरून विदित होईल. सेवेसी श्रृत होये हे विज्ञापना.
__---___----___---__
लेख व माहिती संकलित
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे 9049760888

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...