विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2024

*!!!झाशीची राणी भाग-१२!!!*


 *!!!झाशीची राणी भाग-१२!!!*
राणीसाहेबांच्या समाचारास बिठुर हुन नानासाहेब,रावसाहेब पेशवे,तात्या टोपे सारे बंधु आलेत.२२ वर्षाची विधवा बहिण पाहुन त्यांना अतोनात दुःख झाले. पण रडायलाही वेळ नव्हता. लक्ष्मीबाईस सावध करुन धीर धरुन म्हणाले,मनूबाई!
ब्रिटिशांनी किल्ल्यावर फौजेची वाढ,राज कोषावर मोहोर ठोकली.त्यांना केवळ राजसत्ताच नाही तर धर्मावरही आक्रमण करुन अवघा भारत त्यांनी ख्रिस्तीमय करायचा आहे.
मनूबाई!राजेलोक तसे तेजबुध्दी, पण,ब्रिटिशांच्या मायाजालात गुंतल्याने त्यांची मती निर्बुध्द होते.यांना ब्रिटिशांची बदनेकी कळु नये इतके भ्रष्ट झालेत का तात्या...आपसांत भांडणे लावुन स्वतःचा स्वार्थ साधण्यात हे लोक तरबेज!नबाब अली वर नजर ठेवुन सावध राहावे मनूबाई!नाना, स्वाभीमानी जनता हेच आमचं पाठबळ! इथल्या प्रजेला व स्रीयां ना शस्रसज्ज केले.सैन्याच्या आणि शस्रास्राच्या जोरावर संस्थानिक विकत घेतले.अनेक नजरबाजांच्या नेमणुका केल्या.येणार्या वार्ता बर्या नाहीत. अशा परिस्थीतीत आम्हाला सल्ला देण्यासाठी व आपत्तीतुन मार्ग काढण्यासाठी आपण सर्व बंधु सतत इथे येत राहावे.
राणींसाहेबांच्या डोळ्यातुन अश्रू ऐवजी धगधगते अग्निकुंड बघुन नानादी सार्यांना समाधान वाटले.मनूबाईने सतर्क,जागृत रहावे म्हणुन ते म्हणाले, ब्रिटिश तुझं राज्य घशात घालायला टपुन बसलेत.दत्तकास मंजुरी मिळेलसे वाटत नाही.घरभेद्यांपासुन सावध रहा.तिन्ही बंधुना निरोप देतांना राणींना फारच जड गेले.नजरबाजांकडुन रोज बातम्या येत होत्या.ब्रिगेडियर पारसन कडुन चार पलटणी ग्वाल्हेरला पाठवल्या जात आहे कडेरच्या किल्ल्यावरही पहारे वाढवले. डेरिनो,लो,आणि हॉलीके या तिन्ही गव्हर्नरकडे दत्तकाविरुध्द मत नोंदवले गेले.बिठुरचे पेशवे,कर्नातकचे नबाब, तंजावरचे राजे,यांच्या मृत्युनंतर त्यांची वार्षिकप्राप्ती बंद करुन वारसहक्क नाकारले.अश्या डलहौसीकडुन न्याय मिळणे अशक्यच!
शिवरामभाऊंचे काका सदाशिवपंत यांचे पणतू कृष्णराव आणि गंगाधररावचे जातभाईचे पुत्र सदाशिवराव यांनीही झाशीवर अधिकार सांगुन तसे पत्र एलिसला पाठवले.एलिसनाच फक्त राणी चेच दत्तक मान्य होते बाकी सारे विरोधात.कॅप्टन ठामपणे राणीच्या पाठी उभे असल्यामुळे कृष्णराव व सदाशिवचे दावे अमान्य केले पण डलहौसीला सामाज्यपिपासा अनावर असल्याने त्याने दत्तक अमान्य केले.या सर्व बाबींनी राणी भयभीत झाल्यात पण,क्षणभरच!
राणींनी एकीकडे शहरात तालिम खाने,शस्रनिर्मिती,सैनिक प्रशिक्षण सुरु होते तर दुसरीकडे वेगवेगळे कागदोपत्री पुरावे गोळा करुन भारताचे गव्हर्नर डलहौसीस विसृत विनंतीवजा पुराव्या सहित पत्र पाठवले.पत्रात लिहिले १८४३ साली माझे पती गंगाधररावांना ऋणग्रस्त
राज्याचे अधिकार प्राप्त झाल्याच्या बदल्यात ब्रिटिश फौजेचा खर्च २५५८९१ रुपये आणि दुलिया,तालगंज सारखे कांही जिल्हे ब्रिटीश सरकारला देण्यात आले.कर्नल श् लिमने(Shlim)जुन्या अटींचा स्विकार केला.इंग्रज शासनकर्त्यां नी आमच्या घराण्याशी चिरस्थायी मैत्री आहे.मेजर एलिस व कॅप्टन मार्टिन यांच्या साक्षीने चि.दामोदरास विधिपूर्वक दत्तक घेतले आहे.बुंदेलखंडातील उदाहरणे समोर ठेवुन या दत्तकविधानास व दामोदरास झाशीराज्याचे उत्तराधिकारी म्हणुन मान्यता द्यावी.
बुंदेलखंडातील निपुत्रीक राजांच्या मृत्युनंतर त्यांच्या दत्तकपुत्रास मान्यता दिलेली आहे,इथे तर माझे पती गंगाधर राजेंनी जिवंतपणी मेजर ऐलिस व कॅप्टन मार्टिनच्या साक्षिने विधिपुर्वक दत्तविधान करुन पुत्रास दत्तक घेतले आहे.तरी या दत्तकास मान्यता देऊन आपले मैत्री दृढ करावे असा विनंती अर्ज रवाना केला.
संतापाने व अगतिकतेने खदखदत होत्या.सुंदर,मुंदर,शामा,झलकारी,काशी ह्या सार्या त्यांच्या सतत अवतीभवती असत.आमचेच राज्य हिसकावुन धनी होऊन बसलेत ही माकडं!आमच्या डेर्या चे फक्त दांडे राहीलेत.आम्ही कांही फक्त बांगड्या भरुनच बसलो नाही तर इथेही सेना सज्ज आहेत.आम्ही मरणाला भीत नाही.महाराजांना शब्द दिलाय,शपथ घेतली,मरेन तर झाशीसाठी,जगेन तर झाशीसाठीच!तुम्हीसगळ्या तयार आहात ना?सगळ्या एकसुरात उत्तरल्या आमचं ऊर्वरित आयुष्य व अवघं जिवन मरण फक्त आपल्या पायाशीच!आमच्या ही तलवारीचं तेजाळलं पाणी दाखवुटच!
क्रमशः
संकलन व©® मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...