विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 July 2024

*!!!झाशीची राणी भाग-१३!!!*


 *!!!झाशीची राणी भाग-१३!!!*
कलकत्त्याच्या नजरबाजाने खबर आणली की,तीन दिवसांपासुन डलहौसीसाहेब तीन सहकार्यांसोबत कागदपत्रत्रे तपासुन निष्कर्ष काढला की, झाशी आम्ही सांभाळत आहोत व पुढेही आम्हीच सांभाळु असा त्यांच्या चर्चेचा सूर...एकाएकी दत्तक घेण्यामागे काय योजना असावी?बालक अल्पवयीन असल्यामुळे राज्याचा उत्तराधिकारी होऊ शकत नाही आणि राणी स्री असल्यामुळे राज्यकारभार चालवण्यास असमर्थ.. तेव्हा प्रजाजनांचे हित लक्षात घेतां,झाशी राज्य ब्रिटिशांच्या अधिन असनेच हितकारक ठरेल,राणीसाहेब सुखात राहतील एवढे वेतन दिल्या जाईल.
वार्ता ऐकुन राणीसाहेबांच्या डोळ्यातुन फुल्लिंग उडत होते.इंग्रज आम्हास समजतात काय खुळे की दुबळे इथे घराघरांत शस्रसज्ज माणसं आहेत. यांनी मोठी फौज ठेवुन आमचे महाल ताब्यात घेत सुटले.इतके दिवस एलिस साहेबांनी साखरपेरणी करुन वेळ निभावत नेली.आतां आमचाही पीळ बघा म्हणावं!दत्तक नामंजुर केला तर तलवारीस तलवार भिडेल.राणीसाहेबांचा आवेश पाहुन सारे दरबारी थक्क झाले. ही राणी साधी नाही तर कडकडणारी विद्युल्लता,साक्षात कालीमाताच!केवळ २२ वर्षाची...सर्वांनी मनोमन शपथ घेतली,आपण सर्व शक्तीनिशी राणीला साथ देऊ...
राणीसाहेबांनी सर्वांना आव्हान केले,आपण सारे शूर,कर्तबगार मर्द आहात,आपल्या शौर्याची,निष्ठेची,आपले श्रध्दास्थान असलेल्या बेलदुर्वाची सर्वानी आण घ्यावी.तोच उत्स्फुर्तपणे गर्जना झाली राणी साहेबांचा विजय असो...हर हर महादेव....हर हर महादेव...आतां खलित्याची वाट बघणे इतकेच हाती होते राणींनी भरोश्याच्या माणसांची शिबंदी ठेवली.स्री पुरुष सर्वच शस्र बाळगु लागली.सतर्क लोकांची ये..जा..दुःखाला निग्रहाने दूर लोटुन राणीसाहेब स्तंभा सारख्या खंबीरपणे ताठ उभ्या राहिल्या.
मार्च महिना उजाडला.किल्ल्यावर सर्वीकडे अस्वस्थता..सणावारात कुणालाच रस नव्हता.मोरोपंत, तानु मावशी,दरबारी मंडळी सगळे किल्ल्या च्या संरक्षणार्थ योजना करण्यांत मग्न होते.नजरबाजांच्या रोज नवनवीन वार्ता येतच होत्या.
एलिससाहेबांची सहानुभुती राणी कडे असल्यामुळे व त्यांना राणींच्या कर्तुत्वाची,मुत्सद्दीपणाचा अभिमान असल्याने,दत्तकास मंजुरी मिळण्याच्या दृष्टीने सारा पत्रव्यवहार,राणीच्या बाजुचे मैत्रीचे पुरावे डलहौसीला पाठवले,परंतु ज्यांना स्वच्छ,निर्मळ,पवित्र मैत्री स्री पुरुषात असु शकते ही जाणीवच नसल्या ने एलिसच्या झाशीप्रेमाने इंग्रज आश्चर्यात पडले.अशाच एका दुष्ट लेखकाने "The Rane" उर्फ राणी या नावाची कादंबरी लिहुन गंगाधर,लक्ष्मी आणि एलिसलाच शेक्सपिअर करुन या तीन पात्रांची विकृत कथा रंगवली होती. त्यात लक्ष्मीबाईंना स्वैरिणी,हिंसक चारित्र्यहिन दाखवण्याचा असभ्य प्रयत्न केला होता.झाशीच्य्या राणीबद्दल ब्रिटिशांमधे दूषित दृष्टीचा प्रसार व एलिस बद्दल डलहौसी व इतर अधिकार्यांच्या मनांत संशय उत्पन्न करण्याच्याच हेतूने हा हीन प्रयोग केला गेला.परंतु सुदैवाने व राणींच्या उज्वल, उदात्त आणि पवित्र तेजाने ही भाकड कथा कोठेही लोकप्रिय,प्रसिध्द झाली नाही.राणीसाहेबांना या कांदबरीचा प्रचंड धक्का बसला पण त्यातुनच त्या खंबीर पणे सावरल्या.
नजरबाज भयंकर पेटुन उठले होते,ते म्हणाले,राणीसाहेब!आपण फक्त आज्ञा द्या.या लेखकाची जीभ हासडुन त्याची होळी करतो.त्यांना समजावत म्हणाल्या,या कादंबरी विषयी ऐकुन आम्ही सुन्न झालोत.स्री हा नेहमीच चर्चेचा विषय,त्यातही ज्या स्रीला अघटीतपणे कांही विपरित कार्य करावे लागले तर तीच्या दुर्देवाला अंतच नसतो. तिच्या चारित्र्यावर गलिच्छ शितोंडे उडवुन चारीत्र्य बाजारी मांडुन लिलाव करावा,कुलटेचा शिक्का मारावा ही तर जनरीत.कुळकिर्ती,कुळरीत,धर्मकर्तव्ये जपत व याचबरोबर प्रजाकर्तव्य,देशकार्य आमच्या माथी आल्याने या भाकडकथेने खचुन जाऊन अस्वस्थ होण्याचे कांहीही कारण नाही.त्याची होळी केल्याने दुषित रोपे पाणी न घालतां मरु द्यावी.जाळली तर दुषित धूर आपल्याला बाधतो.तो लेखक व त्याची ती चोपडी आपोआपच, परंतु त्या मनोमनी अत्यंत व्यथित झाल्या.एलिसच्या सद्भावनेला असं विकृत रुप दिल्याने व इतरांना कळल्यास सर्वत्र आगडोंब उसळुन, दत्तकास मान्यता न द्यायला निमित्यच होईल म्हणुन,मनाला समजावत त्या शांत बसल्या.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...