१] श्री० मालोजी राजे भोसले याची राणी म्हणजे श्री० शहाजी राणे यांची आई दीपाबाई ही निंबाळकरांची कन्या होय.
२] सरलष्कर शहाजी राजे भोसले यांची पहिली राणी जिजाबाईसाहेब-श्री शिवाजीमहाराजांची आई- ही राजे लखुजी जाधवराव यांची कन्या होती हे लखुजी जाधवराव वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यांतील शिंदखेडचे देशमुख होते
४] छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची पहिली राणी सईबाई साहेब छत्रपती सभाजीराजेची आई-ही निंबाळकरांची कन्या होय..
५] छत्रपतीशिवाजी राजे भोसले यांची दुसरी राणी महाराणी सोयराबाई- छत्रपती राजारामाची आई-मोहित्येची कन्या होती. सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी होय..
६] छत्रपती शिवाजी राजे यांची तिसरी राणी पुतळाबाई ही पालकराची मुलगी होय.
७] छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी सखुबाई राणीसाहेब ही बजाजी निंबाळकर याचा मुलगा महादजी यास दिली होत्यहोत्य
८ )छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी मुलगी राजकुंवरबाई ही गणोजी राजे शिर्के यांच्या पत्नी होय. .
९] छत्रपती शिवाजी महाराजांची तिसरी मुलगी अंबिकाबाई ही हरजी राजे महाडिक यांस दिली होत्या
१०] छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे वडील बंधु संभाजी राजे शहाजीराजे भोसले यांचा वश हल्लीं भीमातीरीं जिंती येथे आहे
११] छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज याची राणी येसुबाई ही मळेकर पिलाजी राजे शिर्के यांची कन्या होत्या
१२] छत्रपती राजाराम महाराज यांस राण्या तीन; पहिली जानकीबाई ही प्रतापराब गुजर यांची कन्या.
१३] दुसरी राणी ताराबाई ही हबीरराव मोहिते यांची कन्या
१३] तिसरी राणी राजसबाई ही मलवडीकर घाटग्यांची कन्या
१४) चौथ्या पत्नी अंबिका बाई उर्फ अहिल्या बाई या पानगावकर नाईक निंबाळकर घराण्यातील होय
१५) छत्रपती थोरले शाहू महाराज यास राण्या चार; महाराणी सावित्रीबाई ही कण्हेरकर शिंद्यांची
१६] दुसरी राणी साहेब राजसबाई ऊर्फ अंबिकाबाई ही शिंदखेडच्या रुस्तुमराव जाधवांची कन्या.
१७] तिसरी राणीसाहेब सकवारबाई ही राणोजी शिर्केची कन्या.
१८] चवथी राणी साहेब सगुणाबाई ही नेवासकर मोहित्याची कन्या
१९] तजावरचे व्यकोजी राजे भोसले याची राणी साहेब दीपाबाई ही इगळे यांची कन्या.
२० ] कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी जिजाबाई ही तोरगलकर शिंद्यांची कन्या
२१] कोल्हापुरचे छत्रपती दुसरे संभाजी महाराज याची राणी दिवाणबाई ही शिवाजी
शिर्के तरसळकर यांची कन्या.
२२] कोल्हापूरचे छत्रपती दुसरे शिवाजी महाराज याची राणीसाहेब काशीबाई ही बडोद्याचे दिवाण गणपतराव गायकवाड यांची कन्या
२३] सावंतवाडीचे भोसले रघुनाथराव सावंत (१८९९) यांची पत्नी खडेराव गायकवाड याची मुलगी.
२४] बाबाजी नाईक निंवाळकर (फलटणचे) यांची पत्नी सावित्रीबाई ही राजाराम महाराज यांची कन्या
२५] करवड ता० चिखली वन्हाड येथील देशमुख इगळे यांची मुलगी दीपाबाई तंजावरकर व्यकोजी राजे भोसले यास दिली होती (इ० सन १७२०)
२६] शिदखेडचे लखुजीराव जाधवराव म्हणजे जिजाबाईचे वडील यांना चार पुत्र (१ राघोजीराव, २ दत्ताजीराव, ३ अचलोजीराव, बहादूरजी) होते व सर्वोत वडील कन्या जिजाबाई अशीं पांच अपत्यें होतीं (यांच्या शाखा पुढे पहा
२७] राघोजीराव जाधवरावची शाखा हल्लीं औरगाबादेस आहे आनंदराव जाधवराव
२८] राघोजीची दुसरी शाखा हल्लीं देऊळगांव राजा येथे आहे (राजे दत्ताजीराव)
२९] अचलोजीराव जाधवरावची शाखा हल्ली वन्हाडांत अडगांव व मेदुणे येथे आहे ही शाखा सुप्रसिद्ध सेनापति धनाजीराव जाधव यांची आहे
३० राजे] लखुजीराव जाधवरावची नात म्हणजे मानसिंगराव जाधवराव यांची कन्या अंबिकाबाई ही दिल्लीस शाहूस दिली होती
३१] कागलचे जहागिरदार सखाराम घाटगे यांची कन्या बायजाबाई शिंदे यांचा विवाह ग्वाल्हेरचे दौलतराव शिंद्यांशीं झाला होता..
32] अप्पासाहेत्र शितोळे देशमुख याची बहीण होशा आकासाहेब याचे लग्न जयसिंगराव घोरपडे चीफ ऑफ कापशी यांच्याशीं झाले होतें (इ० सन १८७१)
३३] सरदार जयाजीराव महाराज शिदे याची कन्या मनुराजा साहेब यांचें लग्न अप्पा साहेब शितोळे देशमुख यांच्याशी झालें (ता १-५-१८९०)
३४] हेमसिह राजे भोसले बनसेद्रेंकर याचे कुटुंब भागीरथीबाई आणि तंजावरचे राजे शेवटचे शिवाजी महाराज भोसले (तजावरचा वंश) याची राणी-सुराईबाई साहेब त्या सख्ख्या मावसबहिणी होत्या
३५] या सुराईबाई साहेब नानीसाहेब घाटगे याच्या कन्या होय
३६] सुराईबाई साहेब (तंजावरची राणी) याची बहीण ही सखाराम साहेब
मोहिते तजावर याचे बधु दाजीसाहेब मोहिते याना दिली होती
३७] तजावरचे शेवटचे शिवाजी महाराज भोसले याची मुलगी सखाराम साहेब मोहिते यांना दिली होती
३८] दाजीसाहेब मोहिते तंजावरकर यांना तीन मुली होत्या एक श्रीमत सयाजी - राब महाराज गायकवाड यांना दिली होती तीच थोरली राणी चिमणाबाईसाहेब होय
३९] दुसरी कमलाबाई बडोद्यास सरदार धायबर किल्लेदार यांस दिली
४०] तिसरी नेपाळचे सिसोदिया भोसले महाराजाचे दिवाण जगबहादुर (चव्हाण किंवा पवार) यांच्या मुलास दिली होती
४१] तंजावरचे शेवटचे राजे भोसले शिवाजी महाराजांचे राणीचे दत्तक हा बुलढाणा जिल्ह्यांतील चिखली तालुक्यांतील करवड (बावनखुरजी) येथील इगळेरावचा मुलगा होता त्याचा मुलगा हल्लीं तजावरचे गादीवर आहे
४२] तंजावरचे शिवाजी भोसल्याची मुलगी करवड तालुका चिखली येथील इंगळेराव यांचे घरीं दिली होती
४३] नानीसाहेब घाटगे (तंजावरचे राणीची आई) यांची बहीण करवंडकर इंगळे- रावांस दिली होती
४४] नानीसाहेबांची दुसरी बहीण तामीईबाई शिंदखेडराजा जि० बुलढाणा, येथील जाधवां- चे वंशज आनंदराव लक्ष्मणराव राजे जाधवराव जवळखेडकर (शिंदखेडचे जवळच आहे)
यांना दिली होती
४५] आनंदराव लक्ष्मणराव राजे जाधवराव जवळखेडकर यांचा मुलगा गणपत राव ऊर्फ बुवासाहेब यांची मुलगी खानवलो जि० रत्नागिरी येथे खानवलकर यांस दिली आहे.
४६] वरील खानवलकर घराण्यांतील बाई लक्ष्मीबाई ह्या कोल्हापूरचे हल्लींचे छत्रपति श्री० शाहू महाराज यांच्या राणीसाहेब आहेत
४७] आंनदराव राजे जाधवराव जवळखेडकर यांची मुलगी भागीरथीबाई ही बनसेन्द्रेकर राजे हेमसिंह भोसले यांना दिली होती
४८] सातारचे श्री० छत्रपति प्रतापसिंह महाराज यांचे सख्खे चुलत बंधु बळवतराव राजे भोसले सेनापति (बावीकर) यांचे पुत्र शहाजी ऊर्फ जगली महाराज हे श्री० प्रतापसिंह महाराजांस दत्तक दिले होते..
४९] बळवंतराव राजे भोसले यांनीं शेडगांवकर भोसल्यांचा मुलगा दुर्गसिंह दत्तक घेतला होता
५०] वरील दुर्गसिंह भोसले याना तात्यासाहेब तरसळकर शिर्के यांची मुलगी
सकवारबाई दिली होती
५१] वरील दुर्गसिंह राजे भोसले बावीकर यांना नागपूरचे मोहिते यांची कन्या बन्याबाई ही (दुसरे कुटुब) दिली होत्या.
५३] नगरदेवळ्याचे पवार बाळासाहेब जहागिरदार यांचे सोयरे मोरोजीराव निंबाळकर व भवानजी काटकर हे आहेत
५४] वरील मोरोजीराव निंबाळकर यांची बहीण हिराबाई बनसेंद्रेकर गणपतराव राजे भोसले यांस दिली होत्या.
५५] भवानजी काटकर याची बहीण गोपिकाबाई ही बनसेंद्रेकर गणपतराव राजे भोसले याना दिली होत्या.
५६] गणपतराव राजे भोसले बनसेद्रेकर याचे बधु आबाजी राजे भोसले याची मुलगी कोडयाबाई ही मु सुराणें, जि नाशिक येथील नानासाहेब कच्छवे ऊर्फ ठोके यांस दिली. हे कच्छवे स्वतःस रजपूत म्हणवितात
५७] पिंपळगाव, ता० जालनापूर जि. अवरगाबाद येथील दाजीसाहेब चव्हाण पाटील याची मुलगी भुल्याबाई सुराणे येथील नानासाहेब कच्छवे यांचा मुलगा अण्णा साहेब यास दिली
५८] मुंगी जि नगर येथील बुवासाहेब राजे भोसले यांची बायको भागली जि० औरगाबाद येथील पुजाराची मुलगी होत्या.
५९] तारले राजे महाडीक याची मुलगी ही सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे दत्तक छत्रपती शहाजी ऊर्फ जंगली महाराज यांची राणी होय
६०] थोरले छत्रपति शाहू महाराज यांची राणी कण्हेरखेडचे शिंद्यांची मुलगी होती
६१] थोरले छत्रपती शाहू महाराज यांची बहीण भवानीबाई ही संभाजी राजे महाडीक यांस दिली होती. ती सती गेली.
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य ९०४९७६०८८८
No comments:
Post a Comment